Showing posts with label कोकण. Show all posts
Showing posts with label कोकण. Show all posts

Tuesday, 22 May 2012

रामेश्वर मंदीर वेंगुर्ला, सिंधुदुर्ग

रामेश्वर मंदीर वेंगुर्ला, सिंधुदुर्ग 

Thursday, 23 February 2012

तेरेखोल

तेरेखोल [ वेंगुर्ला तालुका आणि पेडणे तालुका उत्तर गोवा ] एकच गाव पण दोन तालुक्यात ? आश्चर्य वाटतंय ना? मित्रांनो तेरेखोल हा गाव वेंगुर्ला तालुक्यात येतो पण याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला) फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध असतात.


जवळची प्रेक्षणीय स्थळे
१) तेरेखोल नदी
२) तेरेखोल किल्ला
३) रेडी गणपती मंदीर
४) टाटा इस्पात कंपनी रेडी
५) आरोंदा
६) तेरेखोल हेरिटेज रिसोर्ट, गोवा सरकार
७) तेरेखोल बीच
८) शिरोडा बीच
९) आरवली वेतोबा (दक्षिण काशी)
१०) उभादांडा बीच
११) वेंगुर्ला
१२) केरी बीच (पेडणे)


Sunday, 29 May 2011

प्राचीन कोकण संस्कृती

काही  दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय. 

गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा - पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या  परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली  डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे. 

२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्‍रॉन जेटी, वेळणेश्‍वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे  समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.    

८०००  वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची. 
   


Tuesday, 15 June 2010

घन घन माला नभी दाटल्या


रत्नागीरीत मान्सुनच जोरदार आगमन झाल आहे. गेले दोन दिवस रत्नागीरीत मान्सूनचा पाउस पुर्ण सक्रिय झालाय. गडगडणाऱ्या विजा आणि धुंद करणार वातावरण मन मोहुन जात. अशा या मस्त पाऊसात मी भजी आणि सोबत गरम गरम चहा पितोय आणि मंद आवाजात "घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा" हे माझ सर्वात आवडत गाण पण चालु आहे. अहा.. मस्तच. मी शब्दात नाही सांगु शकत. अरे समोरच वीज पडली. अगदी लाइव्ह ब्लॉग लिहीतोय मी. चला आता लाइट जाइल.

Enjoy mansoon..

Thursday, 8 April 2010

लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर



लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे विचार परखडपणे मांडणारे टिळक माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या घरी एक छोटे म्युझिअम आहे. त्यात त्यांनी वापरलेल्या वस्तु आणि तत्कालीन पत्रे संग्रहीत करण्यात आली आहेत. त्यांच्या घरानजिकच टिळक आळीतील ऐतिहासिक गणेश मंदिर आहे. जर मागे कॉंग्रेसचे पुरातन कार्यालय आहे. जिथे अनेक महान नेते वास्तव्य करुन गेले आहेत.

Saturday, 28 November 2009

फयान नंतर

फयान नंतर

फयानने दक्षिण कोकणात धुमशाण घातले. काही भागात दोन आठवडे वीज नव्हती. तर काही भागात अजुन वीज नाही आहे. मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी मोठया प्रमाणावर झाली. पण आश्चर्य म्हणजे सरकारने योग्य मदत पुरवली नाही.अजुनही अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. त्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. सुरवातीला तर सरकारी यंत्रणेने हे मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. केवळ जिवंत मच्छीमार मिळाले तरच त्यांना बोटीत घेवु अशी भुमिका संवेदनाशुन्य सरकारी यंत्रणेने घेतली होती मात्र नंतर मिडीयाने आवाज उठवताच ही भुमिका बदलली. या विषयावरुन हायकोर्टानेही सरकारला फटकार लगावली आहे. पण अजुनही सरकार जागे झाले असे वाटत नाही.

अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही.

काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.

Monday, 25 May 2009

सांज ये गोकुळी सावळी सावळी

सांज ये गोकुळी सावळी सावळी



Saturday, 6 December 2008

Thursday, 19 June 2008

एक दशावतार कलाकार प्रवेशाच्या तयारीत

एक दशावतार कलाकार प्रवेशाच्या तयारीत




Wednesday, 11 June 2008

समुद्र किनाऱ्यावर बॉम्बचे फ्युज


समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्यूज



सोमवारी मालवणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्युज आढळून आले आहेत. मालवणमधील देवबाग समुद्रकिनाऱ्यावर ह्या बॉम्बची पेटी ग्रामस्थांना आढळून आली. लढाऊ विमानातून फेकण्यात येणाऱ्या बॉम्बबरोबर हा फ्युज जोडला जातो शक्तिशाली स्फोटासाठी हा फ्युज बॉम्बबरोबर जोडला जातो. मोठया युध्दनौका नष्ट करण्यासाठी ह्या बॉम्बचा वापर होतो. नजिकच्या काळात कोणतेही मोठे युध्द झालेले नाही. मग हे फ्युज आले कुठून ?


* याच किनाऱ्यावर फ्युज सापडले


गोवा येथील नौदलाच्या पथकाने सदर फ्युजची तपासणी केली. तत्पूर्वी देवबाग या ठीकाणी उच्च दाबाचे कार्बनाडाय ऑक्साइड वायु भरलेले सिलेंडर आढळून आले होते. वेंगुर्ले परीसरातही असे तीन सिलेंडर सापडले होते.

समुद्रकिनाऱ्यावर वारंवार अशा संशयास्पद वस्तू आढळून येतात.ही भावी युध्दाची तयारी तर नव्हे ना? या वस्तू शत्रुच्याही असू शकतात त्यामुळे त्यांची योग्य दखल सरकारने घ्यावी.

Thursday, 5 June 2008

हिरण्यकेशी

हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी
हिरण्यकेशी हे पर्यटनस्थळ आंबोली गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा. >हिरण्यकेशी


पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता






Sunday, 1 June 2008

ही वाट दूर जाते...

Sunday, 11 May 2008

द ग्रेट मालवण



ग्रेट मालवण (ऑइलपेंट इफेक्ट)

सर्वाधिकार वामन परुळेकर

सर्व छायाचित्रे © अंतर्गत सुरक्षित

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters