इंडियन म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना बिग स्टार आयएमए चा "हॉल ऑफ फेम" हा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘आयएमए’च्या संस्थापक राजश्री बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांच्या हस्ते किशोरीताईंना हा पुरस्कार देण्यात आला.
किशोरी ताईंचा जन्म १९३१ साली झाला. किशोरी आमोणकर यांनी आपल्या मातोश्री जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी सर्वच घराण्यातील तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले आणि स्वत:ची अशी वेगळी शैली निर्माण केली. त्या प्रयोगशील आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी गीत गाया पत्थरोने या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले पण नंतर पार्श्वगायन सोडून पुन्हा त्यांनी शास्त्रीय गायनास सुरुवात केली. पन्नासच्या दशकात काही काळ त्यांनी गायन बंद केले होते. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. माणिक भिडे, सुहासिनी मुळगावकर, रघुनंदन पणशीकर आणि तेजश्री आमोणकर हे किशोरीताईंचे शिष्य आहेत.
१९८५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना भारत सरकारने १९८७ माध्ये पद्मभूषण तर २००२ मध्ये पद्मविभूषण देवून गौरवले.
1 comment:
@अनामिक : धन्यवाद. विकिपीडिया वरील पेज वर बदल करता येवू शकतो. आपण जर एखादी लिंक दिली तर विकिपीडिया वरील चूक दुरुस्त करेन.
Post a Comment