परदेशातील भारतीय सुरक्षित ?
आजच्या घडीला लाखो भारतीय परदेशात जीवन जगत आहेत. काहींना इंग्रजांनी जबरदस्तीने गुलाम म्हणून नेले तर काही पोटापाण्यासाठी परदेशात गेले. काही परदेशातील पगार आणि राहणीमानाच्या आकर्षणाने गेले. हे सर्व आपलेच. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द आपण आवाज उठविला पाहिजे. आजही भारतीय व्यक्ती या लोकांना भारताचे प्रथम दर्जाचे नागरीक मानत नाहीत. वर्षानुवर्षे मलेशियात वास्तव्य असलेल्या भारतीयांची हीच व्यथा आहे. मलेशियात मंदीरे तोडली गेली. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. फिजीत भारतीय पंतप्रधानांची सत्ता उलटवली गेली. या सर्व घटनांचे संपूर्ण जग साक्षिदार आहे.
गेल्या वर्षी अमेरीकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या घटना ताज्या आहेत. खरे तर जातियवाद,वंशवाद आपल्या देशाला नवीन नाही. पण काळे-गोरे भेदभाव आपल्याकडे नाही. हा भेदभाव विदेशात अजूनही आहे. थोडया प्रमाणात असला तरी त्याचा फटका काही प्रमाणात भारतीयांना बसतो. विश्व व्यापार केंद्रावरच्या हल्ल्यानंतर तर प्रत्येक आशियाई व्यक्तीकडे संशयाने पाहिले जावू लागले. अमेरीकेत शिखांवर झालेले हल्ले हे गैरसमजुतीमुळे झाले होते. अनेक भागात असे हल्ले झाले. ऑस्ट्रेलियातील भारतीय डॉक्टरला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक ताजी आहे. समजा अमेरीका किंवा इंग्लंडच्या नागरीकांना अशी वागणूक मिळाली असती तर ते देश गप्प राहिले असते का?
No comments:
Post a Comment