Showing posts with label तंत्रज्ञान-विज्ञान. Show all posts
Showing posts with label तंत्रज्ञान-विज्ञान. Show all posts

Sunday, 1 June 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - १०

माहितीपर संकेतस्थळे भाग - १०


नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी माहितीपर संकेतस्थळे या मालिकेतील नविन पुष्प गुंफत आहे. आज मी आपल्याला भारतीय पाककले संबंधीत संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. स्वतःच्या हातांनी जेवण करणे आणि ते खाणे कोणाला आवडत नाही ? घरबसल्या नविन-नविन पदार्थ शिकण्याची हौस असणाऱ्यांसाठी ह्या संकेतस्थळांचा नक्कीच उपयोग होइल.




संकेतस्थळे



http://www.food-india.com/

http://www.top-indian-recipes.com/

http://recipes.tajonline.com/


http://www.talimpu.com/

http://www.bestindiancooking.com/

http://food.sify.com/


http://www.indianfoodforever.com/


http://foodindian.com/

http://www.bbc.co.uk/food/recipes/


http://www.khanakhazana.com/


http://www.indiaforvisitors.com/

http://www.indianfoodrecipes.net/


http://www.kadaicuisine.com/



दक्षिण भारतीय पाककला


http://www.south-indian-recipes.com/

http://foodindian.com/recipes/south


http://www.indobase.com/


http://forumhub.com/southfood/


http://www.food-india.com/


पंजाबी भारतीय पाककला


http://www.punjabonline.com/


http://www.bennett.com/curry/punjab.htm

http://www.indiachildren.com/

http://www.indianfoodforever.com/punjabi/


http://www.indobase.com/recipes/category/punjabi-recipes.php


महाराष्ट्रीयन भारतीय पाककला


http://www.marathiworld.com/pakkala/index.htm


http://www.mumbai-masala.com/


http://www.indianfoodforever.com/maharashtrian/


http://www.indobase.com/recipes/category/

http://indianfood.indianetzone.com/1/marathi.htm

http://www.food-india.com/region/marathi.htm



- वामन परुळेकर

Tuesday, 13 May 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ९

माहितीपर संकेतस्थळे भाग -

आघाडीची वॉलपेपर संकेतस्थळे

नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या संगणकावर सर्वोत्तम वॉलपेपर असावेत अशी इच्छा असतेच. या लेखात मी काही निवडलेल्या वॉलपेपर संकेतस्थळांची यादी देत आहे. तुम्ही जरुर या संकेतस्थळांचा वापर करुन आनंदीत व्हाल. काही अप्रतिम वॉलपेपर डाउनलोड करण्याची संधी आपल्याला मिळेल.




धन्यवाद

माहितीपर संकेतस्थळे भाग - ८ ("अॅड धिस")

माहितीपर संकेतस्थळे भाग - ८


> Addthis

आज आपण अशा संकेतस्थळाबद्दल जाणुन घेवू की ज्या संकेतस्थळाचा उपयोग करुन तुम्ही तुमचे ब्लॉग कंटेंट सर्वदूर पोहचवू शकता. "अॅड धिस" या संकेतस्थळावर तुम्हाला "अॅड धिस" हे बटण पुरवले जाते. हे बटण तुम्ही तुमच्या पेज इलेमेंट मध्ये समाविष्ट करु शकता.


हे बटण मिळविण्यासाठी प्रथम ह्या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ उघडावे. त्यावर "Get your button" असे लिहीले असेल, त्यावर क्लिक करा. नंतर एक फॉर्म येइल तो भरा. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला खाते तयार करावे लागेल. त्यानंतर दिलेला कोड तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाका.


"अॅड धिस" हे बटण वापरुन तुम्ही तुमच्या ब्लॉगचा बुकमार्क विविध सेवा पुरविणाऱ्या संकेतस्थळांवर करुन देवू शकता.


जाता जाता या संकेतस्थळावर नजर टाका. तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी विविध विजेट या संकेतस्थळावर मिळतील.
> http://www।widgetbox.com/

धन्यवाद



Monday, 12 May 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)

माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)





मित्रांनो गेले पाच महिने मी तुम्हाला या सदरात काही माहितीपर आणि मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. मी आज तुम्हाला काही अशा संकेतस्थळांची माहिती देणार आहे की ज्यावर नोंदणी करुन आपण आपल्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवू शकता. आज पहिल्या भागात आपण फक्त भारतीय ब्लॉग नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळांबद्दल जाणूण घेउ. यातील काही संकेतस्थळांबद्दल तुम्हाला माहिती असेलच. उदा. मराठी ब्लॉग्ज नेट आणि ब्लॉगवाणी. मी तुम्हाला खालील भारतीय संकेतस्थळे सुचवत आहे. सदस्य होण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमचा ब्लॉग भारतीय असणे आवश्यक आहे.

भारतीय ब्लॉग नोंदणी संकेतस्थळे


1> ब्लॉगवाणी
ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/2.html


2> मराठीब्लॉग्ज.नेट

अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. २००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/blog-post_18.html


3> ब्लॉगस्ट्रीट इंडीया

ब्लॉगस्ट्रीट इंडीया हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. अधिकाअधिक वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ह्या संकेतस्थळाचा उपयोग होइल.तुमच्या ब्लॉगच्या लोकप्रियतेनुसार तुम्ही अव्वल बनू शकता.


4> इंडिया ब्लॉग्ज १.०

हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. पहिल्याच पानावर सजेस्ट अ ब्लॉगवर क्लिक करुन तुम्ही तुमचा ब्लॉग नोंदणी करु शकता.


5> देसी ब्लॉग्ज

देसी ब्लॉग्ज ह्या संकेतस्थळावर फार कमी मराठी ब्लॉग्ज आहेत. आपण आपला ब्लॉग या संकेतस्थळावर जरुर नोंदणीकृत करा. मराठी संख्या वाढली पाहिजे.


6> कामत ब्लॉग पोर्टल

कामत ब्लॉग पोर्टल हे संकेतस्थळ नावावरुन तरी मराठी वाटते. या संकेतस्थळावर तुम्ही आत्ता अपडेट केलेला तुमचा ब्लॉग पाहू शकता. इंडीयन ब्लॉग नोंदणी मध्ये हे संकेतस्थळ अव्वल आहे. त्यामुळे तुम्ही मोठी वाचकसंख्या मिळवू शकता.


क्रमशः

(कोणतीही शंका असल्यास जरुर कमेंट करा. शक्यतो नोंदणीसाठी वेगळा ई-मेल पत्ता तयार ठेवा.)

Tuesday, 29 April 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ६


माहितीपर संकेतस्थळे भाग - ६ (नेटबीन्स)


मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील सहावे पुष्प आहे..
नेटबीन्स.ओ.आर्.जी

आपण जावा प्रोग्रामर आहात का? आपल्याला जावा कोडींग करण्याची आवड आहे का? जर होय तर हे संकेतस्थळ आपल्याला उपयोगी पडेल. या संकेतस्थळावरुन तुम्ही नेटबीन्स स्टार्टर कीट DVD ऑर्डर करु शकता. ही मोफत DVD उपलब्ध आहे. या DVD मध्ये नेटबीन्स IDE ६.१, JDK ६.०, जावा टयुटोरीअल्स, नेटबीन्स टयुटोरीअल्स समाविष्ट केले आहेत.

या DVD मध्ये Windows, Linux, Solaris x86, Solaris SPARC आणि Mac OS X या ऑपरेटींग सिस्टीमच्या डिस्ट्रीब्युशन फाईल्स उपलब्ध आहेत. ही DVD चार अन्य भाषांमध्ये उपलब्ध आहे अनुक्रमे चायनिज, पोर्तुगाली ब्राझीलीयन आणि रशियन.

येथे क्लिक करा आणि मोफत DVD साठी फॉर्म भरा.



Monday, 28 April 2008

गगनभरारी

गगनभरारी
आजचा दिवस भारतीय अवकाश क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल. आज श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही सी-9" चे यशस्वी उड्डाण झाले. एकाच वेळी दहा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. हा एक विक्रमच आहे. यापूर्वी रशियाने एकाचवेळी सोळा उपग्रह सोडले होते पण त्यांचे एकत्रित वजन ४०० किलो होते. भारतीय उपग्रहांचे वजन ८२० किलो आहे. या प्रक्षेपणानंतर भारताने प्रक्षेपीत केलेल्या उपग्रहांची संख्या ५० झाली आहे.



आजच्या मोहीमेची ठळक वैशिष्टये-
  • ६९० किलोचा भारतीय दूरसंवेदन उपग्रह "कार्टोसॅट-2 ए' अवकाशात
  • 83 किलो वजनाचा "इंडियन मिनी सॅटेलाईट'
  • धृवीय उपग्रह प्रक्षेपकाचे तेरावे यशस्वी उड्डाण
  • दहा उपग्रहांचे पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपण

२०१४ पर्यंत भारत अवकाशात अंतराळवीर धाडेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत. २००८ मध्ये चांद्रयान - १, २०१० मध्ये चांद्रयान - २ च्या मोहीमा आखण्यात आल्या आहेत. लवकरच भारत अवकाशात प्रयोगशाळा उभारेल. भविष्यात चंद्रावरील हक्कासाठी जी युध्दे होतील त्यात भारत नक्कीच महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

Monday, 24 March 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ५ (पु.ल.देशपांडे)

माहितीपर संकेतस्थळे भाग - (पु..देशपांडे)

मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील पाचवे पुष्प आहे..



> http://www.4shared.com/dir/3765608/8238f1b4/Pu_la_Deshpande.html

या माहितीस्थळावरुन आपण पु.लं.ची पुस्तके आणि त्यांचे साहित्य मिळवू शकता.

( क्रमशः )

Tuesday, 18 March 2008

नवीन टाटा सुमो


नवीन टाटा सुमो

टाटांची नवी सुमो आपण पाहिली असेलच. मी पण काल पाहिली आणि पाहताक्षणी मला गाडीची रचना आवडली. ही नवीन कार महिंद्रा स्कार्पिओला टक्कर देण्यासाठीच बनवली असावी. या गाडीची रचना स्कार्पिओ सारखीच वाटते. गाडीची अंतर्गत रचना आकर्षक आहे. पॉवर विंडो, पॉवर स्टीअरींग, एम्.पी.थ्री प्लेयर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या कारमध्ये शक्तीशाली स्पिकर सिस्टीम आहे.

ही कार सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार एल्.एक्स.,जी.एक्स आणि ई-एक्स अशा तीन प्रकारात उपलब्ध आहे. त्यातही ६+१ आणि ७+१ अशा आसनक्षमतेत ही कार उपलब्ध आहे. कारला २ वर्ष वॉरंटी आहे. २ वर्ष किंवा ७५,००० कि.मी. जे लवकर पुर्ण होइल ते. कारची किंमत अंदाजे ६.५० ते ७.५० लाख राहील(दिल्ली शोरुम)

गाडीची काही वैशिष्टये

मोठे स्पष्ट दिसणारे दिवे
फ्रंट एअर डॅम
व्हीलबेस २५५० एम्.एम्.
३ रो सिटींग
डीकोर इंजीन ( DICOR- direct injection common rail )
पॉवर विंडो
पॉवर स्टीअरींग
एम्.पी.थ्री प्लेयर

Saturday, 15 March 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ४

माहितीपर संकेतस्थळे भाग - ४

मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील चौथे पुष्प आहे..

फीडबर्नर
http://www.feedburner.com/fb/a/home


फीडबर्नर संकेतस्थळ बऱ्याच सुविधा पुरवते. आपल्या ब्लॉगचे फीड आपण येथे देउन आपली वाचकसंख्या वाढवू शकतो. हे संकेतस्थळ आपल्याला ई-मेल वरुन आपल्या ब्लॉगचे अपडेट ईतरांपर्यंत पोहचवण्याची सुविधा पुरवते. म्हणजेच या सुविधेचा फायदा घेउन तुम्ही खाली दाखवलेला चौकोन तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करु शकता.



या चौकोनात तुमचे वाचक त्यांचा ई-मेल टाईप करतील. हे केल्यावर तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉगवरील लेख ई-मेल स्वरुपात मिळू लागतील. फीडबर्नर अन्य काही सुविधा पुरवते त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू. ह्या लेखात मी फक्त ई-मेल सुविधेसंदर्भात लिहीणार आहे.

फीडबर्नर संकेतस्थळ उघडल्यावर प्रथम तुमच्या ब्लॉगचा URL किंवा feed address द्यावा लागतो.
वरच्या छायाचित्रात दिसत असलेल्या बॉक्समध्ये तुमचा ब्लॉग यु.आर्.एल्. टाईप करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. लक्षात ठेवा तुमचा URL हा http:// ने सुरु झालेला हवा. त्यानंतर तुम्हाला Atom किंवा RSS यापैकी एका URL ची निवड करावी लागेल. समजा तुम्ही RSS फीड चा पर्याय निवडला तर त्यानंतर नेक्स्ट बटण क्लिक करा.
यानंतर पुढील पानावर तुम्हाला तुमचा फीडबर्नर फीड address दिसेल.
तो असा असेल http://feeds.feedburner.com/famtmca हा address तुम्ही बदलू शकता. त्यानंतर तुम्हाला फीडबर्नर अकाउंट तयार करावे लागेल. त्यासाठी युजरनेम,पासवर्ड आणि ई-मेल द्यावा लागेल. हे केल्या नंतर Activate feed बटणवर क्लिक करा. आता हे सगळ यशस्वी झाले की खालील संदेश दिसेल.

Congrats! Your FeedBurner feed is now live. Want to dress it up a little?

त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट बटण दाबा. पुन्हा एकदा नेक्स्ट बटण दाबा. त्यानंतर खालील मेनू दिसेल त्यातील Publicize क्लिक करा.
आता डाव्या बाजूला एक उभा मेनू दिसेल त्यात E-mail Subscriptions असे दिसेल त्यावर क्लिक करा. ई-मेल सबस्क्रिप्शनच्या पेजवर योग्य सेवादात्याची नोंद करा.
तीन पर्याय असतील
* Feedburner
* FeedBiltz
* Rmail
यातून एका सेवादात्याची नोंद करा आणि Activate बटण दाबा. त्यानंतर उभ्या मेनूमधिल Subscription management ही लिंक निवडा आणि तेथे खालील पट्टी दीसेल त्यात Blogger वा अन्य सर्व्हीसची निवड करा.
अन्यथा दिलेला कोड page element (html script) ला Copy Paste करा. हे सर्व केल्यावर ई-मेल सुविधा तुमच्या ब्लॉगवर कार्यरत होइल. धन्यवाद.


- वामन परुळेकर

Thursday, 28 February 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ३

माहितीपर संकेतस्थळे भाग -

मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील तिसरे पुष्प आहे..

शोध संकेतस्थळे.

तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवायची असेल,तर तुमचा ब्लॉग नावाजलेल्या सर्च संकेतस्थळावर दिसणे महत्त्वाचे ठरते. यासाठी ब्लॉग नावाजलेल्या सर्च संकेतस्थळांवर जमा (सबमीट) करावा लागतो. कोणतेही सर्च इंजिन, तुमचा ब्लॉग त्यांच्या शोध यादीत येइल याची हमी देत नाही. आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग या शोध यादीत समाविष्ट करण्यासाठी ही शोध संकेतस्थळे विविध मोजमापे वापरतात. उदा. आपले वाचक किती? आपल्या लिंकचा दर्जा, लिखाणाचा दर्जा. अर्थात प्रत्येक शोध संकेतस्थळाचे नियम वेगवेगळे आहेत. सर्वात यशस्वी शोध संकेतस्थळ गुगल प्रत्येक संकेतस्थळ अथवा ब्लॉगला दर्जा प्रदान करते. ज्याची रॅंक जास्त वरची त्याचे लिस्टींग प्रथम होते.

सर्वात महात्त्वाचे हे की ही शोध संकेतस्थळे आपला ब्लॉग शोध यादीत येइल याची हमी देत नाहीत आणि शक्यतो नेहमीच्या वापराचा -मेल जमा (सबमीट) करु नका. एकदा -मेल जमा झाला की इन् बॉक्स जाहीरातींनी भरुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खाली
काही प्रमुख शोध संकेतस्थळांची थेट लिंक मी आपल्याला उपलब्ध करुन देत आहे. त्यांचा वापर करुन पहा.

) गुगलवर आपला ब्लॉग जमा करा.

येथे URL च्या समोरील चौकोनात तुमचा पुर्ण ब्लॉग पत्ता लिहा.
उदा. http://marathisamuday.blogspot.com/
(
जेथे marathisamuday ऐवजी तुमच्या ब्लॉगचे नाव येइल. )

) स्र्कुब द वेबवर आपला ब्लॉग जमा करा.


येथे आपल्याला आपला -मेल द्यावा लागेल. (शक्यतो नेहमीच्या वापराचा -मेल जमा (सबमीट) करु नका)

) जायदेवर आपला ब्लॉग जमा करा.


) याहू वर आपला ब्लॉग जमा करा.
जगातील प्रमुख शोध संकेतस्थळापैकी एक
याहू संकेतस्थळ जलद शोधासाठी प्रसिध्द आहे. याहूची रचना अत्यंत सोपी आहे. -मेलची गरज नाही.


- वामन परुळेकर

Saturday, 23 February 2008

माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - 2

माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - 2
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील दुसरे पुष्प आहे..

ब्लॉगवाणी . कॉम -->>
http://www.blogwani.com/

ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता. तुमचा स्वतःचा ब्लॉग असल्यास तो तुम्ही येथे पाठवू शकता. ब्लॉगवाणीला ई-मेल करुन तुम्ही तुमचा ब्लॉग येथे सबमीट करु शकता.

ब्लॉगवाणीने पुरविलेल्या बटनवर क्लिक केल्यास आपला लेख लगेच ब्लॉगवाणीवर दाखवला जातो. यामुळे तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढेल.

- वामन परुळेकर


Thursday, 21 February 2008

अखेर उपग्रह नष्ट केला.


गेला महिनाभर ज्या अमेरीकन उपग्रहाची चर्चा होती तो "यु.एस्.ए.१९३" उपग्रह अमेरीकेने नष्ट करण्यात यश मिळवले. हा उपग्रह जगात कोठेही कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे जिवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
हवाई येथील अमेरीकन युध्दनौकेवरुन सोडलेल्या क्षेपणास्त्राद्वारे हा उपग्रह पाडण्यात आला. या मोहीमेबाबत संशयही व्यकत करण्यात येत आहे. चिनने यापुर्वी उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती कदाचित त्याला प्रत्युत्तर म्हणुन अमेरीकेने ही खेळी खेळली असेल.

Monday, 18 February 2008

माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - १

माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - १
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील पहिले पुष्प आहे..

१) मराठीब्लॉग्ज.नेट
-->> http://marathiblogs.net/


अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. नेटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ई-मेलिंग संकेतस्थळे आणि खासगी संकेतस्थळांचे युग होते. त्यानंतर आले ते फ़्री वेबहोस्टींगचे युग यात प्रामुख्याने जिओसिटीज,त्रीपॉडने संकेतस्थळांसाठी मोफत जागा पुरवली. सध्या ब्लॉग्जचे युग सुरु आहे. हे एक नविन तंत्रज्ञान आहे. जे अत्यंत सोपे आहे. तर या ब्लॉग्जच्या युगात सर्व मराठी ब्लॉग्जधारकांना एकत्र आणण्याचे काम या संकेतस्थळाने केले आहे.

ह्या संकेतस्थळाची नविन रचना अत्यंत आकर्षक अशी केली आहे. सर्व सभासदब्लॉग्जवरील नविन लेख आपण येथे पाहू शकता आणि जवळजवळ ५७९ मराठी ब्लॉजची मजा लुटू शकता. तुम्ही या संकेतस्थळाचे सभासद होउन स्वतःच्या ब्लॉगचे चाहते वाढवू शकता.

२००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.

- वामन परुळेकर

Sunday, 17 February 2008

क्रिक-इंन्फो चे डेक्सटॉप अलर्ट

क्रिक-इंन्फो चे डेक्सटॉप अलर्ट



क्रिकेटच्या ताज्या बातम्या, हलता धावफलक आणि विकेट अलर्ट तुम्ही तुमच्या डेक्सटॉप वर पाहू शकता. तेही मोफत डाउनलोडने. या सॉफ्टवेअरचे वैशिष्टय म्हणजे यावर तुम्ही तुमच्या इतर आवडत्या संकेतस्थळावरील बातम्यांचे फीड देउ शकता. आणि स्कोअर सोबतच बातम्याही पाहू शकता. फक्त यासाठी इंटरनेटची गरज आहे.

यासाठी खालिल गोष्टींची गरज आहे.

> इंटरनेट कनेक्शन
> विंडोज ऑपरेटींग सिस्टीम एक्स.पी.
> ५ एम्. बी. हार्डडिस्क जागा
>
सि.पी.यु. वेग - ईन्टेल्© पेंटीयम© ४०० मेगाहर्ट्झ

> रॅम - २५६ एम्.बी.


डाउनलोड लिंक ->

http://downloads.cricinfo.com/db/PRODUCTS/ALERTS/InstallCricinfoDesktopAlerts_1.13.exe

Wednesday, 13 February 2008

नवा नोकिया एन् ९६


मला याचे रुप फार आवडले पण ह्याला टचस्क्रिनची सोय नाही. कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे म्हणजे छायाचित्रांचा दर्जा उत्तम राहिल.

याची ठळक वैशिष्टये खालिलप्रमाणे -
> कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा
> टी.व्ही.(डि.व्ही.बी.-एच्.) क्षमता
> २४० X ३२० पिक्सेल डिस्प्ले.
> १६ जी.बी. अंतर्गत स्मरणशक्ती

> डिजीटल म्युझिक प्लेयर
> कार्ल ऑप्टीक्स - टेसर लेन्स.
> एफ्.एम्. रेडियो.
> दृश्य रुपांतरण एमपीईजी4 मध्ये.
> दुहेरी एल्.ई.डी. फ्लॅश

Monday, 11 February 2008

विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?

विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?
विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?

मग या सेटिंग्ज करुन पहा.
1) स्टार्ट बटण दाबुन कंट्रोल पॅनलला जा.
2) तुम्ही जर Category View वर असाल तर "Date, Time, Language and Regional Options" हा आयकॉन सिलेक्ट करा आणि त्यानंतर "Regional and Language Options" हे सिलेक्ट करा.
3) आता "Regional and Language Options" सिलेक्ट करा.
४) आता Languages टॅब सिलेक्ट करा आणि खात्रि करुन घ्या की तुम्ही "Install files for complex script and right-to-left languages" हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. एक सुचना बॉक्स येइल येस वर क्लिक करा.
५) एक्स्पी ची सिडी लागेल काही फाईल्ससाठी ती इन्सर्ट करा.

हे सर्व यशस्वी करा ... आणि मराठी वापरा..

नवा नोकिया सी.डी.एम्.ए. १२५५

नवा नोकिया सी.डी.एम्.ए. १२५५

नवा नोकिया १२५५ नुकताच बाजारात आलाय . दिसायला एकदम मस्त वाटतो. त्याची वैशिष्टे खालिल प्रमाणे आहेत.
> काळा-पांढरा डिस्प्ले. ९६ X ६५ पिसेल्स.
>हॅण्डी आवाज रेकॉर्डर
> २५० फोनबुक
> दिनदर्शिका आणि घडयाळ
> हॅण्डस् फ्री स्पिकर

ह्याची किंमत नक्की माहिती नाही पण कमी असेल...सामान्यांना नक्की परवडेल...

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters