तुमचा ब्लॉग लोकप्रिय करा
मित्रांनो २००८ साली माझ्या माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)या लेखात आपण भारतातील काही लोकप्रिय ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेतल होत. यात मराठी ब्लॉग्ज नेट, ब्लॉगवाणी, ब्लॉगस्ट्रीट इंडीया, इंडिया ब्लॉग्ज १.०, देसी ब्लॉग्, कामत ब्लॉग पोर्टल अशा संकेतस्थळांचा समावेश होता. आज आपण काही नवीन मराठी ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेऊ.
- मराठी ब्लॉग्ज जगत - मराठी ब्लोग्सची डिरेक्टरी - या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद होण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ तुमचे पूर्ण नाव, तुमच्या ब्लॉगचा यु आर एल आणि फीड लिंक द्यावी लागेल. तुमच्या ब्लॉगच्या ओळखचिन्हाचा विजेट कोड तयार असल्यास इथे देता येईल.
- मराठी मंडळी - या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. आपणास मराठी ब्लॉगर्स चर्चासत्रावर जाऊन सदस्यत्व घ्याव लागेल नंतरच आपला ब्लॉग याठीकाणी जोडला जाईल.
- मराठी सूची - मराठी सूची या या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. एकदा सभासद झाल्यावर तुम्हाला तुमच्या ईमेल पत्यावर activation लिंक मिळेल आणि तुमचा पासवर्ड पण मिळेल. एकदा तुम्ही लॉगईन झालात की तुमच्या ब्लॉगमधील लेख येथे प्रकाशित करू शकता.
- मराठी कॉर्नर - मराठी कॉर्नर या डिरेक्टरीवरसुध्दा तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. तुम्ही या संकेतस्थळावर एका किंवा अधिक ब्लॉग जोडू शकता.
No comments:
Post a Comment