Friday, 11 June 2010
युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४
Saturday, 11 April 2009
अखेरची लढाई सुरु
श्रीलंकन फौजेने आता उत्तर भागात प्रवेश केला आहे. हा उत्तरेकडील भाग नो फायर झोन म्हणून ओळखला जातो. या भागात ताज्या चकमकीत 30 ते 40 तमिळ टायगर मारले गेले आहेत. श्रीलंकन सेनेने आपली आक्रमक मोहीम कायम ठेवत उत्तर भागात धडक मारली आहे. नो फायर झोनच्या पलीकडे किमान 6000 तमिळ जनता अडकल्याची बातमी आहे. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर श्रीलंकन सेनेने या जनतेची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विशेष पॉंईंट तयार केले आहेत. या ठीकाणांची माहीती जनतेला मिळावी यासाठी लाउडस्पिकरवरुन जनतेला सुचना दिल्या गेल्या. अशाप्रकारचे मानवतावादी अभियान जगात प्रथमच केल्याचा श्रीलंकन सेनेचा दावा आहे. तमिळ टायगर आणि श्रीलंकन सेनेच्या लढाईत निष्पाप जनेतेचा बळी जाउ नये हीच प्रार्थना आपण करु शकतो.Sunday, 15 June 2008
परदेशातील भारतीय सुरक्षित ?
परदेशातील भारतीय सुरक्षित ?
आजच्या घडीला लाखो भारतीय परदेशात जीवन जगत आहेत. काहींना इंग्रजांनी जबरदस्तीने गुलाम म्हणून नेले तर काही पोटापाण्यासाठी परदेशात गेले. काही परदेशातील पगार आणि राहणीमानाच्या आकर्षणाने गेले. हे सर्व आपलेच. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द आपण आवाज उठविला पाहिजे. आजही भारतीय व्यक्ती या लोकांना भारताचे प्रथम दर्जाचे नागरीक मानत नाहीत. वर्षानुवर्षे मलेशियात वास्तव्य असलेल्या भारतीयांची हीच व्यथा आहे. मलेशियात मंदीरे तोडली गेली. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. फिजीत भारतीय पंतप्रधानांची सत्ता उलटवली गेली. या सर्व घटनांचे संपूर्ण जग साक्षिदार आहे.
गेल्या वर्षी अमेरीकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या घटना ताज्या आहेत. खरे तर जातियवाद,वंशवाद आपल्या देशाला नवीन नाही. पण काळे-गोरे भेदभाव आपल्याकडे नाही. हा भेदभाव विदेशात अजूनही आहे. थोडया प्रमाणात असला तरी त्याचा फटका काही प्रमाणात भारतीयांना बसतो. विश्व व्यापार केंद्रावरच्या हल्ल्यानंतर तर प्रत्येक आशियाई व्यक्तीकडे संशयाने पाहिले जावू लागले. अमेरीकेत शिखांवर झालेले हल्ले हे गैरसमजुतीमुळे झाले होते. अनेक भागात असे हल्ले झाले. ऑस्ट्रेलियातील भारतीय डॉक्टरला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक ताजी आहे. समजा अमेरीका किंवा इंग्लंडच्या नागरीकांना अशी वागणूक मिळाली असती तर ते देश गप्प राहिले असते का?
Wednesday, 11 June 2008
समुद्र किनाऱ्यावर बॉम्बचे फ्युज
समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्यूज

सोमवारी मालवणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्युज आढळून आले आहेत. मालवणमधील देवबाग समुद्रकिनाऱ्यावर ह्या बॉम्बची पेटी ग्रामस्थांना आढळून आली. लढाऊ विमानातून फेकण्यात येणाऱ्या बॉम्बबरोबर हा फ्युज जोडला जातो शक्तिशाली स्फोटासाठी हा फ्युज बॉम्बबरोबर जोडला जातो. मोठया युध्दनौका नष्ट करण्यासाठी ह्या बॉम्बचा वापर होतो. नजिकच्या काळात कोणतेही मोठे युध्द झालेले नाही. मग हे फ्युज आले कुठून ?

गोवा येथील नौदलाच्या पथकाने सदर फ्युजची तपासणी केली. तत्पूर्वी देवबाग या ठीकाणी उच्च दाबाचे कार्बनाडाय ऑक्साइड वायु भरलेले सिलेंडर आढळून आले होते. वेंगुर्ले परीसरातही असे तीन सिलेंडर सापडले होते.
समुद्रकिनाऱ्यावर वारंवार अशा संशयास्पद वस्तू आढळून येतात.ही भावी युध्दाची तयारी तर नव्हे ना? या वस्तू शत्रुच्याही असू शकतात त्यामुळे त्यांची योग्य दखल सरकारने घ्यावी.
Wednesday, 14 May 2008
नागरी सुरक्षा
जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुंबई अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अशा बॉम्बस्फोटांच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
नागरीकांनी घ्यावयाची काळजी
- तुमच्या दुकानात किंवा परीसरात येणाऱ्या प्रत्येक बॉक्स,पॅक,बॅगची कठोर तपासणी करा.
- एकांतात ठेवलेली आणि संशयित वाटणारी पॅकेजीस,बॅग्जबद्दल ताबडतोब जवळच्या पोलिस स्थानकास माहिती द्या.
- आपल्या दुकान किंवा घराच्या परीसरात एखादी अनोळखी वा संशयित व्यक्ती फिरत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
- मालक नसलेल्या गिफ्ट बॉक्स, खेळणी यांना हात लावू नका.
- तुमच्या परीसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासून पहा.
- जागा भाडयाने देताना त्या व्यक्तिची ओळख तपासून पहा. त्यासंबंधीत कागदपत्रे स्वतःजवळ ठेवा.
आणिबाणीच्या काळात प्रशासनाशी सहकार्य करा आणि शांतता राखा.