गेल्या काही दिवसात किंवा वर्षात आपल्याकडे सुचना क्रांती झाली आहे पण सुचना क्रांती बरोबर जातीयवादही तेवढाच फोफावला आहे. मनात जे जातीयवादी विचार आहेत ते मांडण्याच एक नव व्यासपीठच या सनातन्यांना मिळाल आहे. अलीकडेच महात्मा फुलेंवर जातीयवादी टिका करणारा एक लेख फेसबुकवर माझ्या वाचनात आला. टिका फुलेंच्या लिखाणावर व फुलेंवर होती. केवळ फुलेंवरच नव्हे इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला एखाद्या जातीशी जोडायचे आणि मग इतर जातीच्या लोकांनी त्याचे चारित्र्यहरण करायचे हे रोजचेच झालय. टिका एवढी जातीयवादी की इतर जातींना शिक्षण दिले हीच महात्मा फुलेंची चुक असे दाखवण्याचा प्रयत्न.
निषेध आहे असे लिखाण करणाऱ्यांचा. |
निषेध आहे असे लिखाण करणाऱ्यांचा |
मला अस वाटतय की इतिहासात काय झाले हे चघळत बसुन आपला काही फायदा नाही होणार हे समजुन घेण महत्त्वाच आहे. केवळ जातीयवाद भडकवायचा असेल आणि त्यासाठी हा उपद्व्याप चालला असेल तर वेळीच सावध होण गरजेच आहे. अशा लोकांना कठोर विरोध करण आपल कर्तव्य आहे. आपण सगळे भारतीय नागरीक आहोत हेच पुरेसे नाही का? फुटीरतावादी तत्व जात, धर्म, वंश अशा मुद्यांवर देशात फुट पाडत आहेत. जातीचा अभिमान असणे किंवा स्वजातीय लोकांचा आदर असणे वाइट नाही पण जातीचा माज असणे हे पुरोगामी महाराष्ट्राच लक्षण नाही.
सध्या काही कट्टर जातीयवादी संघटना अतिशय खालच्या स्तराला गेल्या आहेत. या संघटनांचे अनुयायी दुसऱ्या संघटनांमध्ये शिरून स्वत:च्या विकृत विचारांचा प्रचार करण्यात धन्यता मानतात. अशा सर्व लोकांसाठी आमच्या ब्लॉग आणि ग्रुपचे दार कायम बंद राहील हे लक्षात घ्यावे. अतिशय खालच्या स्तराला गेलेल्या काही संघटना स्वत:ची पुस्तके छापून त्यात दुसऱ्या समाजाची एवढी निंदानालस्ती करत आहेत कि त्याला काही अंत नाही. एका पुस्तकाने एवढी खालची पातळी गाठली की ब्राह्मण स्त्रीयांवर अतिशय अश्लिल भाषेत लिखाण केल आहे. एवढच नव्हे तर जातीय दंगली कशा पेटवायच्या आणि बहुजन समाजाला यात कस ओढायचं याच विस्तृत लिखाण या विकृत लोकांनी केल आहे. आपल्याला अशा लोकांपासून सावध रहावे लागेल.
No comments:
Post a Comment