Showing posts with label संत साहित्य. Show all posts
Showing posts with label संत साहित्य. Show all posts

Wednesday, 16 April 2008

आद्य समाज सुधारक स्वामी विवेकानंद भाग - १ (धर्मसुधारणा)

धर्मसुधारणा


स्वामी विवेकानंद हे आद्य समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्म खऱ्या अर्थाने लोकांसमोर मांडला. स्वामी विवेकानंद आपल्या व्याख्यानातून धर्मातील रुढी,भोळसट कल्पना आणि जातियतेवर कठोर टीका करत.विवेकानंदाना इतर धर्मियाविषयी ही आदर होता. खरा हिंदू धर्म आणि त्याचे विचार त्यांनी विदेशात पोहचवले. स्वामींच्या काळात विदेशात हिंदू धर्माचे सुवर्णयुग होते. जगभ्रमण करुन स्वामींनी हिंदू धर्माचा प्रसार केला.

स्वामी गौतम बुध्दांनाही आपले गुरु मानत. त्यांची बौध्द धर्मावरील व्याख्यानेही विषेश गाजली.शिकागो येथे त्यांनी २७ ऑक्टोबर १८९३ ला स्त्रीयांच्या पाक्षिक सभेत बौध्द धर्मावर व्याख्यान दिले होते. त्यांची वाणी रसाळ होती. विदेशी लोक स्वांमींच्या विचारांनी मंत्रमुग्ध होत असत. स्वामींना वेंदान्त तत्वज्ञानाचा पूर्ण आभ्यास होता. त्यांनी केवळ हिंदू धर्माचाच नव्हे तर अन्य धर्मांचाही अभ्यास केला होता. याला पुरावा म्हणजे विवेकानंदानी पुज्यपाद (गुरुना) ७ ऑगस्ट १८८९ लिहिलेले पत्र. या पत्रात विवेकानंद म्हणतात की, "ख्रिस्ती सन्याशाने लिहिलेले ख्रिस्तानुसरण नावाचे पुस्तक आपणास पाठविले आहे.पुस्तक फारच सुंदर आहे.ख्रिस्ती लोकातही त्याग - वैराग्य आणि दास्यभक्ती होती हे पाहून मन विस्मयचकित होते. "

समाजसुधारणेबाबत त्यांची स्पष्ट मते होती.धर्म सोडून केलेली समाजसुधारणा त्यांना पसंत नव्हती. जातियतेवरही ते कठोर टीका करत. समाजसुधारणा करण्याकरीता हिंदूनी धर्म सोडता कामा नये अशी त्यांची धारणा होती. जातिभेद हे धर्माशी निगडीत नसून ती सामाजिक अवनतीसाठी कारणीभूत ठरलेली सामाजिक संस्था होय. अळसिंगा यांना २ नोव्हेंबर १८८३साली लिहिलेल्या पत्रात विवेकानंदानी म्हटले आहे की, "जातिभेद म्हणजे केवळ दृढ्मूल झालेली संस्था होय. तिचे कार्य संपले आहे.भारतीय समाजाची नष्ट झालेली सत्वबुध्दी पुन्हा जागृत करुन जातिभेद दुर करता येइल."

विवेकानंद सांगत की, दुसऱ्याची गुलामी कधीही पत्करु नका . स्वाधीन व्हा. स्वाधीनता हीच उन्नतीची गुरुकिल्ली आहे.स्त्रियांच्या शिक्षणाकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. धर्मप्रसार आणि धर्मसुधारणा ही दोन महत्वाची कार्य स्वामी करत होते.

क्रमशः

संदर्भ - स्वामी विवेकानंद ग्रंथावली - रामकृष्ण मठ

Monday, 25 February 2008

मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग-३)

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ १७९७ ॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥


संत ज्ञानेश्वर
भावार्थदीपिका, अध्याय १८

मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- २)

मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- २)


या सदराची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासुन करुया.

संत ज्ञानेश्वर

जन्म : १२७५ समाधी : १२९६


लिहिलेले ग्रंथ-----

>भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी
>ज्ञानेश्वर हरिपाठ
>चांगदेव पासष्टी
>अमृतानुभव


वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- १)

मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- )

हे सदर माझ्या पत्निने यापुर्वी ऑरकुटवर सुरु केले होते. आता मी ते सदर तिच्या परवानगीने या ब्लॉगवर सुरु करत आहे.

आपल्या महाराष्ट्राला हजारो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. या संत परंपरेत अनेक संतांनी श्रेष्ठ संत साहित्य निर्माण केल. अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहचविण्याच थोर कार्य संतांनी केल.
या संत परंपरेत निर्माण झालेल्या संत साहित्याची ओळख आपल्या नव्या पिढीला व्हावी म्हणून हे सदर सुरु केले आहे.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters