Monday, 30 March 2009

विकास हाच प्रमुख मुद्दा असावा.

विकासाचा मुद्दा हवा.

गेल्या अनेक निवडणुकात या देशात अनेक प्रयोग झाले. गरीबी हटाव,शीख दंगलीच भांडवल,बोफोर्स,राम मंदीर,इंडीया शायनिंग अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. कधी कांद्याने कोणाला रडवले तर कधी तोफेने. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भावनिक मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्माधर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न चालु झाले आहेत. हे सर्व कुटील डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

उमेदवार निवडताना त्याची जात,धर्म कोणता हे पहाण्यापेक्षा त्याने कोणती विकासाची कामे केली आहेत ते पहाणे जरुरीचे आहे. उमेदवाराच्या भावी योजना काय आहेत? तो सर्वसामान्यांमध्ये मिसळू शकतो का? उमेदवार भ्रष्टाचारी तर नाही ना? देशस्तरावरील प्रश्नांची त्याला जाण आहे का? उमेदवार नवीन असेल तर यापुर्वी काम केलेल्या क्षेत्रातील त्याचे कार्य कसे होते हे जरुर तपासुन पहावे.

Sunday, 29 March 2009

लोकसभा २००९

लोकसभा २००९
हरेकृष्णाजी तुम्ही चांगला विषय निवडलात. हरेकृष्णाजी हे मराठीतील आघाडीचे ब्लॉगधारक आहेत. नवीन मंत्रीमंडळ कोणत्याही पक्षाचे असो त्यात विचारवंत आणि तज्ञ लोकांचा भरणा असणे गरजेचे आहे. प्रामाणिक लोकांची देशाला गरज आहे. देशाचे प्रांतवाद ,धर्मवाद,जातीवाद यामुद्यांवर विभाजन करणे सोपे आहे पण देश जोडणे फार कठीण आहे. काही वर्षांपुर्वी भारत जोडो अभियानाने एक प्रयत्न केला होता. देश अखंड ठेवण्यासाठी अशा अभियानांची गरज आहे. विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे. सुरक्षेचा मुद्दा पण महत्वाचा आहे. मी काही नेत्यांची नावे जी मला योग्य वाटली ती देत आहे. अन्य ब्लॉग धारकांनी जरुर नावे सुचवावीत.

श्री. डॉ.मनमोहन सिंग
श्री. डॉ..पी.जे.
श्री. शाहनवाज हुसेन
श्री. सुरेश प्रभु
श्री. प्रो. बासुदेव बर्मन (सी.पी.आय.एम्.)
श्री.डॉ.सुजन चक्रवर्ती (सी.पी.आय.एम्.)
श्री. प्रणव मुखर्जी
श्री. अंबुमणी रामदास
श्री. पी. चिदंबरम
श्री. प्रफुल्ल पटेल
श्री. प्रकाश करात
श्री. शीला दिक्षित (खासदार नाही पण मंत्री होण्यास लायक)
श्री.अभिषेक सिंघवी
श्री.डॉ.तुषार चौधरी

तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांना महत्व द्यावे असे तुम्हाला वाटते ? आपली मते जरुर नोंदवा. हरेकृष्णाजी आपणही आपली मते जरुर मांडा.

Thursday, 26 March 2009

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा (शके १९३१)

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष. सर्व मराठी समुदाय ब्लॉगच्या वाचकांना आणि इतर ब्लॉग चालकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

आपला
वामन परुळेकर

Monday, 23 March 2009

झणझणीत मिसळ

झणझणीत मिसळ

Saturday, 14 March 2009

जादू टेक्नॉलॉजीची

जादू टेक्नॉलॉजीची

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा वामनचा फोटो एवढया मोठया होर्डिंगवर कसा काय? ही जादू आहे नव्या तंत्रज्ञानाची...

शांतीदूत

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात अनेक कामांचा शुभारंभ झाला

श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. कोणत्याही देशाचे खेळाडू हे शांतीदूत असतात.ते त्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असतात, त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करणे अतिरेक्यांनाच जमू शकते. हा क्रिकेटवरही हल्लाच आहे. अतिरेक्यांना खेळ आवडत नाहीत. कारण साफ आहे,खेळाने देशांचे संबंध सुधारतात. अतिरेक्यांना हेच नको आहे. त्यांना विध्वंस हवा आहे भारताने स्वतःची अंतर्गत सुरक्षा पक्की केली पहिजे. भारतातही अशा प्रकारचे हल्ले होउ शकतात. आपण सर्वांनी सावध राहीले पाहिजे..

ShareThis

Visitors Worldwide

free counters