या निमित्ताने मी मागे लिहिलेला लेख पुर्नप्रकाशित करत आहे.
मराठी भाषा संकटात? |
आज सकाळी एका ब्लॉगवर वाचले की आपली मराठी भाषा आता संपत चालली आहे. रोज वर्तमानपत्रातही अशाच बातम्या छापून येतात. कधी कुठल्यातरी शहरात विचारवंत एकत्र बसून मराठीवर विचारमंथन करतात. रोज हे असच चालु आहे. खरच मराठी संपणार आहे का? मला विचाराल तर मुळीच नाही. नकारार्थी विचार करत बसुन चालणार नाही.
आपण सर्व मराठी बांधवांनी ठरवल तर मराठी कशी संपेल ?आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो , पणआपण किती मराठी बोलतो? किती मराठी भाषिक चित्रपट, मालिका पहातो? किती मराठी पुस्तके वाचतो ? सुरुवात आपल्यापासुनच केली पाहिजे.
आणखी महत्त्वाच म्हणजे आपल्याला महिती असेलच की इंग्रजी एवढी लोकप्रिय का आहे ? कारण ती सर्वसमावेषक भाषा आहे. मी कुठतरी वाचल आहे की त्या भाषेत ७०% ईतर भाषेतील शब्द आहेत. आपल्यालाहीमराठी भाषा व्यापक करावी लागेल. याच्यावर तज्ञांनी जरुर विचार करावा.
No comments:
Post a Comment