Thursday 29 December 2011

भालजी पेंढारकर

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त कोल्हापूरचे सुपुत्र महान मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. व्ही शांताराम त्यांचे मावसभाऊ होते. भालजींची आई राधाबाई आणि व्ही. शांताराम यांची आई कमलाबाई या सख्या बहिणी. मास्टर विनायक हे भालजींचे भाऊ. 

भालजींनी अनेक महान मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि दिग्दर्शनही केले. त्यांचे छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा, साधी माणस, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, बहिर्जी नाईक, बाजीराव मस्तानी, महाराणी येसूबाई, वाल्मिकी, मीठ भाकर, सुनबाई हे चित्रपट खूप गाजले. ते मराठी चित्रपटांचे सुवर्णयुगच होते. मूक चित्रपटांपासून भालजींनी आपले करीयर सुरू केले. प्रसिद्ध प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केले. कोल्हापूर चित्रपटसृष्टीतील इतर स्टुडियोतही त्यांनी काम केले. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. त्यांनी काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली त्यात छत्रपती शिवाजी, महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांचा समावेश आहे. 

१९८१ चा गनिमी कावा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १९९१ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Monday 1 August 2011

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा. 

आज  १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णांनी लोककलेला सामाजिक आशय दिला. १९४० पासून साठेंनी रचनेला सुरुवात केली. दलित, कामगार आणि कष्टकरी यांच्या रोजच्या जीवनातील प्रश्न साठेंनी आपल्या लेखनातून मांडले. त्यांनी तत्कालीन विविध समस्या स्वत: रचनेतून मांडल्या. अण्णाभाऊ साम्यवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांची "गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची " ही लावणी पत्नीचा दुरावा आणि बेळगाव कारवार मराठी भाषिकांचा दुरावा यथार्थ वर्णन करते.


गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची ।
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, डांग, उंगरगावावर मालकी दुजांची
धोडं खंडणीची, कमाल दंडेलीची ।
चीड बेकीची । गरज एकीची
 

Sunday 17 July 2011

आवाहन

आपल्याजवळ शास्त्रीय गायक भार्गवराम आचरेकर यांच्याबद्दल माहिती असल्यास कृपया संपर्क साधा. मी त्यांच्या जीवनावर लेख लिहू इच्छितो तसेच विकिपीडीयावर त्यांच्या लेखाचा विस्तार होणे आवश्यक आहे. जर कोणाला काही माहिती असल्यास कृपया द्यावी तसेच विकिपीडियावरील लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करावी. लिंक दिलेली आहे.
 

Saturday 16 July 2011

धन्यवाद

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा ।
शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

मला प्रेरणा देणारे, सूचना देणारे, सत्य सांगणारे आणि सत्याच्या मार्गावर चालायला लावणारे, योग्य मार्ग दाखवणारे, शिक्षण देणारे, योग्य बोध देणारे सर्वच माझ्यासाठी गुरुसमान आहेत मग ते माझे मित्र असतील, आई-वडील असतील, शिक्षक असतील किंवा आप्त स्वकीय असतील. या सर्वांना माझे वंदन. तुमचे मार्गदर्शन असेच मिळत राहो. - वामन परुळेकर

Wednesday 13 July 2011

मास्टर दिनानाथ मंगेशकर

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी निकराची झुंज देत संघर्षमय जीवन जगणारे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. गोव्यातील मंगेशी हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश भट तर आईचे नाव येसूबाईराणे होते. कै. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची ओळख प्रसिद्ध संगीत नाट्यकलाकार, संगीतकार आणि गायक अशी आहे. संगीत नाटक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्य महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक संगीत नाटकांत काम केले.

वयाच्या  पाचव्या वर्षी दिनानाथांनी बाबा माशेलकर यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे संगीत शिकण्यास त्यांना वेळ लागला नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याची शैली आत्मसात केली. दिनानाथांनी बिकानेरला जाऊन शास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडीत सुखदेव प्रसाद यांच्याकडून घेतले. पंडीत सुखदेव प्रसाद हे पंडीत मणीप्रसाद यांचे वडील. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यावर दिनानाथ पुन्हा महाराष्ट्रात परतले. त्यांनी सावंतवाडीच्या रामकृष्णबुवा वझे यांच्याकडूनही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. रामकृष्णबुवा वझे हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक होते. वझेबुवांनी केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, भालचंद पेंढारकर अशा दिग्गजांना संगीताचे शिक्षण दिले. 

वयाच्या १६ व्या वर्षी दिनानाथांनी किर्लोस्कर मंडळीत काम करायला सुरुवात केली. दिनानाथांनी किर्लोस्कर नाटक मंडळी आणि किर्लोस्कर संगीत मंडळी या मंडळातून सुरुवात केली. किर्लोस्कर संगीत मंडळी या संस्थेत अनेक लोकप्रिय संगीत नाटके त्यांनी केली. काही वर्षे किर्लोस्कर मंडळी सोबत काम केल्यानंतर दिनानाथांनी त्यांचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्या मदतीने बलवंत संगीत मंडळी या नाट्यसंस्थेची स्थापना केली. बलवंत नाट्यसंस्था उभी राहिली आणि दिनानाथ निर्माते झाले. अनेक लोकप्रिय संगीत नाटकांची निर्मिती त्यांनी केली. दिनानाथांनी एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडल्या. ते निर्मातेही होते, रचनाकारही होते, कलाकार होते आणि गायकही होते. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. दिनानाथांनी रुद्रविणेच्या वापरास प्रोत्साहन दिले. त्यांच्या आग्रहामुळेच पंडीत कृष्णराव कोल्हापुरे रुद्रवीणा उस्ताद मुराद खान यांच्याकडून  शिकले. २५ नोव्हेंबर १९२२ ला दिनानाथांनी पणजीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात पोर्तुगीज गव्हर्नर जनरल उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमानंतर दीनानाथांचे कौतुक केले. त्यांना दोन सोन्याची पदके देऊन त्यांच गौरव केला. याप्रसंगी गव्हर्नर जनरल यांनी दिनानाथांना उद्देशून Filho de Goa (गोव्याचा सुपुत्र) असे गौरवोद्गार काढले.        

वयाच्या २२ व्या वर्षी १९२२ मध्ये दिनानाथ थाळनेर येथिल नर्मदा लाड यांच्याशी विवाहबद्ध झाले. दिनानाथांनी त्यांचे नाव श्रीमती असे ठेवले. त्यांना लतिका नावाची मुलगी होती पण तिचा मृत्यू झाला. नजीकच्या काळातच श्रीमती यांचाही मृत्यू झाला. १९२७ साली दिनानाथांनी द्वितीय लग्न अत्यंत साधेपणाने केले. द्वितीय पत्नीचे नाव त्यांनी शुद्धमती असे ठेवले. शुद्धमती ह्या माई म्हणून देखील ओळखल्या जायच्या.

१९३५ च्या दरम्यान दिनानाथ मंगेशकर यांच्या बलवंत पिक्चर्स या संस्थेने तीन चित्रपटांची निर्मिती केली. दिनानाथांनी आपल्या नाटकातून ब्रिटीश सत्तेला कायमच विरोध केला. त्यांनी वीर सावरकर लिखित संन्यस्त खड्ग हे नाटक रंगमंचावर सादर केलं. ब्रिटीश व्हाइसरॉय च्या समोर शिमल्यात त्यांनी सावरकरांच्या नाटकाचा प्रयोग केला. "रामराज्य वियोग" हे नाटक सोडले तर इतर नाटक पाच अक्षरी होती. दीनानाथांचा अंकशास्त्रावर विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांची नावे पंचाक्षरी असत असा समज होता. देशकंटक, पुण्यप्रभाव, मानापमान. सावरकरांचे नाटक सादर करून दिनानाथांनी ब्रिटीश सत्तेला उघड विरोधच केला होता. दिनानाथ मंगेशकर यांनी अनेक संगीत नाटके रंगमंचावर सादर केली. किर्लोस्कर आणि त्यांच्या संस्थेने विविध नाटके सादर केली ज्यात दिनानाथांनी काम केलं. यात खाडिलकरांनी लिहिलेले संगीत मानापमान, सावरकरांनी लिहिलेले सन्यस्त खड्ग, गडकरींनी लिहिलेले राजसंन्यास, वामनराव जोशी यांनी लिहिलेले रणदुंदुभी या नाटकांचा समावेश आहे. याखेरीज पुण्यप्रभाव, देशकंटक आणि रामराज्यवियोग या नाटकातही दिनानाथ मंगेशकरांनी काम केले.   

दिनानाथ मंगेशकर यांनी समाजाच्या विकासासाठी बरेच योगदान दिले. १९२६ साली जांबुवली येथे भरलेल्या "पोर्तुगीज शिक्षण प्रसारक मराठा समाज" या संस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सभेस दिनानाथ उपस्थित होते. पणजी येथे मैफिल घेऊन दिनानाथ मंगेशकरांनी वसतीगृह उभारण्यासाठी शिक्षण फंडाला मदत केली.  दिनानाथांनी वेळोवेळी सर्वच समाजाला मदत केली. १८ डिसेंबर १९३७ रोजी प्रागतिक समाजाच्या मदतीसाठी दिनानाथ मंगेशकर यांनी कार्यक्रम केला यात दत्ताराम पर्वतकर, द्त्तीबाई नागेशकर, केशरबाई काळे यांनी भाग घेतला.  

दिनानाथांनी स्वत:ची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही समाजाला मदत केली. त्यांचे हे कार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही जर विसरलो तर ती कृतघ्नता ठरेल. दिनानाथांनी कायम सामाजिक बांधिलकी जपली.  वयाच्या ४२ व्या वर्षी १९४२ मध्ये पुण्यात दिनानाथांची प्राणज्योत मावळली.

Reference : 
  1. Rudra Veena: an ancient string musical instrument By Hindraj Divekar, Robin D. Tribhuwan 
  2. Some immortals of Hindustani music - Susheela Misra 
  3. Profiles of eminent Goans, past and present By J. Clement Vaz

Tuesday 5 July 2011

कमी वेळात प्रसिद्धी मिळवायची आहे का??

कमी वेळात प्रसिद्धी मिळवायची आहे का?? खून करा मग. कोणाचाही खून करा आणि कोणताही motive ठेवू नका. जेणेकरून तुम्ही लवकर सुटाल. थोडीफार शिक्षा होईल पण घाबरू नका खऱ्याच खोट करणारे वकील आहेतच ना? तूम्हाला थोडीफार सजा होईल पण बाहेर पडलात की फायदेच फायदे तुम्हाला काही अक्कल नसली तरी मिडीया तुम्हाला एवढी प्रसिद्धी देईल कि तुम्हालाच वाटू लागेल की तुम्ही नक्कीच काहीतरी देशभक्तीच चांगल काम केलय. तुम्ही कुठे शिकलात, तुमच बालपण कस गेल, तुम्ही कुठे नोकरी करायचा वगैरे वगैरे सर्व दाखवेल मिडीया. नंतर एखादी पत्रकार परिषद घ्या आणि त्यात न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा तुम्ही कसा केला नाही हे पण रडून रडून सांगा. मिडिया इतर महत्वाचे सर्व प्रश्न बाजूला ठेवून Live प्रक्षेपण करेल. त्यानंतर रामगोपाल वर्मा आहेतच. मला अभिनय येतो असे सांगितलात तर मुख्य भूमिका पण मिळेल. आणि एक तुम्ही ज्याचा खून केलाय तोच कसा वाईट होता हे सांगायला मात्र विसरू नका. भरपूर फायदे आहेत ना खुनाचे तुम्हाला काय वाटत???

Tuesday 14 June 2011

किशोरी आमोणकर यांना "हॉल ऑफ फेम"

इंडियन म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना बिग स्टार आयएमए चा "हॉल ऑफ फेम" हा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘आयएमए’च्या संस्थापक राजश्री बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांच्या हस्ते किशोरीताईंना हा पुरस्कार देण्यात आला. 

किशोरी ताईंचा जन्म १९३१ साली झाला. किशोरी आमोणकर यांनी आपल्या मातोश्री जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी सर्वच घराण्यातील तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले आणि स्वत:ची अशी वेगळी शैली निर्माण केली. त्या प्रयोगशील आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी गीत गाया पत्थरोने या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले पण नंतर पार्श्वगायन सोडून पुन्हा त्यांनी शास्त्रीय गायनास सुरुवात केली. पन्नासच्या दशकात काही काळ त्यांनी गायन बंद केले होते. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. माणिक भिडे, सुहासिनी मुळगावकर, रघुनंदन पणशीकर आणि तेजश्री आमोणकर हे किशोरीताईंचे शिष्य आहेत.

१९८५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना  भारत सरकारने १९८७ माध्ये पद्मभूषण तर २००२ मध्ये पद्मविभूषण देवून गौरवले.

Sunday 29 May 2011

प्राचीन कोकण संस्कृती

काही  दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय. 

गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा - पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या  परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली  डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे. 

२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्‍रॉन जेटी, वेळणेश्‍वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे  समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.    

८०००  वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची. 
   


Sunday 22 May 2011

माहितीपर संकेतस्थळे भाग - १७

तुमचा ब्लॉग लोकप्रिय करा

मित्रांनो  २००८ साली माझ्या माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)या लेखात आपण भारतातील काही लोकप्रिय ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेतल होत. यात मराठी ब्लॉग्ज नेट, ब्लॉगवाणी, ब्लॉगस्ट्रीट इंडीया, इंडिया ब्लॉग्ज १.०, देसी ब्लॉग्, कामत ब्लॉग पोर्टल अशा संकेतस्थळांचा समावेश होता. आज आपण काही नवीन मराठी ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेऊ. 

  1. मराठी ब्लॉग्ज जगत - मराठी ब्लोग्सची डिरेक्टरी    - या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद होण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ तुमचे पूर्ण नाव, तुमच्या ब्लॉगचा यु आर एल आणि फीड लिंक द्यावी लागेल. तुमच्या ब्लॉगच्या ओळखचिन्हाचा विजेट कोड तयार असल्यास इथे देता येईल. 
  2. मराठी मंडळी  - या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. आपणास मराठी ब्लॉगर्स चर्चासत्रावर जाऊन सदस्यत्व घ्याव लागेल नंतरच आपला ब्लॉग याठीकाणी जोडला जाईल.
  3. मराठी सूची - मराठी सूची या या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. एकदा सभासद झाल्यावर तुम्हाला तुमच्या ईमेल पत्यावर activation लिंक मिळेल आणि तुमचा पासवर्ड पण मिळेल. एकदा तुम्ही लॉगईन झालात की तुमच्या ब्लॉगमधील लेख येथे प्रकाशित करू शकता.
  4. मराठी कॉर्नर मराठी कॉर्नर  या डिरेक्टरीवरसुध्दा तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. तुम्ही या संकेतस्थळावर एका किंवा अधिक ब्लॉग जोडू शकता. 
 या सर्व मराठी ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांचे विजेट उपलब्ध आहेत ते कॉपी करून तुमच्या ब्लॉगवर तुम्हाला पेस्ट करावे लागतील. असे केल्याने तुमचा ब्लॉग लवकर जोडला जाईल.

Saturday 30 April 2011

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

माय भवानी प्रसन्न झाली,
सोनपावले घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे


Wednesday 2 March 2011

आज महाशिवरात्र

सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

माहितीपर संकेतस्थळे भाग - 16

माहितीपर संकेतस्थळे  भाग - 16

Name of the blog - लेख संग्रह … 

ब्लॉग बद्दल दीपक तर्फे

मी तसा आंतरजालावर बराच वेळ पडीक असतो. इथे वावरत असताना कित्येकदा खुप चांगली माहिती मिळते, खुप चांगले लेख वाचायला मिळतात. पण काळाच्या ओघात त्यातलं फारसं मग लक्षात राहत नाही. आणि जेव्हा एखाद्या विषयावरची माहिती हवी असते, तेव्हा नेमकं लेखाचं शीर्षक आठवत नाही, लेखकाचं नाव आठवत नाही.. त्यामुळे मग शोधायला सुद्धा अवघड जातं. त्यावर उपाय म्हणुन हा माझा ब्लॉग प्रपंच !

जातीयवाद

गेल्या काही दिवसात किंवा वर्षात आपल्याकडे सुचना क्रांती झाली आहे पण सुचना क्रांती बरोबर जातीयवादही तेवढाच फोफावला आहे. मनात जे जातीयवादी विचार आहेत ते मांडण्याच एक नव व्यासपीठच या सनातन्यांना मिळाल आहे. अलीकडेच महात्मा फुलेंवर जातीयवादी टिका करणारा एक लेख फेसबुकवर माझ्या वाचनात आला. टिका फुलेंच्या लिखाणावर व फुलेंवर होती. केवळ फुलेंवरच नव्हे इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला एखाद्या जातीशी जोडायचे आणि मग इतर जातीच्या लोकांनी त्याचे चारित्र्यहरण करायचे हे रोजचेच झालय. टिका एवढी जातीयवादी की इतर जातींना शिक्षण दिले हीच महात्मा फुलेंची चुक असे दाखवण्याचा प्रयत्न.

निषेध आहे असे लिखाण करणाऱ्यांचा.
निषेध आहे असे लिखाण करणाऱ्यांचा
मला अस वाटतय की इतिहासात काय झाले हे चघळत बसुन आपला काही फायदा नाही होणार हे समजुन घेण महत्त्वाच आहे. केवळ जातीयवाद भडकवायचा असेल आणि त्यासाठी हा उपद्व्याप चालला असेल तर वेळीच सावध होण गरजेच आहे. अशा लोकांना कठोर विरोध करण आपल कर्तव्य आहे. आपण सगळे भारतीय नागरीक आहोत हेच पुरेसे नाही का? फुटीरतावादी तत्व जात, धर्म, वंश अशा मुद्यांवर देशात फुट पाडत आहेत. जातीचा अभिमान असणे किंवा स्वजातीय लोकांचा आदर असणे वाइट नाही पण जातीचा माज असणे हे पुरोगामी महाराष्ट्राच लक्षण नाही. 

सध्या काही कट्टर जातीयवादी संघटना अतिशय खालच्या स्तराला गेल्या आहेत. या संघटनांचे अनुयायी दुसऱ्या संघटनांमध्ये शिरून स्वत:च्या विकृत विचारांचा प्रचार करण्यात धन्यता मानतात. अशा सर्व लोकांसाठी आमच्या ब्लॉग आणि ग्रुपचे दार कायम बंद राहील हे लक्षात घ्यावे. अतिशय खालच्या स्तराला गेलेल्या काही संघटना स्वत:ची पुस्तके छापून त्यात दुसऱ्या समाजाची एवढी निंदानालस्ती  करत आहेत कि त्याला काही अंत नाही. एका पुस्तकाने एवढी खालची पातळी गाठली की ब्राह्मण स्त्रीयांवर अतिशय अश्लिल भाषेत लिखाण केल आहे. एवढच नव्हे तर जातीय दंगली कशा पेटवायच्या आणि बहुजन समाजाला यात कस ओढायचं याच विस्तृत लिखाण या विकृत लोकांनी केल आहे. आपल्याला अशा लोकांपासून सावध रहावे लागेल. 

Wednesday 19 January 2011

Marathi Comedy Dhamaal

प्रबोधनकार

समाजव्यवस्था आणि ढोंगी धर्मरक्षकांविषयी झणझणीज अंजन टाकणारे विचार जरुर वाचा. अगदी लहानपणापासुनच ठाकरे माझे आदर्श आहेत. त्यांचे परखड विचार मला तंतोतंत पटतात. प्रभोधनकारांनी सुरु केलेल्या चळवळी इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपणही या संकेतस्थळावर त्यांचे विचार वाचू शकता. 
www.prabodhankar.com
धन्यवाद - वामन परुळेकर

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters