Showing posts with label क्रिकेट. Show all posts
Showing posts with label क्रिकेट. Show all posts

Sunday, 20 April 2008

साल २८०८

साल २८०८

स्थान - महाराष्ट्र इतिहास वाहिनी (अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त),
महाराष्ट्र

भाषा - मराठी असेलच असे सांगता येत नाही पण कल्पना करुया.

नमस्कार आपले स्वागत इतिहास २४ तासवर . आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या संशोधकांना २००८ सालातील काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन माणसे क्रिकेट या खेळाची खूप शौकिन होती असे दिसते. आमच्या संशोधकांना काही वृत्तपत्रांची कात्रणे आणि चित्रफिती मिळाल्या आहेत. त्याचे संशोधन चालू आहे. २१०७ च्या दरम्यान पुराखाली दबल्या गेलेल्या एका मोठया शहरात उत्खननात हे पुरावे सापडले. तत्कालीन पुराव्यानुसार क्रिकेट या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा भारतदेशी खेळवली जात असे.

सापडलेले पुरावे अर्धवट स्थितीत असल्यामुळे आणि लिपी अवघड असल्यामुळे पूर्ण माहिती मिळालेली नाही. ह्या स्पर्धेचे नाव आय्.पी.एल्. होते. ली नामक एक खेळाडू पंजाब संघाकडून खेळायचा. हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. यावरुन स्पष्ट होते की लींचे मूळ पंजाबात असावे. तत्कालीन भारत देश हा प्रचंड श्रीमंत देश असावा कारण एका खेळाडूला करोडो रुपये मानधन दिले जात होते. काही खेळाडूंची नावे आमच्या हाती लागली आहेत. यात ब्रेट ली, सचिन, राहूल आणि शाहरुख खान नामक खेळाडूंचा समावेश आहे. हा शाहरुख खान एका संघाचा मालक असूनही १२ वा खेळाडू होता. त्याच्याकडे खेळाडूंना पाणी देण्याचे काम असावे.

मिळालेल्या पुराव्यानुसार असे सिध्द होते की तत्कालीन कलाकार हे उरलेल्या वेळेत क्रिकेट खेळायचे. तत्कालीन क्रिकेटचे सर्वेसर्वा पवार हे व्यक्ती होते. त्यांनीच ह्या स्पर्धेची सुरुवात केली.

Thursday, 27 March 2008

चांगली सुरुवात



आज दिवस अखेर भारताने एकही गडी न गमावता २१ षटकात ८२ धावा केल्या. द.आफ्रिकेच्या ५४० या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने आज चांगली धावगती राखली. विरेंद्र सेहवागने आज आपले या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. दिवस अखेर तो ५२ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या बाजूने जाफरने त्याला चांगली साथ दिली. त्याने २५ धावा फटकावल्या.

तत्पूर्वी द.आफ्रिकेने ५४० धावांचा डोंगर उभा केला. हरभजन सिंग ने ५ बळी मिळवले. भारतीय गोलंदाजानी ऑस्ट्रेलियात चांगली कामगीरी करुन देखील अशी खेळपट्टी का बनवली गेली हा प्रश्न मला पडलाय. खेळपट्टीमध्ये जानच दिसत नाही. गोलंदाजांना या खेळपट्टीचा कोणताच फायदा होत नाही आहे. आणखी एक पाटा खेळपट्टी.

उद्याचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात द्यायला हवी. तरच आपण तग धरु शकू.

- वामन परुळेकर

Tuesday, 19 February 2008

अखेर भारत विजयी


धोनी आणि युवराजच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात विजयश्री खेचून आणली. एक वेळ भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता पण महेंद्रच्या संयमी खेळीमुळे आपण विजयी झालो. अखेर भारतीय संघाने पराभवाची साखळी तोडली. पहिल्या सत्रात काही वेळ भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व होते. नंतर मात्र संघकारा आणि महेला जयवर्धनेने चांगली भागीदारी निभावली. शेवटच्या षटकांमध्ये चांगली फटकेवाजी झाली.

भारताची सुरुवात खराब झाली सचिन शुन्यावर बाद झाला. संघाची पडझड धोनी आणि युवराजने रोखली. धोनीने एक बाजू लावून धरली आणि शेवटी त्यानेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.

Monday, 18 February 2008

आज अतिमहत्त्वाचा भारत - श्रीलंका सामना

आज अतिमहत्त्वाचा भारत - श्रीलंका सामना ऍडलेट ओव्हल येथे रंगणार आहे. भारतासाठी हा सामना फार महत्त्वाचाआहे. गेल्या सामन्यात पराभव स्विकारणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास डळमळित आहे. मुनाफ आणि युवराजपूर्ण फिट वाटत नाहीत. हा सामना भारताला जिंकावाच लागेल नाहीतर पुढची वाट बिकट आहे.

भारतीय गोलंदाजी भक्कम स्थितीत आहे, प्रश्न आहे तो फलंदाजीचा. आपली फलंदाजी सातत्याने अपयशी होतेय. युवराजला अद्याप सुर गवसलेला नाही. भारताचा पाच फलंदाज घेउन खेळायचा डावही फसला आहे. आज कदाचितभारत सहा फलंदाजांसह उतरेल.

भारत विजयी होवो हीच प्रार्थना..

Sunday, 17 February 2008

क्रिक-इंन्फो चे डेक्सटॉप अलर्ट

क्रिक-इंन्फो चे डेक्सटॉप अलर्ट



क्रिकेटच्या ताज्या बातम्या, हलता धावफलक आणि विकेट अलर्ट तुम्ही तुमच्या डेक्सटॉप वर पाहू शकता. तेही मोफत डाउनलोडने. या सॉफ्टवेअरचे वैशिष्टय म्हणजे यावर तुम्ही तुमच्या इतर आवडत्या संकेतस्थळावरील बातम्यांचे फीड देउ शकता. आणि स्कोअर सोबतच बातम्याही पाहू शकता. फक्त यासाठी इंटरनेटची गरज आहे.

यासाठी खालिल गोष्टींची गरज आहे.

> इंटरनेट कनेक्शन
> विंडोज ऑपरेटींग सिस्टीम एक्स.पी.
> ५ एम्. बी. हार्डडिस्क जागा
>
सि.पी.यु. वेग - ईन्टेल्© पेंटीयम© ४०० मेगाहर्ट्झ

> रॅम - २५६ एम्.बी.


डाउनलोड लिंक ->

http://downloads.cricinfo.com/db/PRODUCTS/ALERTS/InstallCricinfoDesktopAlerts_1.13.exe

Tuesday, 12 February 2008

इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव



क्रिकेट इंग्लंडने आज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. सामना पूर्ण एकतर्फी वाटत होता. एकटया अलस्टर कुकचा अपवाद वगळला तर पुर्ण संघाने निराशा केली. इंग्लंडने १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्युझिलंडने सर्व गडी राखुन १८ षटकात विजय मिळवला.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters