आज म्या वळू पाहिला...
बऱ्याच दिवसापासून वळू पाहण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली. वळू म्हणजे खराखुरा वळू नव्हे तर वळू मराठी चित्रपट. श्वासनंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपट तयार झाले. खरेतर दर्जेदार आणि चित्रपटाला होणारी गर्दी याचा काही थेट संबंध नसतो. हे नाटकालाही लागू पडतं. दर्जेदार नाटकांकडे लोक पाठ फिरवतात आणि सुमार नाटकांना गर्दी होते. असो तर मुख्य विषय हा की मी आज वळू पाहिला. माझा या चित्रपटाविषयी पूर्वग्रह फारच चांगला झाला होता. माझ्या सर्व मित्रांना हा चित्रपट अतिशय आवडला होता. ब्लॉग्जदुनियेत या चित्रपटाविषयी फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे माझ्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण चित्रपट पाहिल्यावर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी तरी चित्रपट सुमार नाही. चित्रपट चांगला झालाय. अर्थात आवड-निवड प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाची मतेही वेगळी असू शकतात.
मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. अभिनय सर्वांचा चांगला झाला आहे. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, जिवन्याच्या भूमीकेतील कलाकार, निर्मिती सावंत यांच्या भुमिका छान झाल्यात. दिलीप प्रभावळकर यांना दिलेली भूमिका प्रभावी वाटली नाही.
काही लोकांनी या चित्रपटातील चांगल्या कपडयाबद्दल घेतलेला आक्षेप मला रुचला नाही. खरे तर आता गावातील लोक चित्रपटात दाखवलेल्या कपडयांपेक्षाही चांगले कपडे परीधान करतात. कपडयांच्याबाबतीत चित्रपटात काहीही चुकीचे वाटत नाही. चित्रपट मध्यांतरापर्यंत डॉक्युमेंट्रीमध्ये अडकल्यासारखा वाटला पण मध्यांतरानंतर चित्रपट वेगवान वाटला. शेवटच्या समारोपाच्या प्रसंगात अतुल कुलकर्णीला बांधलेला वेगवान फेटा मस्तच वाटला. या चित्रपटात ग्रामीण जीवनाचे चांगले चित्रीकरण केले आहे. ग्रामीण भाषा, पेहराव योग्य वाटले. अमृता सुभाषची प्रेमकहाणी आणि ज्योती सुभाषचा डुरक्यावरील जीव ह्या दोन्हींचे फार चांगले चित्रीकरण झाले आहे. अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत. आपली मते वेगळी असू शकतात. वाचल्याबद्दल

धन्यवाद.