Saturday, 23 February 2008

माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - 2

माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - 2
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील दुसरे पुष्प आहे..

ब्लॉगवाणी . कॉम -->>
http://www.blogwani.com/

ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता. तुमचा स्वतःचा ब्लॉग असल्यास तो तुम्ही येथे पाठवू शकता. ब्लॉगवाणीला ई-मेल करुन तुम्ही तुमचा ब्लॉग येथे सबमीट करु शकता.

ब्लॉगवाणीने पुरविलेल्या बटनवर क्लिक केल्यास आपला लेख लगेच ब्लॉगवाणीवर दाखवला जातो. यामुळे तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढेल.

- वामन परुळेकर


6 comments:

मोरपीस said...

नमस्कार,
मला ब्लॉगवाणी ही साईट आपल्या ब्लॉगवरुन मिळाली. ब्लॉगची रचना पण खुप सुंदर आहे. मला पण माझ्या पोस्ट ब्लॉगवाणीवर टाकता येतील का? मला जर माझ्या पोस्ट ब्लॉगवाणीवर टाकायच्या असतील तर त्यासाठी काय करावे लागेल?
क्रुपया मला सांगावे.
माझ्या ब्लॉगचा दुवा - morpees.blogspot.com

Waman Parulekar said...

धन्यवाद मोरपीसकर !
तुमचा ब्लॉग ब्लॉगवाणीवर दिसण्यासाठी तुमच्या ब्लॉगचा यु.आर्.एल् blogvani@cafehindi.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.

Anonymous said...

आपल्या अनमोल माहितीबद्द्ल धन्यवाद

मोरपीस

Marathi Help said...

मोरपीस धन्यवाद !
जेव्हा तुमचा मेल ब्लॉगवाणीला पोहचेल तेव्हा एक गोष्ट जरुर करा. ब्लॉगवाणीच्या होमपेजवर ब्लॉगवाणी असे ठळकपणे लिहलेले बटण दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर तुमचा URL insert करा आणि तुम्हाला एक कोड तयार मिळेल. तो कोड तुम्ही तुमच्या ब्लॉग वर implement करा.

मोरपीस said...

नमस्कार,
माझा ब्लॉग ब्लॉगवाणीवर दिसण्यासाठी मी ब्लॉगचा यु.आर्.एल् blogvani@cafehindi.com या ई-मेल पत्त्यावर दोनदा पाठवला, परंतु ब्लॉगवाणीवर URL insert केल्यावर तिथे message येतो की, माफ कीजिये, यह ब्लाग ब्लागवाणी पर नहीं है. आप हमें Blogwani एट cafehindi.com पर ई-मेल कर सकते हैं.

आपण मला क्रुपया मदत करु शकाल काय?

Waman Parulekar said...

माझा दुसरा ब्लॉग "व्यासंग" सबमीट करतेवेळी मला हाच अनुभव आला. पहिला ब्लॉग व्यवस्थित पोच झाला. ब्लॉगवाणी मध्ये अजुनही सुधारणा आवश्यक आहे.

ShareThis

Visitors Worldwide

free counters