Showing posts with label राष्ट्रवाद. Show all posts
Showing posts with label राष्ट्रवाद. Show all posts

Thursday, 8 April 2010

लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर



लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे विचार परखडपणे मांडणारे टिळक माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या घरी एक छोटे म्युझिअम आहे. त्यात त्यांनी वापरलेल्या वस्तु आणि तत्कालीन पत्रे संग्रहीत करण्यात आली आहेत. त्यांच्या घरानजिकच टिळक आळीतील ऐतिहासिक गणेश मंदिर आहे. जर मागे कॉंग्रेसचे पुरातन कार्यालय आहे. जिथे अनेक महान नेते वास्तव्य करुन गेले आहेत.

Monday, 17 August 2009

शाहरुख खान

शाहरुख खान यांचा जो अपमान एका अमेरीकन विमानतळावर झाला त्यावरुन बरेच वादळ निर्माण झाले होते. गेले दोन दिवस एकच विषय बऱ्याच वाहिन्यांनी चघळला असेल. अनेक ब्लॉगर्सनी तर शाहरुखलाच दोषी धरलय. म्हणे या विषयाचा खुपच बाउ केला गेला. अमेरीकन नागरीकाला इतर देशात अशी वागणूक मिळाली असती तर? अमेरीका गप्प बसल असत का? एका विशेष आडनावामुळे त्याला ही वागणूक दिली गेली आहे का ? हा एक वादाचा विषय आहे. तस असेल तर ते दुर्भाग्यपुर्ण आहे.

मागे न्युयॉर्क चित्रपटात असाच एक विषय हाताळला होता. सगळ्याच आशियाइ लोकांना एकाच चष्म्यातून बघण्याचा अमेरीकन दृष्टीकोन चुकीचा आहे यात शंकाच नाही. हा समज बदलण्यासाठी भारतीय सरकारनेही प्रयत्न करावेत. केवळ एकसारखे दिसण हा काही गुन्हा होउ शकत नाही. सुरक्षेसाठी तपासणी समजता येइल पण त्यासाठी दोन-दोन तास ताब्यात घेण्याची गरज नाही.

Thursday, 13 August 2009

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा. दोन दिवसानंतर आपण नव्या युगात प्रवेश करु. या निमित्ताने गेल्या वर्षी सुरु केलेली "स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे" ही लेखमाला पुर्नप्रकाशीत करत आहे. धन्यवाद.

स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-1)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्म - २३ जुलै,१८५६ -- मृत्यू - १ ऑगस्ट, १९२०
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

टिळकांनी बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा,होमरूल चळवळ,लखनौ करार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. केसरी , मराठा सारखी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढयात महत्त्वपूर्ण ठरली.
टिळकांना साहित्यातही रुची होती त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा.
>आर्यांचे मूळ वसतीस्थान
>ओरायन
>गीतारहस्य



स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-2)
महात्मा मोहनदास करमचंद गांधी

जन्म - ऑक्टोबर २, १८६९ -- मृत्यू - जानेवारी ३०, १९४८

महात्मांचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात झाला होता. गांधींनी इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करुन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रीकेत त्यांनी वर्णव्देषा विरुध्द दिर्घकालीन लढा दिला.

भारतात परतल्यावर ते स्वातंत्र्य लढयात सक्रीय झाले. मिठ सत्याग्रह,दांडी यात्रा,विदेशी हटाव,स्वदेशी जागरण,भारत झोडो ही ऎतीहासिक आंदोलने बापुंनी उभारली. भारतात असलेल्या अस्पृश्यता निवारणा साठी त्यांनी प्रयत्न केले.

महात्मा गांधी हे ज्या महात्मा या उपाधीने ओळखले जात ती उपाधी त्यांना रविंद्रनाथ टागोरांनी दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. जानेवारी ३०, १९४८ ला नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधींची गोळ्या घालुन हत्या केली. आणि संपूर्ण भारत दुःखाच्या महासागरात लोटला गेला.....

Monday, 18 May 2009

सिंग इज किंग

सिंग इज किंग


सिंग इज किंग बऱ्याच दिवसांनी भारतीय जनतेने एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करण्याची मतांद्वारे अनुमती दिली आहे. भारतीय जनता घोडाबाजाराला वैतागली होती. छोटे प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे सरकारची अडवणुक करायचे हे जनतेने पाहिले होते. जनतेला पुन्हा असे सरकार नको होते जे या पक्षांवर अवलंबून राहिल. जनतेने स्थैर्याला महत्त्व दिले यात वाद नाही. या विजयाचे श्रेय केवळ जनतेलाच नाही तर कॉंग्रेस पक्षालाही आहे. कॉंग्रेसचे नेते स्थिर सरकारचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षात सरकारने जी कामे केली ती सोनिया गांधी,मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी लोकांपर्यत पोहचवली. भाजपच्या नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. प्रचारात वापरण्यात आलेली भाषाही लोकांना आवडली नाही.

मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.

पक्षीय बलाबल

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

206

भारतीय जनता पार्टी

116

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

21

तृणमुल कॉंग्रेस

19

द्रवीड मुन्नेत्र कळघम

18

पक्षीय बलाबल - महाराष्ट्र

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

25

भारतीय जनता पार्टी+

20

पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

26

भारतीय जनता पार्टी +

10

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

20

Monday, 30 March 2009

विकास हाच प्रमुख मुद्दा असावा.

विकासाचा मुद्दा हवा.

गेल्या अनेक निवडणुकात या देशात अनेक प्रयोग झाले. गरीबी हटाव,शीख दंगलीच भांडवल,बोफोर्स,राम मंदीर,इंडीया शायनिंग अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. कधी कांद्याने कोणाला रडवले तर कधी तोफेने. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भावनिक मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्माधर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न चालु झाले आहेत. हे सर्व कुटील डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

उमेदवार निवडताना त्याची जात,धर्म कोणता हे पहाण्यापेक्षा त्याने कोणती विकासाची कामे केली आहेत ते पहाणे जरुरीचे आहे. उमेदवाराच्या भावी योजना काय आहेत? तो सर्वसामान्यांमध्ये मिसळू शकतो का? उमेदवार भ्रष्टाचारी तर नाही ना? देशस्तरावरील प्रश्नांची त्याला जाण आहे का? उमेदवार नवीन असेल तर यापुर्वी काम केलेल्या क्षेत्रातील त्याचे कार्य कसे होते हे जरुर तपासुन पहावे.


Sunday, 29 March 2009

लोकसभा २००९

लोकसभा २००९
हरेकृष्णाजी तुम्ही चांगला विषय निवडलात. हरेकृष्णाजी हे मराठीतील आघाडीचे ब्लॉगधारक आहेत. नवीन मंत्रीमंडळ कोणत्याही पक्षाचे असो त्यात विचारवंत आणि तज्ञ लोकांचा भरणा असणे गरजेचे आहे. प्रामाणिक लोकांची देशाला गरज आहे. देशाचे प्रांतवाद ,धर्मवाद,जातीवाद यामुद्यांवर विभाजन करणे सोपे आहे पण देश जोडणे फार कठीण आहे. काही वर्षांपुर्वी भारत जोडो अभियानाने एक प्रयत्न केला होता. देश अखंड ठेवण्यासाठी अशा अभियानांची गरज आहे. विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे. सुरक्षेचा मुद्दा पण महत्वाचा आहे. मी काही नेत्यांची नावे जी मला योग्य वाटली ती देत आहे. अन्य ब्लॉग धारकांनी जरुर नावे सुचवावीत.

श्री. डॉ.मनमोहन सिंग
श्री. डॉ..पी.जे.
श्री. शाहनवाज हुसेन
श्री. सुरेश प्रभु
श्री. प्रो. बासुदेव बर्मन (सी.पी.आय.एम्.)
श्री.डॉ.सुजन चक्रवर्ती (सी.पी.आय.एम्.)
श्री. प्रणव मुखर्जी
श्री. अंबुमणी रामदास
श्री. पी. चिदंबरम
श्री. प्रफुल्ल पटेल
श्री. प्रकाश करात
श्री. शीला दिक्षित (खासदार नाही पण मंत्री होण्यास लायक)
श्री.अभिषेक सिंघवी
श्री.डॉ.तुषार चौधरी

तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांना महत्व द्यावे असे तुम्हाला वाटते ? आपली मते जरुर नोंदवा. हरेकृष्णाजी आपणही आपली मते जरुर मांडा.

Thursday, 19 June 2008

राष्ट्रवाद

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार काही लोकांना पहावत नाही. कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी हिंसा करुन काय मिळणार आहे? काहीवेळा तर आंदोलनातील हिंसेमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यावेळी या आंदोलकांचा राष्ट्रवाद कोठे जातो कोण जाणे? स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?


आपल्यातला राष्ट्रवाद संपत चालला आहे असे मला वाटते. याची कारणे अनेक आहेत. भ्रष्टाचार हे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार आणि पैशाची भूक ही आपल्या व्यवस्थेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ह्या पैशाच्या भूकेमुळे अनेक देशद्रोही तयार होतात. दहशतवादी येथे घुसखोरी करतात आणि आपल्या योजना यशस्वी करतात, त्या काय भारतीयांच्या मदतीशिवाय? हे स्वकिय शत्रु कोणत्याही धर्माचे असु शकतात. त्यांचा मतलब फक्त पैशांशी असतो. ज्या भारतात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पैसे मोजावे लागतात त्या भारतात अशा कारवाया करणे सोपेच आहे. शत्रु राष्ट्रांना दोष देवूयाच पण त्याचबरोबर स्वतःच्या दोषांचे काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसे आपल्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे देतात. या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर काय संस्कार होणार? माझ्यामते भ्रष्टाचार हा राष्ट्रद्रोहच आहे.

परकियांच्या दहशतवादाबरोबरच आता स्वकियांचाही दहशतवाद सुरु झाला आहे. काही लोक व्देषाचे विष पाजून देशाचा सर्वनाश करत आहेत. स्वतःच्या माणसांचे जीव घेण्यासाठी बॉम्ब तयार करायचे काम सुरु झाले आहे. हे वेळीच थांबवले नाही तर आपल्या देशाची स्थिती जाती, वंश आणि धर्मांच्या युध्दांनी रसातळाला गेलेल्या आफ्रिकन देशांसारखी होइल. भारत एके काळी विश्वगुरु म्हणून गौरवला गेला होता. तीच स्थिती पुन्हा आणायची असेल तर राष्ट्रवाद जागृत करावा लागेल.

काही लोक राष्ट्रवाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतात. हे राष्ट्रवाद वगैरे आपल्याला काही जमणार नाही असे बऱ्याच जणांचे विचार असतात. सर्वसामान्य माणूस काय करु शकतो असेही प्रश्न उठतात. काही सोप्या गोष्टी सांगतो ज्या आपण करु शकतो. प्रथम तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच योग्य वापर करा. आपण मतदानच करत नसाल तर देशाला चांगले नेतृत्त्व कसे मिळेल? स्वतःच्या परीसराची स्वच्छता ठेवा. तुमच्या घरीभाडेकरु ठेवताना त्याची कागदपत्रे तपासून पहा. शेजारीपाजारी काही संशयास्पद वाटल्यास त्याची खबर योग्यत्या अधिकाऱ्यांना द्या. माहितीच्या अधिकाराचा वापर करा.

आपण आपल्या संस्कृतीत देशाला,भूमीला माता मानतो. या मातेची खरी सेवा करायची असेल तर देशाशी प्रामाणिक राहा. तीच खरी देशसेवा होइल.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters