महात्मा मोहनदास करमचंद गांधी
(image source--http://media.radiosai.org/) |
जन्म - ऑक्टोबर २, १८६९ | मृत्यू - जानेवारी ३०, १९४८ |
महात्मांचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात झाला होता. गांधींनी इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करुन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रीकेत त्यांनी वर्णव्देषा विरुध्द दिर्घकालीन लढा दिला.
भारतात परतल्यावर ते स्वातंत्र्य लढयात सक्रीय झाले. मिठ सत्याग्रह, दांडी यात्रा, विदेशी हटाव, स्वदेशी जागरण, भारत झोडो ही ऎतीहासिक आंदोलने बापुंनी उभारली. भारतात असलेल्या अस्पृश्यता निवारणा साठी त्यांनी प्रयत्न केले.
महात्मा गांधी हे ज्या महात्मा या उपाधीने ओळखले जात ती उपाधी त्यांना रविंद्रनाथ टागोरांनी दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. जानेवारी ३०, १९४८ ला नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधींची गोळ्या घालुन हत्या केली. आणि संपूर्ण भारत दुःखाच्या महासागरात लोटला गेला.....
No comments:
Post a Comment