आठवणीतील मराठी मालिका
मुंबई दूरदर्शन वरील जुन्या मालिका
भिकाजीराव करोडपती
बोक्या सातबंडे
छत्रपती शाहु महाराज
छायागीत
आरोग्य संपदा
आमची माती आमची माणस
कामगार विश्व
यातील छत्रपती शाहु महाराज माझ्या विशेष आठवणीतील आहे. रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनीटांनी मालिकेचे प्रक्षेपण व्हायचे. क्लासमुळे मी सकाळी हायस्कूलमध्ये जात असे. मात्र सगळा लक्ष्य घराकडे असायचा. कधी एकदा ८ वाजतात आणि मी घरी जातो असे व्हायचे.
घरी आलो की गरमागरम पोहे,चहा आणि सोबत दुरदर्शनवरील मालिका. ९ वाजेपर्यंत ही मालिका चालू असायची. योग्य पात्र निवड, भव्य लोकेशन्स, उत्तम दिग्दर्शन यामुळे मला ही मालिका फार आवडायची. आजही शाहू महाराज म्हटले की मला हिच मालिका आठवते.
No comments:
Post a Comment