चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता सातवी) या वर्षी ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग कुडाळ हायस्कूलचा चैतन्य दिलीप राणे आणि कोल्हापूरचा वैभव पाटील या दोघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २८६ गुण मिळाले. कुडाळने आपली विजयी परंपरा कायम राखली असून याच प्रशालेतील सौरव घुर्ये हा राज्यात तिसरा आला. शहरी विभागात सोलापूरची तेजश्री कोरे , चाळीसगावचा स्वप्नील अमृतकर पहिले आले. त्यांनाही २८६ गुण मिळाले. या सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या पुढील आयुष्यातही असेच यश मिळवा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करा.
4 comments:
Abhinandan sarvanche...
आपल्याही जवळपास अशी यशस्वी मुले असतील तर त्यांचे जरुर अभिनंदन करा. ही सर्व मुले महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य आहेत.
hee mule kharokharcha vaibahv astat. saglyancheabhinandan
Post a Comment