उदंड झाले मेळावे.
आजकाल शेतकरी मेळाव्यांचे जबरदस्त पीक आले आहे. सर्व राजकिय पक्ष आणि संघटना शेतकरी मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासने दिली जातात.विविध पॅकेजची घोषणा करण्यात येते. शेतकऱ्यांसाठीच्या विविध आकर्षक योजना या मेळाव्यांमध्ये मांडण्यात येतात.पण खरेच हे सर्व सत्यात उतरते का? आश्वासने कितपत पाळली जातात ? या सर्व मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात का? मित्रांनो शेतकरी हा आपल्या सर्वांचा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे. हा अन्नदाता जर कमजोर झाला तर काय होइल याचा विचार करा.
मी मांडलेल्या प्रश्नांबाबत आपल्याला काय वाटते? आपले विचार जरुर मांडा.
No comments:
Post a Comment