विकासाचाच मुद्दा हवा.
गेल्या अनेक निवडणुकात या देशात अनेक प्रयोग झाले. गरीबी हटाव,शीख दंगलीच भांडवल,बोफोर्स,राम मंदीर,इंडीया शायनिंग अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. कधी कांद्याने कोणाला रडवले तर कधी तोफेने. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भावनिक मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्माधर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न चालु झाले आहेत. हे सर्व कुटील डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे.उमेदवार निवडताना त्याची जात,धर्म कोणता हे पहाण्यापेक्षा त्याने कोणती विकासाची कामे केली आहेत ते पहाणे जरुरीचे आहे. उमेदवाराच्या भावी योजना काय आहेत? तो सर्वसामान्यांमध्ये मिसळू शकतो का? उमेदवार भ्रष्टाचारी तर नाही ना? देशस्तरावरील प्रश्नांची त्याला जाण आहे का? उमेदवार नवीन असेल तर यापुर्वी काम केलेल्या क्षेत्रातील त्याचे कार्य कसे होते हे जरुर तपासुन पहावे.
No comments:
Post a Comment