Tuesday, 13 May 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ८ ("अॅड धिस")

माहितीपर संकेतस्थळे भाग - ८


> Addthis

आज आपण अशा संकेतस्थळाबद्दल जाणुन घेवू की ज्या संकेतस्थळाचा उपयोग करुन तुम्ही तुमचे ब्लॉग कंटेंट सर्वदूर पोहचवू शकता. "अॅड धिस" या संकेतस्थळावर तुम्हाला "अॅड धिस" हे बटण पुरवले जाते. हे बटण तुम्ही तुमच्या पेज इलेमेंट मध्ये समाविष्ट करु शकता.


हे बटण मिळविण्यासाठी प्रथम ह्या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ उघडावे. त्यावर "Get your button" असे लिहीले असेल, त्यावर क्लिक करा. नंतर एक फॉर्म येइल तो भरा. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला खाते तयार करावे लागेल. त्यानंतर दिलेला कोड तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाका.


"अॅड धिस" हे बटण वापरुन तुम्ही तुमच्या ब्लॉगचा बुकमार्क विविध सेवा पुरविणाऱ्या संकेतस्थळांवर करुन देवू शकता.


जाता जाता या संकेतस्थळावर नजर टाका. तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी विविध विजेट या संकेतस्थळावर मिळतील.
> http://www।widgetbox.com/

धन्यवाद



Monday, 12 May 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)

माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)





मित्रांनो गेले पाच महिने मी तुम्हाला या सदरात काही माहितीपर आणि मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. मी आज तुम्हाला काही अशा संकेतस्थळांची माहिती देणार आहे की ज्यावर नोंदणी करुन आपण आपल्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवू शकता. आज पहिल्या भागात आपण फक्त भारतीय ब्लॉग नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळांबद्दल जाणूण घेउ. यातील काही संकेतस्थळांबद्दल तुम्हाला माहिती असेलच. उदा. मराठी ब्लॉग्ज नेट आणि ब्लॉगवाणी. मी तुम्हाला खालील भारतीय संकेतस्थळे सुचवत आहे. सदस्य होण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमचा ब्लॉग भारतीय असणे आवश्यक आहे.

भारतीय ब्लॉग नोंदणी संकेतस्थळे


1> ब्लॉगवाणी
ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/2.html


2> मराठीब्लॉग्ज.नेट

अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. २००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/blog-post_18.html


3> ब्लॉगस्ट्रीट इंडीया

ब्लॉगस्ट्रीट इंडीया हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. अधिकाअधिक वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ह्या संकेतस्थळाचा उपयोग होइल.तुमच्या ब्लॉगच्या लोकप्रियतेनुसार तुम्ही अव्वल बनू शकता.


4> इंडिया ब्लॉग्ज १.०

हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. पहिल्याच पानावर सजेस्ट अ ब्लॉगवर क्लिक करुन तुम्ही तुमचा ब्लॉग नोंदणी करु शकता.


5> देसी ब्लॉग्ज

देसी ब्लॉग्ज ह्या संकेतस्थळावर फार कमी मराठी ब्लॉग्ज आहेत. आपण आपला ब्लॉग या संकेतस्थळावर जरुर नोंदणीकृत करा. मराठी संख्या वाढली पाहिजे.


6> कामत ब्लॉग पोर्टल

कामत ब्लॉग पोर्टल हे संकेतस्थळ नावावरुन तरी मराठी वाटते. या संकेतस्थळावर तुम्ही आत्ता अपडेट केलेला तुमचा ब्लॉग पाहू शकता. इंडीयन ब्लॉग नोंदणी मध्ये हे संकेतस्थळ अव्वल आहे. त्यामुळे तुम्ही मोठी वाचकसंख्या मिळवू शकता.


क्रमशः

(कोणतीही शंका असल्यास जरुर कमेंट करा. शक्यतो नोंदणीसाठी वेगळा ई-मेल पत्ता तयार ठेवा.)

Sunday, 11 May 2008

द ग्रेट मालवण



ग्रेट मालवण (ऑइलपेंट इफेक्ट)

सर्वाधिकार वामन परुळेकर

सर्व छायाचित्रे © अंतर्गत सुरक्षित

बळी

सौरभ सहारनपूरच्या सिमेवर उभा होता. सहारनपूर शत्रूसैन्याच्या हल्ल्यात बेचिराख झालेले शहर. सौरभ कसाबसा या शहरातून निसटला होता. त्याचे प्राण वाचले होते पण तो निराश होता. या हल्ल्याच्यावेळी तो काहीच करु शकला नव्हता. शत्रु देशाची विशाल सेना त्याच्या गावावर तुटून पडली होती. माणुसकीचा गंधही नसलेल्या या हैवानांनी त्याच्या गावाचे स्मशाण केले होते.

गेले तीन दिवस सौरभ उपाशीपोटी आपले प्राण वाचवत जंगलातून फिरतोय. उंच डोंगरावरुन त्याला गावातील दृश्य दिसत होते. सगळीकडे आगीचे लोट. शत्रु सैन्य माघारी फिरले तसा सौरभ गावाकडे वळला. दबक्या पाउलांनी त्याने गावात प्रवेश केला. काहीच शिल्लक नव्हते. सैतानांनी सर्वाना मारले होते. एखादा चुकून जिवंत राहीला असेल तर त्याला मरेपर्यंत भाला खूपसून मारण्यात आले होते. आपल्या गावाची स्थिती पाहून सौरभ कोसळलाच.

हे सगळे का आणि कशासाठी ? जमिनीच्या टीचभर तुकडयासाठी.
राज्याच्या सीमेचा वाद राजांचा त्यात आमचे काय चुकले? सौरभ स्वतःशीच बडबडत होता.

माझ्या गोरगरीब गावकऱ्यांनी काय पाप केले होते? सौरभ आक्रोश करत खाली पडला.

एव्हाना राजाला हल्ल्याची बातमी कळली. त्याने आपल्या सेनेला बदला घेण्याचे निर्देश दिले. आता शत्रु पक्षातील एखादे गाव असेच जळणार आणि सुडाची ही साखळी अशीच सुरु राहणार.

- वामन परुळेकर

Saturday, 10 May 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

उल्लेखनीय परिचारिका सेवेबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिचारिका वैशाली सुरेश पाटील आणि नगर जिल्हातील सरला राजेंद्र भावसार यांची निवड झाली आहे. या दोन्ही परिचारिकांचे हार्दिक अभिनंदन. परिचारिकांचे काम अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळेच चांगले काम करणाऱ्या या परिचारिकांचे अभिनंदन करणे माझे कर्तव्य ठरते. १२ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters