माहितीपर संकेतस्थळे भाग - ३
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील तिसरे पुष्प आहे..
शोध संकेतस्थळे.
तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवायची असेल,तर तुमचा ब्लॉग नावाजलेल्या सर्च संकेतस्थळावर दिसणे महत्त्वाचे ठरते. यासाठी ब्लॉग नावाजलेल्या सर्च संकेतस्थळांवर जमा (सबमीट) करावा लागतो. कोणतेही सर्च इंजिन, तुमचा ब्लॉग त्यांच्या शोध यादीत येइल याची हमी देत नाही. आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग या शोध यादीत समाविष्ट करण्यासाठी ही शोध संकेतस्थळे विविध मोजमापे वापरतात. उदा. आपले वाचक किती? आपल्या लिंकचा दर्जा, लिखाणाचा दर्जा. अर्थात प्रत्येक शोध संकेतस्थळाचे नियम वेगवेगळे आहेत. सर्वात यशस्वी शोध संकेतस्थळ गुगल प्रत्येक संकेतस्थळ अथवा ब्लॉगला दर्जा प्रदान करते. ज्याची रॅंक जास्त वरची त्याचे लिस्टींग प्रथम होते.
सर्वात महात्त्वाचे हे की ही शोध संकेतस्थळे आपला ब्लॉग शोध यादीत येइल याची हमी देत नाहीत आणि शक्यतो नेहमीच्या वापराचा ई-मेल जमा (सबमीट) करु नका. एकदा ई-मेल जमा झाला की इन् बॉक्स जाहीरातींनी भरुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खाली काही प्रमुख शोध संकेतस्थळांची थेट लिंक मी आपल्याला उपलब्ध करुन देत आहे. त्यांचा वापर करुन पहा.
१) गुगलवर आपला ब्लॉग जमा करा.
येथे URL च्या समोरील चौकोनात तुमचा पुर्ण ब्लॉग पत्ता लिहा.
उदा. http://marathisamuday.blogspot.com/
( जेथे marathisamuday ऐवजी तुमच्या ब्लॉगचे नाव येइल. )
२) स्र्कुब द वेबवर आपला ब्लॉग जमा करा.
येथे आपल्याला आपला ई-मेल द्यावा लागेल. (शक्यतो नेहमीच्या वापराचा ई-मेल जमा (सबमीट) करु नका)
३) जायदेवर आपला ब्लॉग जमा करा.
४) याहू वर आपला ब्लॉग जमा करा.
जगातील प्रमुख शोध संकेतस्थळापैकी एक याहू संकेतस्थळ जलद शोधासाठी प्रसिध्द आहे. याहूची रचना अत्यंत सोपी आहे. ई-मेलची गरज नाही.
- वामन परुळेकर
No comments:
Post a Comment