सच्चा देशप्रेमी लियांडर पेस
तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी प्रत्येक क्षणाला भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. खेळताना तो देशासाठी खेळतोय याचा प्रत्यय त्याचा प्रत्येक सामना बघितल्यानंतर येतोच. असा आपला टेनिसपटू लियांडर पेस नेहमीच देशप्रेमाने भारावून गेलेला असतो.
ह्या सगळयाचा उल्लेख करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्या भारतीय टेनिस क्षेत्रात उद् भवलेला वाद. खेळाडुंचा म्हणे लियांडरवरचा विश्वास उडालाय. या खेळाडुंना लियांडर कप्तान म्हणून नको आहे. तो हुकूमशाह सारखा वागतो असे या सहखेळाडूंना वाटते.
खर तर हा वैयक्तीक स्वरुपाचा वाद असावा पण त्यात पेस वर करण्यात आलेले आरोप निषेधास पात्र आहेत. क़तार या अरब राष्ट्रात झालेल्या आशियाई खेळात पेसने सुवर्ण पदक जिंकले होते, त्यावेळी झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत चालू झाल्यावर पेसच्या डोळयातून ओघळलेले आनंदाश्रु देश कधीच विसरणार नाही. देशासाठी जिवाचे रान करुन खेळणाऱ्या या महान टेनिसपटूवर असे आरोप फक्त आपल्याच देशात होउ शकतात.
डेव्हिसकप असो वा दोहा आशियाई खेळ पेसची जिद्द आणि देशप्रेम अतुलनिय आहे. अशा या महान भारतिय व्यक्तिस माझा सलाम.
आगे बढो पेस हम तुम्हारे साथ है
No comments:
Post a Comment