पसायदान आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ १७९७ ॥ चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥ किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥ तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥ संत ज्ञानेश्वर भावार्थदीपिका, अध्याय १८ |
Monday, 25 February 2008
मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग-३)
Labels:
संत साहित्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment