Friday, 22 February 2008
अबब किती हे अपघात ?
अबब किती हे अपघात
दिल्लीच्या ब्लुलाईन बस सेवेने विश्वविक्रमच केला आहे. २००६ सालामध्ये या बससेवेमुळे ८२०० अपघात घडले. आज वृत्तपत्रांमध्ये ही आकडेवारी प्रसिध्द झाली आहे. हा एक अनोखा विश्वविक्रमच आहे आणि या अपघातांमध्ये तब्बल २०५० जण मृत्युमुखी पडले आहेत.
सध्या दिल्लीकरांना ही बस म्हणजे यमराजाचाच अवतार वाटत असावी. पादचाऱ्यांचे प्राण धोक्यात आहेत. दिल्ली उच्चन्यायालयानेही या बसवर ताशेरे ओढले होते.
खर तर एवढ सगळ झाल्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे होते पण ज्याअर्थी न्यायालयाने हस्तक्षेप केला त्याअर्थी सर्व स्पष्ट होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment