Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Saturday, 2 June 2012

हिंदी चित्रपटांचा रावडी हंगाम

उन्हाळी हंगाम हा पुन्हा एकदा हिंदी सिनेमाचा सुवर्ण हंगाम ठरला. लाखोंच पोट भरणाऱ्या या चित्रपट उद्योगाने या दरम्यान खूप नफा कमवला. ६ चित्रपट सुपर हिट झाले तर दोन हिट. सर्वात जास्त अक्षय कुमारच्या हाउसफुल २ ने कमावले. आजच्या तारखेपर्यंत ११५ कोटी रुपये हाउसफुल २ ने कमावले आहेत. एका मागून एक सुपरहिट चित्रपट देणारा सुपरस्टार इम्रान हाशमी कसा मागे राहील. त्याचा जन्नत २ सुपरहिट ठरला. एकूण ४३ करोड या चित्रपटाने कमावले आहेत आणि अजूनही चित्रपट चांगलाच चालतो आहे. इशकजादे आणि विकी डोनर हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. दोन्ही चित्रपटांची ३७ करोड ची कमाई झाली आहे.

आता या यशस्वी चित्रपटांच्या यादीत रावडी राठोड ची भर पडणार आहे. पहिल्याच दिवसात रावडी राठोड चित्रपटाने १६ करोड ची कमाई केली आहे जी रेकॉर्डतोड कमाई आहे. सिंगल स्क्रीनला तर हा चित्रपट १००% चालतोय. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. अक्षयचा हा एका वर्षातला दुसरा सुपरहिट चित्रपट आहे. या महिन्यात इम्रानचा शांघाय रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कायम सुपरहिट देणारा इम्रान हाशमी आपल रेकॉर्ड कायम ठेवेल हे प्रोमो वरूनच कळून येतय.

Wednesday, 7 March 2012

राष्ट्रीय पुरस्कार

देऊळ आणि बालगंधर्व या चित्रपटांच्या टीमचे मनापासून अभिनंदन. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊळ या मराठी चित्रपटाला जाहीर झाला आहे. देऊळ चित्रपटातील कलाकार गिरीष कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाही प्रादेशिक चित्रपटांचा दबदबा कायम राहिला. बालगंधर्व या मराठी चित्रपटाला मेकअप आणि वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर्वांचे हार्दिक अभिनंदन. असेच दर्जेदार मराठी चित्रपट सतत मराठीचा झेंडा फडकवत ठेवतील हीच अपेक्षा.

Thursday, 29 December 2011

भालजी पेंढारकर

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त कोल्हापूरचे सुपुत्र महान मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. व्ही शांताराम त्यांचे मावसभाऊ होते. भालजींची आई राधाबाई आणि व्ही. शांताराम यांची आई कमलाबाई या सख्या बहिणी. मास्टर विनायक हे भालजींचे भाऊ. 

भालजींनी अनेक महान मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि दिग्दर्शनही केले. त्यांचे छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा, साधी माणस, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, बहिर्जी नाईक, बाजीराव मस्तानी, महाराणी येसूबाई, वाल्मिकी, मीठ भाकर, सुनबाई हे चित्रपट खूप गाजले. ते मराठी चित्रपटांचे सुवर्णयुगच होते. मूक चित्रपटांपासून भालजींनी आपले करीयर सुरू केले. प्रसिद्ध प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केले. कोल्हापूर चित्रपटसृष्टीतील इतर स्टुडियोतही त्यांनी काम केले. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. त्यांनी काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली त्यात छत्रपती शिवाजी, महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांचा समावेश आहे. 

१९८१ चा गनिमी कावा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १९९१ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Monday, 13 October 2008

चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....

चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....

ज्या ज्या प्रेक्षकांनी रजनीचा चंद्रमुखी पाहिला आहे त्यांच्या डोक्यात रजनीचा "लकालकालकालका" हा डायलॉग नक्कीच फिक्स बसला असणार. २००५ साली चंद्रमुखी ने चित्रपट उद्योगात वादळ निर्माण केले होते. चेन्नाईत सलग तिनशे दिवस या चित्रपटाने व्यवसाय केला होता. पहिल्या काही दिवसातच चित्रपटाने ८०कोटीचा गल्ला जमा केला होता.या चित्रपटाने भारतातच नव्हे तर परदेशातही चांगला व्यवसाय केला. जपानमध्ये या चित्रपटाला अफाट यश मिळाले. असे म्हणतात की या चित्रपटाच्या प्रभावामुळे अनेक जपानी मुलींनी तमिळ मुलांशी लग्ने केली. या चित्रपटाचा प्रभाव एवढा होता की जसे शोलेचे संवाद आजही अन्य चित्रपटांत व जाहिरातीत वापरले जातात तसेच चंद्रमुखीचे काही संवाद अन्य चित्रप्टात वापरले गेले. राघव यांचा सुप्रसिध्द तेलगु चित्रपट स्टाईल मध्ये रजनी लकालका संवाद वापरला गेला. त्यावेळी रजनीकांत म्हणजेच शिवाजीने या चित्रपटासाठी १५ कोटी घेतले. त्यावेळी हे मानधन कोणत्याही बॉलीवूड कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक होते. जॅकी चेन नंतर आशियात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यात रजनीचा दुसरा नंबर होता.




चंद्रमुखीची कथा अन्य भारतीय चित्रपटांपेक्षा वेगळी होती. गंगा आणि तिचा पती सेंथील हे कोणतीही अंधश्रध्दा पाळत नसतात. ते गावातला एक राजवाडा विकत घेतात. लोकांची अशी अंधश्रध्दा असते की त्या राजवाडयात भुत राहतात. त्यामुळे त्या राजवाड्याकडे कोणीही फिरकत नसतं. कालांतराने गंगाला त्या राजवाडयाची खरी कथा कळते. गंगा स्वतःलाच कथेतील नर्तिका समजू लागते. चित्रपटात कथेची मांडणी फार सुंदर झाली आहे. विनोद,हाणामारी,सस्पेन्स,हॉरर अशा सर्व गोष्टी या चित्रपटात होत्या. १५० वर्षांपूर्वी घडलेली कथा आणि त्या कथेचा नायिका गंगा हिच्यावर पडलेला प्रभाव, दुसरी नायिका दुर्गावर असलेला संशय ह्या सगळ्याच उत्तम चित्रीकरण झाले आहे. चंद्रमुखी ज्या कथेवर बेतला आहे त्याच कथेवर एक मल्याळम चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. त्या यशापासून प्रेरणा घेउन पी.वासू यांनी चंद्रमुखी तयार केला. चंद्रमुखीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी तो हिंदीत करायचा ठरवला. भुल-भुलैया या नावाखाली तीच कथा घेउन नवा चित्रपट तयार केला. "हरे राम हरे राम हरेकृष्णा हरे राम" हे गाणे प्रचंड गाजले. चित्रपटानेही चांगला व्यवसाय केला. 

अक्षयकुमार आणि प्रियदर्शन या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक सुपरहीट चित्रपट दिला. अशाप्रकारे एकाच कथेवर तीन वेगवेगळ्या भाषेत तीन वेगवेगळे सिनेमा प्रचंड गाजले. भुल-भुलैयाच्या यशानंतर चंद्रमुखी हिंदीत डब करुन प्रदर्शीत झाला. पण चित्रपट डब असल्यामुळे अपेक्षीत यश प्राप्त करु शकला नाही. हिंदीत भुल-भुलैयाच सरस ठरला. मात्र जर तमिळ चंद्रमुखी आणि हिंदी भुल भुलैयाची तुलना केली तर सरस कोण हे सांगणे कठीण होइल.आशियाइ प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तमिळ चंद्रमुखी मध्ये कु-फु कराटे फाइट सीन ठेवले आहेत ते भुल-भुलय्यात नाहीत. भुलभुलय्या विनोदी अंगाने जातो पण यात हॉररही तेवढाच जबरदस्त आहे. भुल-भुलैयातील अवनी म्हणजेच विद्या बालन हिची भुमिका अप्रतीम वठली आहे. चित्रपटात ती ज्यावेळी मोंजोलीकाच रुप धारण करते तेव्हा ती खरच भयानक वाटते. तमिळ चंद्रमुखीतील गंगा (प्रसिध्द अभिनेत्री नगमाची बहिण ज्योतीका ) तेवढी भयानक वाटत नाही. रजनी आणि अक्षयची तुलना होवू शकत नाही. रजनीकांत अभिनयसम्राट तर अक्षय हिंदीतला सुपरस्टार. वेळ मिळाला तर आपणही तिन्ही चित्रपट जरुर पहा.

Friday, 27 June 2008

आज म्या वळू पाहिला...

आज म्या वळू पाहिला...

बऱ्याच दिवसापासून वळू पाहण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली. वळू म्हणजे खराखुरा वळू नव्हे तर वळू मराठी चित्रपट. श्वासनंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपट तयार झाले. खरेतर दर्जेदार आणि चित्रपटाला होणारी गर्दी याचा काही थेट संबंध नसतो. हे नाटकालाही लागू पडतं. दर्जेदार नाटकांकडे लोक पाठ फिरवतात आणि सुमार नाटकांना गर्दी होते. असो तर मुख्य विषय हा की मी आज वळू पाहिला. माझा या चित्रपटाविषयी पूर्वग्रह फारच चांगला झाला होता. माझ्या सर्व मित्रांना हा चित्रपट अतिशय आवडला होता. ब्लॉग्जदुनियेत या चित्रपटाविषयी फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे माझ्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण चित्रपट पाहिल्यावर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी तरी चित्रपट सुमार नाही. चित्रपट चांगला झालाय. अर्थात आवड-निवड प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाची मतेही वेगळी असू शकतात.

मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. अभिनय सर्वांचा चांगला झाला आहे. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, जिवन्याच्या भूमीकेतील कलाकार, निर्मिती सावंत यांच्या भुमिका छान झाल्यात. दिलीप प्रभावळकर यांना दिलेली भूमिका प्रभावी वाटली नाही.

काही लोकांनी या चित्रपटातील चांगल्या कपडयाबद्दल घेतलेला आक्षेप मला रुचला नाही. खरे तर आता गावातील लोक चित्रपटात दाखवलेल्या कपडयांपेक्षाही चांगले कपडे परीधान करतात. कपडयांच्याबाबतीत चित्रपटात काहीही चुकीचे वाटत नाही. चित्रपट मध्यांतरापर्यंत डॉक्युमेंट्रीमध्ये अडकल्यासारखा वाटला पण मध्यांतरानंतर चित्रपट वेगवान वाटला. शेवटच्या समारोपाच्या प्रसंगात अतुल कुलकर्णीला बांधलेला वेगवान फेटा मस्तच वाटला. या चित्रपटात ग्रामीण जीवनाचे चांगले चित्रीकरण केले आहे. ग्रामीण भाषा, पेहराव योग्य वाटले. अमृता सुभाषची प्रेमकहाणी आणि ज्योती सुभाषचा डुरक्यावरील जीव ह्या दोन्हींचे फार चांगले चित्रीकरण झाले आहे. अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत. आपली मते वेगळी असू शकतात. वाचल्याबद्दल 
 
धन्यवाद.

Sunday, 23 March 2008

आमीर खानचा नवा लूक

आमीर खानचा नवा लूक

हिंदी चित्रपट अभिनेता आमीर खान काल रेस चित्रपटाच्या प्रिमियर साठी आला होता. त्यावेळी त्याच्या नविन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमीरने लष्करी टाइप हेअरकट ठेवला आहे. हा नवा लूक त्याने आपल्या आगामी चित्रपट "गझनी" साठी ठेवला आहे. गझनीची कथा मूळ दक्षिणी चित्रपटाची आहे. गझनी अमिरचे घरचे निर्माण आहे. तर लवकरच आपल्या सर्वांना एक दर्जेदार चित्रपट पहायला मिळेल.


Saturday, 15 March 2008

अकबर द ग्रेट


आशुतोष गोवारीकर यांचा जोधा-अकबर अप्रतिम तर आहेच पण त्याचे संगीतही श्रवणीय आहे. ए.आर्.रेहमान यांचे संगीत आणि आषुतोष यांचे चित्रपट यांचे एक अतुट नाते बनले आहे. आशुतोष + रेहमान = हीट हे आता समिकरणच बनले आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते. तो काळ आणि त्याकाळातले वैभव यांचे जिवंत चित्रण झाले आहे. गेल्या आठवडयापर्यंत या चित्रपटाने ४८,४०,००,००० एवढे उत्पन्न मिळविले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत या चित्रपटाने लगान,गुरु,वीर-झारा यासारख्या चित्रपटांना मागे सारले आहे. सध्या ह्या चित्रपटाला हीट श्रेणीत ठेवता येइल मात्र जर ट्रेंड असाच राहीला तर हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल.

परदेशात जास्त यश

गेल्या आठवडयापर्यंत जोधा-अकबर या चित्रपटाने परदेशात ३० करोड कमावले होते. परदेशात ३० करोड पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारा हा सातवा चित्रपट ठरला आहे. एकटया अमेरीका देशात या चित्रपटाने ९ करोड कमावले होते. परदेशात हा चित्रपट सर्वकालीन सुपरहीट ठरला आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावरील बंदी उठवल्यामुळे उत्पन्न अजून वाढण्याची शक्यता आहे. येथे झालेल्या छोटया-मोठया आंदोलनांमुळे चित्रपटाला बरीच प्रसिध्दी मिळाली आहे.

Monday, 28 January 2008

अप्रतिम चित्रपट




परवाच
तारे जमीन पर बघितला. अप्रतिम चित्रपट. हजारात एखादा चित्रपट असा चांगला तयार होतो. अमिर खाननेपण जिव ओतुन दिग्दर्शन केलय. लहान मुलांच्या प्रश्नांवर आधारीत हा चित्रपट खराखुरा ह्रदयस्पर्शी आहे. मागेमराठीत श्वास हा दर्जेदार चित्रपट आलेला. त्यानंतर तेवढयाच दर्जाचा हा मी पाहिलेला दुसरा चित्रपट. आपल्या देशातलहान मुलांचे आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारलेले फार कमी चित्रपट तयार होतात आणि तयार झालेच तर फारसेचालत नाहित त्यामुळे या चित्रपटांचे यश कौतुकास्पद वाटते.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters