Tuesday, 19 February 2008
आज शिवजयंती
आज शिवजयंती . आपणा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.
जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥
श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥
ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला ।
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥
- स्वा.वी. विनायक दामोदर सावरकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment