Saturday, 28 June 2008

फील्ड मार्शल माणेकशॉ तुझे सलाम ....

फील्ड मार्शल माणेकशॉ तुझे सलाम ....


७१च्या भारत-पाक युध्दात भारताचे नेतृत्त्व करणारे माजी लष्करप्रमुख फील्ड मार्शल माणेकशॉ यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. १९४८च्या जम्मू-काश्मीर लष्करी कारवाईच्यावेळी त्यांनी भारताचे यशस्वी नेतृत्त्व केले होते. ७१च्या युध्दातील त्यांची कामगीरी विशेष गाजली. बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले. त्यांच्यावर काही लोकांनी खोटे आरोप लावले पण ते निराशेतून केलेले आरोप होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते. १९७३मध्ये त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. हा पुरस्कार मिळालेला सेनापती कधीच निवृत्त होत नसतो. या सेनापतीच्या निधनाने केवळ भारतातच नव्हे तर बांग्लादेशातही दुःख व्यक्त करण्यात आले आहे.

अशा या शूरवीर सेनापतीस भावपूर्ण श्रध्दांजली.

Friday, 27 June 2008

आज म्या वळू पाहिला...

आज म्या वळू पाहिला...

बऱ्याच दिवसापासून वळू पाहण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली. वळू म्हणजे खराखुरा वळू नव्हे तर वळू मराठी चित्रपट. श्वासनंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपट तयार झाले. खरेतर दर्जेदार आणि चित्रपटाला होणारी गर्दी याचा काही थेट संबंध नसतो. हे नाटकालाही लागू पडतं. दर्जेदार नाटकांकडे लोक पाठ फिरवतात आणि सुमार नाटकांना गर्दी होते. असो तर मुख्य विषय हा की मी आज वळू पाहिला. माझा या चित्रपटाविषयी पूर्वग्रह फारच चांगला झाला होता. माझ्या सर्व मित्रांना हा चित्रपट अतिशय आवडला होता. ब्लॉग्जदुनियेत या चित्रपटाविषयी फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे माझ्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण चित्रपट पाहिल्यावर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी तरी चित्रपट सुमार नाही. चित्रपट चांगला झालाय. अर्थात आवड-निवड प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाची मतेही वेगळी असू शकतात.

मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. अभिनय सर्वांचा चांगला झाला आहे. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, जिवन्याच्या भूमीकेतील कलाकार, निर्मिती सावंत यांच्या भुमिका छान झाल्यात. दिलीप प्रभावळकर यांना दिलेली भूमिका प्रभावी वाटली नाही.

काही लोकांनी या चित्रपटातील चांगल्या कपडयाबद्दल घेतलेला आक्षेप मला रुचला नाही. खरे तर आता गावातील लोक चित्रपटात दाखवलेल्या कपडयांपेक्षाही चांगले कपडे परीधान करतात. कपडयांच्याबाबतीत चित्रपटात काहीही चुकीचे वाटत नाही. चित्रपट मध्यांतरापर्यंत डॉक्युमेंट्रीमध्ये अडकल्यासारखा वाटला पण मध्यांतरानंतर चित्रपट वेगवान वाटला. शेवटच्या समारोपाच्या प्रसंगात अतुल कुलकर्णीला बांधलेला वेगवान फेटा मस्तच वाटला. या चित्रपटात ग्रामीण जीवनाचे चांगले चित्रीकरण केले आहे. ग्रामीण भाषा, पेहराव योग्य वाटले. अमृता सुभाषची प्रेमकहाणी आणि ज्योती सुभाषचा डुरक्यावरील जीव ह्या दोन्हींचे फार चांगले चित्रीकरण झाले आहे. अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत. आपली मते वेगळी असू शकतात. वाचल्याबद्दल 
 
धन्यवाद.

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. राज्यात प्रथम आलेल्या साताऱ्याच्या गौरव कुलकर्णी (९७.८४%) याचेही हार्दिक अभिनंदन. असेच यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करा.


खाली दिलेल्या सर्व पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.

राज्यात प्रथम - गौरव कुलकर्णी (९७.८४%)
मुलींमध्ये पहिल्या - पूजा वानखेडे (यवतमाळ), सायली रूपसिंह सागर (उमरगा)- ९७.२३ %
रात्र शळेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (नागपूर) ८८.१५ %
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव ९६.४६ %
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ %

भारताचा वेगवान विजय

भारताचा वेगवान विजय

कालचा पाकवरचा आपला विजय हा भारताचा सर्वात वेगवान विजय होता. भारताने तब्बल ४७ चेंडू राखून विजय मिळवला. भारताच्या डावात चौकार आणि षटकारांची बरसात झाली. सेहवाग आणि रैनाची तुफान खेळी आयुष्यभर लक्षात राहिल. या विजयाने हुरळून न जाता भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखली पाहिजे. साखळीत भारताचे महत्त्वाचे सामने आहेत. भारत विजयी होवो हीच प्रार्थना.

Tuesday, 24 June 2008

सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन

Subscribe in a reader


सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन Top Blogs

सॅन फ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन आयोजित करण्यास अनेकांनी प्रखर विरोध केला आहे. याविषयी आपले मत काय आहे? हा विरोध योग्य आहे का? हे साहित्यसंमेलन रद्द करुन भारतात घ्यावे का? आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..

कृपया कोणावरही वैयक्तीक टीका नको. सभ्य भाषेचा वापर करा. धन्यवाद. प्रतिक्रिया देण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, 23 June 2008

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता

Subscribe in a reader

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता Top Blogs


  • ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.
  • दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करण्यात येणार नाही.
  • या ब्लॉगमध्ये कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
  • आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती या ब्लॉगवरुन प्रसारीत केली जाणार नाही.
  • राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण या ब्लॉगमधून होणार नाही.
ही आचारसंहिता माझ्या अन्य ब्लॉग्जलाही लागू आहे. कालानुरुपे या आचारसंहितेत नवीन कलमे लिहीली जाटील


AddThis Feed Button

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

लोकशाही देशात प्रत्येक व्यक्तीला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दीले आहे. अगदी सामान्य माणसाला त्याची मते मांडण्याचा अधिकार फक्त लोकशाहीत मिळतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलेली लोकशाही लोकशाही नव्हेच. मित्रांनो आपल्या या सर्वात मोठया लोकशाही देशात अजूनही लोकशाही रुजलेली नाही. लोकशाहीत विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. पण विचार करायची क्षमता नसलेले लोक हिंसेने प्रत्युत्तर देतात तिथेच लोकशाही पायदळी तुडवली जाते. जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही हुकूमशाही असलेला देश यशस्वी होवू शकला नाही. लोकशाहीत लोकांच्या मतांना विचारात घेणे गरजेचे असते पण जमावाची मते विचारात घेतली तर लोकशाही फसू शकते. कारण जमावाला विचार करण्याची शक्ती नसते. जमाव भावनेच्या भरात कृती करत असतो आणि या जामावाचे फायदे घेणारे स्वार्थी असतात.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी हा शब्दच सरकार किंवा एखाद्या समुहाकडून उच्चारला जाणे अभिप्रेत नसते. आता प्रश्न उठतो की जर कोणी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला तर काय करायचे? सध्या आपण बघतच असाल की दूरचित्रवाहिन्या कशा स्वरुपाच्या बातम्या प्रसारीत करीत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमात दाखवली जाणारी भारतीय संस्कृती कोणी परदेशी व्यक्तीने पाहिली तर त्याचा मोठा गैरसमज व्हायचा. त्याला वाटायचे की भारतीय कुटुंबातील स्त्रीया ह्या स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांच्या सुपाऱ्या देतात. सासूचा जन्म हा आपल्या सूनेला छळण्यासाठी झाला असावा. या मालिकांमधिल विवाहपूर्व आणि विवाहानंतरचे संबंध पाहिले तर या परदेशी व्यक्तीला आपण कुठे तरी मागे पडतोय ही भावना स्वस्थ बसू देणार नाही.
वृत्तवाहिन्यांनी तर ताळतंत्रच सोडलय. चांगल्या बातम्या तर सोडाच खऱ्या बातम्या मिळतील याचीही खात्री नाही. या वाहिन्यांना कोणतीही आचारसंहिता नाही. चांगल्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी बीबीसी आणि दूरदर्शन हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.

by Vikram Nandwani Sir
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही महत्त्वाची आहे. जबाबदारी सर्वांनाच लागू होते. वृत्तपत्रे,दूरचित्रवाणी वाहिन्या आणि ब्लॉगर्स या सर्वांनाच जबाबदारी लागू होते. पण ही जबाबदारी स्वतःहून स्विकारलेली असणे आवश्यक आहे. दुसऱ्यांनी ती जबरदस्तीने लादणे आभिप्रेत नाही. काय लिहावे आणि काय प्रसारीत करावे याची एक नियमावली प्रत्येकाने स्वतः तयार करणे आवश्यक आहे. भारतीय दूरचित्रवाणी अथवा वृत्तपत्रे अशा स्वतः ठरविलेल्या नियमावलीचे कठोर पालन करताना दिसत नाहीत. पण ब्रिटनमधील वृत्तपत्रे कठोरपणे आचारसंहितेचे पालन करतात. त्यासाठी त्यांनी प्रेस कंप्लेंन्ट कमिशन ची स्थापना केली आहे. भविष्यात ब्लॉग्ज हे प्रभावी माध्यम म्हणून उदयास येणार आहे. मराठी ब्लॉगींग विश्व हे अजून बाल्यावस्थेत असले तरी हे एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. तेव्हा या माध्यमावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतानाच जबाबदाऱ्या पाळणे गरजेचे ठरणार आहे. या जबाबदाऱ्या स्वतःच ठरवलेल्या असाव्यात उदा.

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता-

ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.

दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.

ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.

ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करण्यात येणार नाही.

या ब्लॉगमध्ये कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती या ब्लॉगवरुन प्रसारीत केली जाणार नाही.

राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण या ब्लॉगमधून होणार नाही.

ही आचारसंहिता माझ्या अन्य ब्लॉग्जलाही लागू आहे. कालानुरुपे या आचारसंहितेत नवीन कलमे लिहीली जातील.

Saturday, 21 June 2008

अणुकरार - देशहित महत्त्वाचे

अणुकरार - देशहित महत्त्वाचे

संयुक्त अमेरीकन राष्ट्रा बरोबर होणाऱ्या अणुकरारामुळे भारतीय संघराज्याला फायदाच होणार आहे. या करारानंतर भारतात नवीन अणुभट्टया उभ्या राहतील. अणुउर्जा निर्मितीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होईल. भारत उर्जा निर्मितीत सक्षम होईल. भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध मजबूत होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अणुकरारामुळे भारत नव्याने उदयास येत असलेल्या चिनी महाशक्तीशी सामना करु शकेल.

या कराराला होणारा विरोध अनाकलनिय आहे. केवळ विरोधासाठी विरोध देशाच्या हितास घातक ठरेल. काही लोकांचा विरोध हा केवळ हा करार अमेरिकेबरोबर होत आहे म्हणून आहे. गंमत म्हणजे शेजारी राष्ट्र चीनने यापुर्वीच असाच एक करार अमेरिकेसोबत केला आहे. त्या कराराला त्यांच्या देशात कोणताच विरोध झाला नव्हता.

जेवढा ह्या कराराला उशीर होइल तेवढाच तोटाही होईल. त्यामुळे सर्वांनी या कराराचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. माझे सर्व समविचारी मराठी ब्लॉगर्सना आवाहन आहे की त्यांनीही हा विषय मांडावा. केवळ देश हितासाठी.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Friday, 20 June 2008

हास्य-विनोदएकदा सरदारजी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातात.
चालता चालता त्यांना एक भला मोठा शार्क एका युवकाभोवती गोल गोल पोहताना दिसतो. तो युवक मोठयामोठयाने मला वाचव ! मला वाचव ! असे ओरडत असतो.

सरदारजी हसायलाच लागतात.

कारण त्यांना माहिती असते की तो शार्क त्या युवकाला वाचवू शकणार नाही.

भावपूर्ण श्रध्दांजली

भावपूर्ण श्रध्दांजली

ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यातील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केले होते. गेली चार दशके त्यांनी मराठी चित्रपट उद्योगात आपले योगदान दिले होते.

चंद्रकांत गोखले यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली

Thursday, 19 June 2008

एक दशावतार कलाकार प्रवेशाच्या तयारीत

एक दशावतार कलाकार प्रवेशाच्या तयारीत
राष्ट्रवाद

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार काही लोकांना पहावत नाही. कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी हिंसा करुन काय मिळणार आहे? काहीवेळा तर आंदोलनातील हिंसेमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यावेळी या आंदोलकांचा राष्ट्रवाद कोठे जातो कोण जाणे? स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?


आपल्यातला राष्ट्रवाद संपत चालला आहे असे मला वाटते. याची कारणे अनेक आहेत. भ्रष्टाचार हे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार आणि पैशाची भूक ही आपल्या व्यवस्थेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ह्या पैशाच्या भूकेमुळे अनेक देशद्रोही तयार होतात. दहशतवादी येथे घुसखोरी करतात आणि आपल्या योजना यशस्वी करतात, त्या काय भारतीयांच्या मदतीशिवाय? हे स्वकिय शत्रु कोणत्याही धर्माचे असु शकतात. त्यांचा मतलब फक्त पैशांशी असतो. ज्या भारतात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पैसे मोजावे लागतात त्या भारतात अशा कारवाया करणे सोपेच आहे. शत्रु राष्ट्रांना दोष देवूयाच पण त्याचबरोबर स्वतःच्या दोषांचे काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसे आपल्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे देतात. या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर काय संस्कार होणार? माझ्यामते भ्रष्टाचार हा राष्ट्रद्रोहच आहे.

परकियांच्या दहशतवादाबरोबरच आता स्वकियांचाही दहशतवाद सुरु झाला आहे. काही लोक व्देषाचे विष पाजून देशाचा सर्वनाश करत आहेत. स्वतःच्या माणसांचे जीव घेण्यासाठी बॉम्ब तयार करायचे काम सुरु झाले आहे. हे वेळीच थांबवले नाही तर आपल्या देशाची स्थिती जाती, वंश आणि धर्मांच्या युध्दांनी रसातळाला गेलेल्या आफ्रिकन देशांसारखी होइल. भारत एके काळी विश्वगुरु म्हणून गौरवला गेला होता. तीच स्थिती पुन्हा आणायची असेल तर राष्ट्रवाद जागृत करावा लागेल.

काही लोक राष्ट्रवाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतात. हे राष्ट्रवाद वगैरे आपल्याला काही जमणार नाही असे बऱ्याच जणांचे विचार असतात. सर्वसामान्य माणूस काय करु शकतो असेही प्रश्न उठतात. काही सोप्या गोष्टी सांगतो ज्या आपण करु शकतो. प्रथम तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच योग्य वापर करा. आपण मतदानच करत नसाल तर देशाला चांगले नेतृत्त्व कसे मिळेल? स्वतःच्या परीसराची स्वच्छता ठेवा. तुमच्या घरीभाडेकरु ठेवताना त्याची कागदपत्रे तपासून पहा. शेजारीपाजारी काही संशयास्पद वाटल्यास त्याची खबर योग्यत्या अधिकाऱ्यांना द्या. माहितीच्या अधिकाराचा वापर करा.

आपण आपल्या संस्कृतीत देशाला,भूमीला माता मानतो. या मातेची खरी सेवा करायची असेल तर देशाशी प्रामाणिक राहा. तीच खरी देशसेवा होइल.

Wednesday, 18 June 2008

आज वटपौर्णिमा

आज वटपौर्णिमा
Tuesday, 17 June 2008

चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम

चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता सातवी) या वर्षी ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग कुडाळ हायस्कूलचा चैतन्य दिलीप राणे आणि कोल्हापूरचा वैभव पाटील या दोघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २८६ गुण मिळाले. कुडाळने आपली विजयी परंपरा कायम राखली असून याच प्रशालेतील सौरव घुर्ये हा राज्यात तिसरा आला. शहरी विभागात सोलापूरची तेजश्री कोरे , चाळीसगावचा स्वप्नील अमृतकर पहिले आले. त्यांनाही २८६ गुण मिळाले. या सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या पुढील आयुष्यातही असेच यश मिळवा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करा.

Monday, 16 June 2008

शिवशक ३३५ प्रारंभ

शिवशक ३३५ प्रारंभ

आज शिवशक ३३५ मधला पहिला दिवस. शिवशकानुसार ३३५ वर्षांपूर्वी याच दिवशी तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. परकिय सत्तेचा गुलाम झालेल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले होते. मराठी साम्राज्याला अधिकृत मान्यता मिळाली होती. आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्वांना शुभेच्छा.

Sunday, 15 June 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - १३

माहितीपर संकेतस्थळे भाग - १३

wwitv

आपल्याला ऑनलाइन टी.व्ही.पहायचा आहे का? २० भारतीय वाहिन्या मोफत उपलब्ध आहेत. ऑनलाइन २६०० वाहिन्या पहा त्याही अगदी मोफत. या संकेतस्थळावर स्टार माझा ही मराठी वाहिनी उपलब्ध आहे. या वाहिन्या दिसण्यासाठी तुमच्या संगणकावर विंडोज मिडीया प्लेअर असणे आवश्यक आहे. काही वाहिन्यांसाठी रीअल प्लेअरची आवश्यकता भासते.

परदेशातील भारतीय सुरक्षित ?

परदेशातील भारतीय सुरक्षित ?

आजच्या घडीला लाखो भारतीय परदेशात जीवन जगत आहेत. काहींना इंग्रजांनी जबरदस्तीने गुलाम म्हणून नेले तर काही पोटापाण्यासाठी परदेशात गेले. काही परदेशातील पगार आणि राहणीमानाच्या आकर्षणाने गेले. हे सर्व आपलेच. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द आपण आवाज उठविला पाहिजे. आजही भारतीय व्यक्ती या लोकांना भारताचे प्रथम दर्जाचे नागरीक मानत नाहीत. वर्षानुवर्षे मलेशियात वास्तव्य असलेल्या भारतीयांची हीच व्यथा आहे. मलेशियात मंदीरे तोडली गेली. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. फिजीत भारतीय पंतप्रधानांची सत्ता उलटवली गेली. या सर्व घटनांचे संपूर्ण जग साक्षिदार आहे.

गेल्या वर्षी अमेरीकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या घटना ताज्या आहेत. खरे तर जातियवाद,वंशवाद आपल्या देशाला नवीन नाही. पण काळे-गोरे भेदभाव आपल्याकडे नाही. हा भेदभाव विदेशात अजूनही आहे. थोडया प्रमाणात असला तरी त्याचा फटका काही प्रमाणात भारतीयांना बसतो. विश्व व्यापार केंद्रावरच्या हल्ल्यानंतर तर प्रत्येक आशियाई व्यक्तीकडे संशयाने पाहिले जावू लागले. अमेरीकेत शिखांवर झालेले हल्ले हे गैरसमजुतीमुळे झाले होते. अनेक भागात असे हल्ले झाले. ऑस्ट्रेलियातील भारतीय डॉक्टरला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक ताजी आहे. समजा अमेरीका किंवा इंग्लंडच्या नागरीकांना अशी वागणूक मिळाली असती तर ते देश गप्प राहिले असते का?

Thursday, 12 June 2008

माहितीपर संकेतस्थळे - भाग - १२

माहितीपर संकेतस्थळे - भाग - १२ ( File tubes )

जेव्हा इंटरनेटवर तुम्ही एखादी फाइल शोधत असता तेव्हा तुम्ही नेहमीच्या सर्च इंजीनचा वापर करता. उदा. गुगल किंवा याहू. पण तुम्हाला हवे असलेले निकाल मिळत नाहीत. अशा वेळी एखाद्या फाइल शोधणाऱ्या विशेष सर्च इंजिनची गरज भासते. फाइल टयुब तुम्हाला ही सेवा पुरवते. फाइल टयुब हे फाइल सर्च इंजिन आहे, ज्याचा वापर तुम्ही वेगवेगळया प्रकारच्या फाइल्स शोधण्यासाठी करु शकता.

हे सर्च इंजिन विविध फाइल शेअरींग आणि अपलोडींग संकेतस्थळांमध्ये फाइल्स शोधते. हे संकेतस्थळ वापरुन तुम्ही avi, mp3, mpeg, mpg, rar, zip, wma, wmv या प्रकारच्या फाइल्स शोधू शकता. हे संकेतस्थळ तुम्ही तुमच्या ब्राउजरवर अॅड करु शकता. एवढच नव्हे तर तुम्ही स्वतःचे अकाउंट तयार करुन तुमची सर्च हिस्ट्री(इतिहास) साठवून ठेवू शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा जास्त शोध घेतला आहे ते दाखवले जाते. म्हणजेच जास्त वापरल्या गेलेल्या किवर्डस् ची यादी.

मी हे सर्च इंजिन टेस्ट केले असून चांगले निकाल मिळाले. मी ए.आर्.रेहमान हा किवर्ड वापरुन पाहिला


तेव्हा मला हे निकाल मिळाले.

- वामन परुळेकर

वाचनीय लेख - केंद्र सरकारला शिवरायांचा विसर का?


वाचनीय लेख

आजचा
.टा. वाचलात का? त्यात "केंद्र सरकारला शिवरायांचा विसर का?" हा संजय व्हनमाने यांचा लेख प्रसिध्द झाला आहे. त्याची लिंक खाली देतो आहे. तेथे टिचकी मारा.

----> http://maharashtratimes.indiatimes.com/


हेच ते सरकारी संकेतस्थळ जेथे शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला नाही. -
----> http://india.gov.in/knowindia.php

हा दुर्लक्ष संतापजनक आहे. सरकारी संकेतस्थळावर हा दुर्लक्ष मुद्दाम केला गेला आहे का? दिल्लीतील मराठी नेते गप्प कसे ? गुरुनानक,औरंगजेब,नादिरशहा या सगळयांचा उल्लेख आहे मग शिवाजी महाराजांचा का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थीत होतात. म्.टा. ने हे सगळे उघडकीस आणले, त्याबद्दल .टा.चे अभिनंदन.

- वामन परुळेकर


Wednesday, 11 June 2008

समुद्र किनाऱ्यावर बॉम्बचे फ्युज


समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्यूजसोमवारी मालवणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्युज आढळून आले आहेत. मालवणमधील देवबाग समुद्रकिनाऱ्यावर ह्या बॉम्बची पेटी ग्रामस्थांना आढळून आली. लढाऊ विमानातून फेकण्यात येणाऱ्या बॉम्बबरोबर हा फ्युज जोडला जातो शक्तिशाली स्फोटासाठी हा फ्युज बॉम्बबरोबर जोडला जातो. मोठया युध्दनौका नष्ट करण्यासाठी ह्या बॉम्बचा वापर होतो. नजिकच्या काळात कोणतेही मोठे युध्द झालेले नाही. मग हे फ्युज आले कुठून ?


* याच किनाऱ्यावर फ्युज सापडले


गोवा येथील नौदलाच्या पथकाने सदर फ्युजची तपासणी केली. तत्पूर्वी देवबाग या ठीकाणी उच्च दाबाचे कार्बनाडाय ऑक्साइड वायु भरलेले सिलेंडर आढळून आले होते. वेंगुर्ले परीसरातही असे तीन सिलेंडर सापडले होते.

समुद्रकिनाऱ्यावर वारंवार अशा संशयास्पद वस्तू आढळून येतात.ही भावी युध्दाची तयारी तर नव्हे ना? या वस्तू शत्रुच्याही असू शकतात त्यामुळे त्यांची योग्य दखल सरकारने घ्यावी.

Saturday, 7 June 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ११ बारावी

माहितीपर संकेतस्थळे भाग - ११

बारावीच्या परिक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन . तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून जावू नये. ही काही शेवटची संधी नव्हे पुन्हा प्रयत्न करा.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. करीयर मार्गदर्शनासाठी खाली काही संकेतस्थळे देत आहे. जरुर भेट द्या..

Thursday, 5 June 2008

हिरण्यकेशी

हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी
हिरण्यकेशी हे पर्यटनस्थळ आंबोली गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा. >हिरण्यकेशी


पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता


Wednesday, 4 June 2008

आज राष्ट्र संबोधन

आज राष्ट्र संबोधनभारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आज रात्री पंतप्रधान राष्ट्राला संदेश देणार आहेत. रात्री साडे आठ नंतर त्यांच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे आपादकालीन थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवरुन करण्यात येणार आहे.

पेट्रोल दरवाढ झाली

पेट्रोल दरवाढ झाली
भारत सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहे. गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे. आता गॅससाठी ३५३ रुपये मोजावे लागतील.केरोसीनच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. या दरवाढीनंतर इंधन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Sunday, 1 June 2008

माझे ब्लॉगींग .....

माझे ब्लॉगींग .....

तो सन २००७ डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मी नेहमीप्रमाणे इंटरनेटच्या मोहजालातून फेरफटका मारत होतो. सहज माझी नजर ब्लॉगवाणी या संकेतस्थळावर गेली. यापूर्वीही मी ब्लॉग्जबद्दल बरेच काही ऐकले होते पण ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली नव्हती. मी माझ्या संकेतस्थळांच्या दुनियेतच खूश होतो. पण त्या दिवशी मला हरेकृष्णाजी हा ब्लॉग सापडला. ब्लॉग पाहून असे वाटले की मराठीत सर्वसमावेशक ब्लॉग आहेत. ते संख्येने कमी असले तरी आहेत. आपणही एखादा सर्वसमावेशक ब्लॉग तयार करावा, ज्यावर आपले विचार मांडता येतील. मराठी ब्लॉग म्हणजे कविता आणि कथा असेच मला वाटत होते पण काही ब्लॉग पाहून माझे विचार बदलून गेले.

या गोष्टीला आज पाच महिने पूर्ण होत आहेत. माझी दिनचर्या पूर्ण बदलली आहे. सकाळच्या चहाबरोबर आता ब्लॉगवाणी किंवा मराठीब्लॉग्ज डॉट नेट लागतो.

कोणी काय लिहीलयं याची उत्सुकता.

खट्टा मिठा मध्ये आज कुठला इतिहास दिला आहे?

प्राजक्ताने आज कोणत्या पाककलेबद्दल लिहीले आहे?

आज मोरपीसमध्ये नविन काय आहे?

आज महाभारतातील कोणती कथा वाचायला मिळणार?

यासगळयाचीच उत्सुकता. माझे जिवन ब्लॉगमय झाले आहे. दिवसातून २ तास मी इतरांचे ब्लॉग वाचतो. वाचनातून बरेच काही शिकता येते. गंभीर ,मनोरंजक, हलकेफुलके, राजकारण, क्रिडा, चित्रपट, आरोग्यविषयक, पाककला काय नाही ब्लॉग्जच्या दुनियेत ते सांगा? कंटाळा आला की हास्यमेव जयते आहेच मनोरंजनासाठी. अगदी ऑनलाइन कादंबरीही वाचता येते. केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या.

मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.

जेवण म्हणजे मराठी माणसाचा विक पॉईंट. रोजरोज नवनविन पाककला शिकवणाऱ्या प्राजक्ता आणि रुचिरा कधी सोबती बनल्या कळलेच नाही. चकलीनेही बरच काही शिकवलं. गेला पूर्ण आठवडा या ब्लॉग्जच्या दुनियेपासून दूर होतो पण प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांची आठवण येत होती. कधी एकदा परीक्षा संपते याचीच वाट बघत होतो. प्रतिक्षा संपली. लिखाण सुरु.......

- वामन परुळेकर

ही वाट दूर जाते...

माहितीपर संकेतस्थळे भाग - १०

माहितीपर संकेतस्थळे भाग - १०


नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी माहितीपर संकेतस्थळे या मालिकेतील नविन पुष्प गुंफत आहे. आज मी आपल्याला भारतीय पाककले संबंधीत संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. स्वतःच्या हातांनी जेवण करणे आणि ते खाणे कोणाला आवडत नाही ? घरबसल्या नविन-नविन पदार्थ शिकण्याची हौस असणाऱ्यांसाठी ह्या संकेतस्थळांचा नक्कीच उपयोग होइल.
संकेतस्थळेhttp://www.food-india.com/

http://www.top-indian-recipes.com/

http://recipes.tajonline.com/


http://www.talimpu.com/

http://www.bestindiancooking.com/

http://food.sify.com/


http://www.indianfoodforever.com/


http://foodindian.com/

http://www.bbc.co.uk/food/recipes/


http://www.khanakhazana.com/


http://www.indiaforvisitors.com/

http://www.indianfoodrecipes.net/


http://www.kadaicuisine.com/दक्षिण भारतीय पाककला


http://www.south-indian-recipes.com/

http://foodindian.com/recipes/south


http://www.indobase.com/


http://forumhub.com/southfood/


http://www.food-india.com/


पंजाबी भारतीय पाककला


http://www.punjabonline.com/


http://www.bennett.com/curry/punjab.htm

http://www.indiachildren.com/

http://www.indianfoodforever.com/punjabi/


http://www.indobase.com/recipes/category/punjabi-recipes.php


महाराष्ट्रीयन भारतीय पाककला


http://www.marathiworld.com/pakkala/index.htm


http://www.mumbai-masala.com/


http://www.indianfoodforever.com/maharashtrian/


http://www.indobase.com/recipes/category/

http://indianfood.indianetzone.com/1/marathi.htm

http://www.food-india.com/region/marathi.htm- वामन परुळेकर

ShareThis

Visitors Worldwide

free counters