Tuesday, 24 June 2008

सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन

Subscribe in a reader


सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन Top Blogs

सॅन फ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन आयोजित करण्यास अनेकांनी प्रखर विरोध केला आहे. याविषयी आपले मत काय आहे? हा विरोध योग्य आहे का? हे साहित्यसंमेलन रद्द करुन भारतात घ्यावे का? आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..

कृपया कोणावरही वैयक्तीक टीका नको. सभ्य भाषेचा वापर करा. धन्यवाद. प्रतिक्रिया देण्यासाठी येथे क्लिक करा.

11 comments:

Anonymous said...

वामन तू अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारीचा मुद्दा छान हाताळलास. माझा ह्या साहित्य संमेलनास विरोध आहे. हे सामान्य मराठी माणसासाठीचे संमेलन महाराष्ट्रातच व्हावे. मराठी माणसास या संमेलनाचा लाभ व्हावा. हवे तर सॅन फ्रान्सिस्कोत वेगळे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन घ्या. पण हे संमेलन याच मातीत राहू द्या.

Anonymous said...

I strongly oppose this samelan..

ther is no need to go outside maharashtra..

Anonymous said...

विरोध अगदी योग्य आहे. रत्नागिरी काय वाईट होत ? मराठी माणसांना या संमेलनाचा काय् फायदा ?

Anonymous said...

माझा या संमेलनास प्रखर विरोध आहे. मराठी पुस्तक विक्रेते आणि प्रकाशक तेथे जाण्याएवढे श्रीमंत नाहीत. विस्मयी

Anonymous said...

वेगवान प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद..आपल्या प्रतिक्रिया आणि अन्य ब्लॉगवरील प्रतिक्रिया वाचून असे लक्षात येते की जास्तीत जास्त लोक या निर्णयाच्या विरोधात आहेत. आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे.

Anonymous said...

Maharashtrat jaga nahi ahe ka ki jaga kami padate ? Marathi Sahitya Sammelan ghyayala?

Anonymous said...

we hv to support this samelan .. pahilyandach aapali bhasha vaishwik staravar janar aahe .. pay odhanyapeksha aapan pathimba dila pahije..

prakashkshirsagar said...

प्रिय वामनराव
हा विषय हाताळल्याबद्दल धन्यवाद. आम्ही सर्व मराठीजन विरोध करीत असलो तरी आले कौतिकारावाच्या मना तेथे कोणाचे काही चालेना असेच घडेल असे वाटते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढाकाराने दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारतात ठिकठिकाणी घेतले जाते. भारतात जेथे मराठी माणूस तेथे संमेलन या न्यायाला धरून हे संमेलन भारतात कोठेही घ्यायला हवे. संमेलन जर अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोला घ्यायचा अट्टहास कोणी करीत असेल तर आधी संमेलनाचे नामांतर करावे. अखिल वैश्‍विक मराठी साहित्य संमेलन असे नाव त्याला द्या. कौतिकराव ठाले पाटील म्हणतात म्हणून तेथे संमेलन का घ्यायचे. संमेलनाचा पायाच जर भारतीय असा असेल तर हा दुराग्रह कशासाठी? सांगली साहित्य संमेलनातही कौतिकराव ठाले पाटील यांच्या भूमिकेमुळे त्यावेळचे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू संमेलनात फिरकलेच नाहीत. मावळते अध्यक्ष असून त्यांना जर अशी हीन वागणूक मिळत असेल तर इतरांना ते काय समजत असतील? जागतिक मराठी परिषद जगभर मराठी साहित्य संमेलन घेत असताना कौतिकरांनी हा अट्टहास करूच नये. भारतात अगदी चेन्नई, हैदराबाद येथेही संमेलन घेतले तर वावगे ठरणार नाही. जगभरातील मराठी साहित्यप्रेमींविषयी आदर आहेच. त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे पुढील वर्षी फिडालडेल्फिया येथे संमेलन होणार आहेच. मराठी व साहित्य संमेलनाविषयी कळकळ असेलच तर त्यावेळी मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने जरूर जावे.

Waman Parulekar said...

प्रकाशजी एक साहित्यिक म्हणून आपली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. "संमेलन जर अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोला घ्यायचा अट्टाहास कोणी करीत असेल तर आधी संमेलनाचे नामांतर करावे. अखिल वैश्‍विक मराठी साहित्य संमेलन असे नाव त्याला द्या." हे अगदी पटण्यासारखे बोललात. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

Waman Parulekar said...

सामान्य रसिकांसाठी खुशखबर.. को.म.सा.प.ने अ. भा. समांतर मराठी साहित्य संमेलन रत्नागिरीत घेण्याचा निर्धार घेतला आहे. या समांतर संमेलानास सामान्यांचा पाठींबा मिळत आहे.

Anonymous said...

एका गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे. अखिल भारतीय हा तांत्रीक मुद्दा बाजूला ठेवला तर या संमेलनातून बरेच फायदे आहेत. आपले साहित्य खरेदी करण्याची संधी परदेशी मराठी भाषीकांना मिळेल. मराठी पुस्तकांचा खप परदेशात झाला तर भाषांतरीत होण्याची संधी वाढेल.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters