देऊळ आणि बालगंधर्व या चित्रपटांच्या टीमचे मनापासून अभिनंदन. यंदाचा
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊळ या मराठी चित्रपटाला
जाहीर झाला आहे. देऊळ चित्रपटातील कलाकार गिरीष कुलकर्णी यांना
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
झाला आहे. यंदाही प्रादेशिक चित्रपटांचा दबदबा कायम राहिला. बालगंधर्व या
मराठी चित्रपटाला मेकअप आणि वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन. असेच दर्जेदार मराठी चित्रपट सतत मराठीचा झेंडा
फडकवत ठेवतील हीच अपेक्षा.
No comments:
Post a Comment