Friday, 15 February 2008

मराठी नगरी ?

मराठी नगरी ?

"अरे महेश वो रीझल्ट लगा क्या? मुझे केटी नही ना?"
"अरे नही रे शायद कल लगेगा"
दोन अस्सल मराठी मुलांमधला हा संवाद.

हे चित्र आजकाल कुठेही पहायला मिळेल. काही तथाकथीत शिकलेली मराठी माणस मराठी बोलायला लाजतात. काहीजणांचा असाही समज आहे की मराठी बोलल तर आपल्याला जुनाट समजल जाईल. येथे मराठी माणस मराठी बोलण्याबाबत उदासिन आहेत आणि आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतोय. काय कारण काय असेल या उदासीनतेबाबत ? आपण जरुर याचा विचार केला पाहिजे. मराठी माणुस आपल्या आप्तस्वकियांचे पाय ओढण्यात तरबेज आहे. इथेही तोच नियम लागु होतो. कुणी मराठीत बोलु किंवा लिहु लागल की त्याच्या व्याकरणाचा तपास इतरांकडुन सुरु होतो. मान्य आहे की व्याकरणदृष्टया भाषाशुध्दी आवश्यक आहे पण नवखा व्यक्ती मात्र उदास होतो. सर्व मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.

पण काही लोक मात्र केवळ दिखाव्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतात ते अयोग्य आहे. मी संगणकाचे स्नातकोत्तर शिक्षण घेत आहे मला गरजेपुरती इंग्रजी वापरावीच लागते पण माझ्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्गातुन बाहेर पडलो की मी आग्रहाने मराठीतच बोलतो.

आपल्या भाषेसाठी आपण जागरुक राहिले पाहिजे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी शिर्डीला गेलेलो तेव्हा महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश मध्ये गेल्या सारखे वाटले. सगळीकडे न समजणाऱ्या भाषेतून पाटया होत्या. आता नियम असतानाही ह्या पाटया लागल्याच कश्या ? तेथिल स्थानिक मराठी अधिकारी गप्प कसे राहिले? याचा अर्थ असा होतो की आपण जागरुक नाही आहोत. इतर राज्यात कुठेही मराठी पाटी दिसते का? मराठी भाषा संवर्धन करायची असेल तर आपणच प्रथम मराठी बोलल आणि लिहिल पाहिजे.
धन्यवाद

- वामन परुळेकर

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters