तेरेखोल [ वेंगुर्ला तालुका आणि
पेडणे तालुका उत्तर गोवा ] एकच गाव पण दोन तालुक्यात ? आश्चर्य वाटतंय ना?
मित्रांनो तेरेखोल हा गाव वेंगुर्ला तालुक्यात येतो पण याच गावातील तेरेखोल
किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या
शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला
बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गाव जरी
वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या
ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून
किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि
सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी
मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध
आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला)
फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध
असतात.
जवळची प्रेक्षणीय स्थळे
१) तेरेखोल नदी
२) तेरेखोल किल्ला
३) रेडी गणपती मंदीर
४) टाटा इस्पात कंपनी रेडी
५) आरोंदा
६) तेरेखोल हेरिटेज रिसोर्ट, गोवा सरकार
७) तेरेखोल बीच
८) शिरोडा बीच
९) आरवली वेतोबा (दक्षिण काशी)
१०) उभादांडा बीच
११) वेंगुर्ला
१२) केरी बीच (पेडणे)
No comments:
Post a Comment