Showing posts with label शेती. Show all posts
Showing posts with label शेती. Show all posts

Saturday, 28 November 2009

फयान नंतर

फयान नंतर

फयानने दक्षिण कोकणात धुमशाण घातले. काही भागात दोन आठवडे वीज नव्हती. तर काही भागात अजुन वीज नाही आहे. मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी मोठया प्रमाणावर झाली. पण आश्चर्य म्हणजे सरकारने योग्य मदत पुरवली नाही.अजुनही अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. त्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. सुरवातीला तर सरकारी यंत्रणेने हे मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. केवळ जिवंत मच्छीमार मिळाले तरच त्यांना बोटीत घेवु अशी भुमिका संवेदनाशुन्य सरकारी यंत्रणेने घेतली होती मात्र नंतर मिडीयाने आवाज उठवताच ही भुमिका बदलली. या विषयावरुन हायकोर्टानेही सरकारला फटकार लगावली आहे. पण अजुनही सरकार जागे झाले असे वाटत नाही.

अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही.

काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.

Wednesday, 26 March 2008

आत्महत्या चालूच

आत्महत्या चालूच

अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या जादुई बजेट नंतर देखील विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. बजेटनंतर तब्बल ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली. एवढया मोठया प्रमाणावर आत्महत्या होताना सरकारने कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहीजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून न पहाता माणुसकिच्या दृष्टीने पहायला हवे.

सर्व पक्षांनी एकत्र येवून काम करायला हवे. कार्यकर्त्यांची मोठी फौज मेळावे आणि आंदोलनात वापरण्यापेक्षा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या पुर्नवसनात व्हावा. परदेशात एका मृत्यूची देखील दखल घेतली जाते. येथे मात्र शेकडो मरुन देखिल आपले उपाय कमी पडतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच आहे पण प्रश्न अजुनही गंभीर आहे. विदर्भातील आत्महत्या हा महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी नगरीला लागलेला कलंक आहे.

गेल्या तीन दिवसात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारकडून मला अपेक्षा नाहीत. पण ईश्वराकडे एक प्रार्थना करु इच्छीतो.

"हे सर्व शक्तिमान ईश्वरा विदर्भातील शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दे."

- वामन परुळेकर

Sunday, 16 March 2008

पहारा


कोकणात आता आंब्याचा मोसम सुरु झाला आहे. आंबा,काजू,फणस,जांभुळ ही फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या दरम्यान आंब्यांच्या बागेमध्ये कडेकोट सुरक्षा असते. आंब्यांची चोरी होण्याचे प्रकार रोखण्यासाठी मालक डोळ्यात तेल घालून पहारा देतात. रात्रीच्या वेळी पहाऱ्याची खरी गरज असते. या पहाऱ्यासाठी अजूनही काही ठिकाणी कंदील वापरले जातात. आज मी रत्नागिरी येथील एका स्थानिक बागेस भेट दिली, त्यावेळी हा कंदिल मला तेथे दिसला. तेथे टिपलेले हे क्षण मी येथे पाठवत आहे.....






- वामन परुळेकर

Tuesday, 26 February 2008

उदंड झाले मेळावे.

उदंड झाले मेळावे.

आजकाल शेतकरी मेळाव्यांचे जबरदस्त पीक आले आहे. सर्व राजकिय पक्ष आणि संघटना शेतकरी मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासने दिली जातात.विविध पॅकेजची घोषणा करण्यात येते. शेतकऱ्यांसाठीच्या विविध आकर्षक योजना या मेळाव्यांमध्ये मांडण्यात येतात.

पण खरेच हे सर्व सत्यात उतरते का? आश्वासने कितपत पाळली जातात ? या सर्व मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात का? मित्रांनो शेतकरी हा आपल्या सर्वांचा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे. हा अन्नदाता जर कमजोर झाला तर काय होइल याचा विचार करा.

मी मांडलेल्या प्रश्नांबाबत आपल्याला काय वाटते? आपले विचार जरुर मांडा.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters