Showing posts with label आशिया. Show all posts
Showing posts with label आशिया. Show all posts

Saturday, 28 November 2009

फयान नंतर

फयान नंतर

फयानने दक्षिण कोकणात धुमशाण घातले. काही भागात दोन आठवडे वीज नव्हती. तर काही भागात अजुन वीज नाही आहे. मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी मोठया प्रमाणावर झाली. पण आश्चर्य म्हणजे सरकारने योग्य मदत पुरवली नाही.अजुनही अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. त्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. सुरवातीला तर सरकारी यंत्रणेने हे मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. केवळ जिवंत मच्छीमार मिळाले तरच त्यांना बोटीत घेवु अशी भुमिका संवेदनाशुन्य सरकारी यंत्रणेने घेतली होती मात्र नंतर मिडीयाने आवाज उठवताच ही भुमिका बदलली. या विषयावरुन हायकोर्टानेही सरकारला फटकार लगावली आहे. पण अजुनही सरकार जागे झाले असे वाटत नाही.

अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही.

काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.

Monday, 17 August 2009

शाहरुख खान

शाहरुख खान यांचा जो अपमान एका अमेरीकन विमानतळावर झाला त्यावरुन बरेच वादळ निर्माण झाले होते. गेले दोन दिवस एकच विषय बऱ्याच वाहिन्यांनी चघळला असेल. अनेक ब्लॉगर्सनी तर शाहरुखलाच दोषी धरलय. म्हणे या विषयाचा खुपच बाउ केला गेला. अमेरीकन नागरीकाला इतर देशात अशी वागणूक मिळाली असती तर? अमेरीका गप्प बसल असत का? एका विशेष आडनावामुळे त्याला ही वागणूक दिली गेली आहे का ? हा एक वादाचा विषय आहे. तस असेल तर ते दुर्भाग्यपुर्ण आहे.

मागे न्युयॉर्क चित्रपटात असाच एक विषय हाताळला होता. सगळ्याच आशियाइ लोकांना एकाच चष्म्यातून बघण्याचा अमेरीकन दृष्टीकोन चुकीचा आहे यात शंकाच नाही. हा समज बदलण्यासाठी भारतीय सरकारनेही प्रयत्न करावेत. केवळ एकसारखे दिसण हा काही गुन्हा होउ शकत नाही. सुरक्षेसाठी तपासणी समजता येइल पण त्यासाठी दोन-दोन तास ताब्यात घेण्याची गरज नाही.

Saturday, 11 April 2009

अखेरची लढाई सुरु

अखेरची लढाई सुरु

श्रीलंकन फौजेने आता उत्तर भागात प्रवेश केला आहे. हा उत्तरेकडील भाग नो फायर झोन म्हणून ओळखला जातो. या भागात ताज्या चकमकीत 30 ते 40 तमिळ टायगर मारले गेले आहेत. श्रीलंकन सेनेने आपली आक्रमक मोहीम कायम ठेवत उत्तर भागात धडक मारली आहे. नो फायर झोनच्या पलीकडे किमान 6000 तमिळ जनता अडकल्याची बातमी आहे. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर श्रीलंकन सेनेने या जनतेची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विशेष पॉंईंट तयार केले आहेत. या ठीकाणांची माहीती जनतेला मिळावी यासाठी लाउडस्पिकरवरुन जनतेला सुचना दिल्या गेल्या. अशाप्रकारचे मानवतावादी अभियान जगात प्रथमच केल्याचा श्रीलंकन सेनेचा दावा आहे. तमिळ टायगर आणि श्रीलंकन सेनेच्या लढाईत निष्पाप जनेतेचा बळी जाउ नये हीच प्रार्थना आपण करु शकतो.

Saturday, 14 March 2009

शांतीदूत

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात अनेक कामांचा शुभारंभ झाला

श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. कोणत्याही देशाचे खेळाडू हे शांतीदूत असतात.ते त्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असतात, त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करणे अतिरेक्यांनाच जमू शकते. हा क्रिकेटवरही हल्लाच आहे. अतिरेक्यांना खेळ आवडत नाहीत. कारण साफ आहे,खेळाने देशांचे संबंध सुधारतात. अतिरेक्यांना हेच नको आहे. त्यांना विध्वंस हवा आहे भारताने स्वतःची अंतर्गत सुरक्षा पक्की केली पहिजे. भारतातही अशा प्रकारचे हल्ले होउ शकतात. आपण सर्वांनी सावध राहीले पाहिजे..

Sunday, 15 June 2008

परदेशातील भारतीय सुरक्षित ?

परदेशातील भारतीय सुरक्षित ?

आजच्या घडीला लाखो भारतीय परदेशात जीवन जगत आहेत. काहींना इंग्रजांनी जबरदस्तीने गुलाम म्हणून नेले तर काही पोटापाण्यासाठी परदेशात गेले. काही परदेशातील पगार आणि राहणीमानाच्या आकर्षणाने गेले. हे सर्व आपलेच. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द आपण आवाज उठविला पाहिजे. आजही भारतीय व्यक्ती या लोकांना भारताचे प्रथम दर्जाचे नागरीक मानत नाहीत. वर्षानुवर्षे मलेशियात वास्तव्य असलेल्या भारतीयांची हीच व्यथा आहे. मलेशियात मंदीरे तोडली गेली. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. फिजीत भारतीय पंतप्रधानांची सत्ता उलटवली गेली. या सर्व घटनांचे संपूर्ण जग साक्षिदार आहे.

गेल्या वर्षी अमेरीकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या घटना ताज्या आहेत. खरे तर जातियवाद,वंशवाद आपल्या देशाला नवीन नाही. पण काळे-गोरे भेदभाव आपल्याकडे नाही. हा भेदभाव विदेशात अजूनही आहे. थोडया प्रमाणात असला तरी त्याचा फटका काही प्रमाणात भारतीयांना बसतो. विश्व व्यापार केंद्रावरच्या हल्ल्यानंतर तर प्रत्येक आशियाई व्यक्तीकडे संशयाने पाहिले जावू लागले. अमेरीकेत शिखांवर झालेले हल्ले हे गैरसमजुतीमुळे झाले होते. अनेक भागात असे हल्ले झाले. ऑस्ट्रेलियातील भारतीय डॉक्टरला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक ताजी आहे. समजा अमेरीका किंवा इंग्लंडच्या नागरीकांना अशी वागणूक मिळाली असती तर ते देश गप्प राहिले असते का?

Thursday, 8 May 2008

पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान

पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान

५५ वर्षांचे पुतीन रशियाने नवे पंतप्रधान होतील. पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीला पूर्ण बहुमत आहे. दोन वेळा रशियाचे राष्ट्रपतीपद भुषविलेले पुतीन तिसऱ्या वेळी रशियन कायद्यामुळे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपद स्विकारले. रशियन पंतप्रधानांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पाच वर्षात पुतीन यांनी रशियाला चांगले नेतृत्त्व दिले. रशियाची जी.डी.पी. वाढही दर्शनिय आहे. पुतीन यांच्या सरकारने भारताबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंधही कायम राखले. भविष्यातही पुतीन यांचा रशियावरील दबदबा कायम राहील यात शंकाच नाही.

Monday, 5 May 2008

इस्राइल - वय वर्षे ६०

इस्राइल - वय वर्षे ६०

येत्या १४ मेला इस्राइल राष्ट्र ६० वर्षांचे होणार आहे. १४ मे १९४८ ला इस्राइलने स्वतःला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषीत केले होते. तेव्हापासून हा देश सतत युध्दात गुंतलेला आहे. गेली साठ वर्षे इस्राइलमध्ये अशांतता आणि हिंसा नांदते आहे. घरच्या स्वकिय शत्रुबरोबरच परकिय शत्रुंचा सामना इस्त्राइलला करावा लागतो. आपले जीवन सुरक्षित नसल्याचे अनेक इस्त्राइली नागरीकांना वाटते. गेली साठ वर्षे वापरलेल्या लष्करी ताकदीचा पॅलेस्टाइनचा प्रश्न सोडवण्यात फारसा उपयोग झाला नाही.

अशा या अशांत इस्त्राइलला शांतता लाभो आणि इस्त्राइली आणि पॅलेस्टीअन लोकांचे जीवन सुखी होवो हीच प्रार्थना करुया.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters