Monday, 11 February 2008
भावपुर्ण श्रध्दांजली
जेष्ठ समाजसेवक आणि गांधीवादाचे पुजारी महाराष्ट्र भुषण बाबा ऊर्फ मुरलीधर देविदास आमटे (वय ९४) यांचे आज पहाटे सव्वाचारला आनंदवन येथे निधन झाले. बाबा आमटे यांनी आपले आयुष्य गोरगरीब कुष्टरोगी जनतेच्या सेवेत घालवले. त्यांचे भारत जोडो अभियान शांतता निर्मितीचा यशस्वी प्रयोग होता. बाबा नर्मदा बचाओ आंदोलनात दहा वर्षे सक्रिय होते. इंद्रावती नदीवरील इंचमपल्ली धरणाविरोधात त्यांनी "मानवी साखळी' उभारून गरीबांचा प्रश्न मांडला.
आपल्या सर्वांसाठी बाबा आमटे आदर्श आहेत. त्यांना माझी भावपुर्ण श्रध्दांजली...
Labels:
श्रध्दांजली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment