Sunday 20 January 2008

माझ्या आवडत्या मराठी कविता

मराठी कविता आणि गाणी अशी दोन वेगळी सदरं सुरु केलेली आहेत.कविता अन्य कवीची असल्यास ती ह्या सदरात पाठवताना माहिती असल्यास नामोल्लेख जरुर करा. चला तर जास्तीत जास्त दर्जेदार कविता लिहुया, पाठवूया. आणि वाचन संस्कृती वाढवूया.

2 comments:

Waman Parulekar said...

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुली त खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुला त नांदते मराठी
येथ ल्या फुला फुला त हासते मराठी
येथ ल्या दिशा दिशात दाट ते मराठी
येथ ल्या न गा न गात गर्ज ते मराठी

येथ ल्या दरी दरीत हिंडते मराठी
येथ ल्या वना वनात गुंजते मराठी
येथ ल्या तरु लता त साजते मराठी
येथ ल्या कलिकळीत लाजते मराठी

येथ ल्या नभामधून वर्ष ते मराठी
येथ ल्या पिकांमधून डोल ते मराठी
येथ ल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथ ल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोस ते मराठी
आपु ल्या घरात हाल सो स ते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

Waman Parulekar said...

केशवसुतांची कविता
काळोखाची रजनी होती,
हृदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे,
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यांतुनि मी होतो हिंडत
एका खिडकीतुनि सुर तदा
पडले - दिड दा, दिड दा, दिड दा!

जड हृदयी जग जड हे याचा
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसे
ते न कळे: मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे!
मग मज कैसे रूचतील वदा
ध्वनि ते - दिड दा, दिड दा, दिड दा!

सोंसाट्याचे वादळ येते,
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीति
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते - दिड दा, दिड दा, दिड दा!

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters