माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - १
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील पहिले पुष्प आहे..१) मराठीब्लॉग्ज.नेट
-->> http://marathiblogs.net/
अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. नेटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ई-मेलिंग संकेतस्थळे आणि खासगी संकेतस्थळांचे युग होते. त्यानंतर आले ते फ़्री वेबहोस्टींगचे युग यात प्रामुख्याने जिओसिटीज,त्रीपॉडने संकेतस्थळांसाठी मोफत जागा पुरवली. सध्या ब्लॉग्जचे युग सुरु आहे. हे एक नविन तंत्रज्ञान आहे. जे अत्यंत सोपे आहे. तर या ब्लॉग्जच्या युगात सर्व मराठी ब्लॉग्जधारकांना एकत्र आणण्याचे काम या संकेतस्थळाने केले आहे.
ह्या संकेतस्थळाची नविन रचना अत्यंत आकर्षक अशी केली आहे. सर्व सभासदब्लॉग्जवरील नविन लेख आपण येथे पाहू शकता आणि जवळजवळ ५७९ मराठी ब्लॉजची मजा लुटू शकता. तुम्ही या संकेतस्थळाचे सभासद होउन स्वतःच्या ब्लॉगचे चाहते वाढवू शकता.
२००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.
- वामन परुळेकर
No comments:
Post a Comment