Thursday, 23 February 2012

फेसबुकवरील खोटा प्रचार

हा एक नवीन खोटा प्रचार. हा फोटो बघून मला धक्काच बसला. एखाद्या पक्षाविरुद्ध प्रचार करताना लोक एवढ्या खोट्या गोष्टी पसरवतील आणि त्याच्यावर आपले फेसबुककर एवढा विश्वास ठेवतील अस स्वप्नातही वाटल नव्हत. मित्रांनो डोळे झाकून शेअर करण सोडा. आपण नक्की काय शेअर करतोय याचा विचार करा. सत्यता पडताळून पहा. किती दिवस तुम्ही फसत राहणार. स्वतःच्या डोक्याचा वापर करा, एकाच संकुचित विचारधारेला वाहून घेवू नका. त्या ऐवजी डोळे उघडून जगाकडे पहा. मुद्देसूद टीका करणे वेगळ आणि टिंगलटवाळी, विकृत प्रचार करणे वेगळ. आज निदान माझ्या दहा मित्रांच्या Wall वर ही पोस्ट मला दिसली. 



सत्य हे आहे की लुईस ब्रेल हा कोणी इटालियन राजा नसून तो जगप्रसिद्ध ब्रेल लिपीचा जनक आहे. ब्रेल लिपीचा वापर अंध लोक लिहिण्या-वाचण्यासाठी करतात. पेशाने तो एक प्राध्यापक आणि संगीतकार होता. त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही फ्रांस या देशात झाले. ब्रेलच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५४ मध्ये फ्रांसने ब्रेल लिपीचा अधिकृतपणे स्वीकार केला. १८७३ च्या अंध शिक्षकांच्या जागतिक परिषदेनंतर ब्रेल लिपीचा प्रसार मोठया प्रमाणात युरोपात झाला. १९१६ मध्ये अमेरिकाने ब्रेल लिपीचा स्वीकार केला आणि १९३२ मध्ये इंग्लिश भाषेकरिता ब्रेल लिपी ठरविण्यात आली. मानवतेला फार मोठ योगदान देणाऱ्या ब्रेलची दखल जगातल्या सर्वच देशांनी घेतली. युरोपियन संघाने दोन विशेष नाणी चलनात आणली. अमेरिकेने एक डॉलरच्या नाण्यावर ब्रेलची दखल घेतली. बेल्जिअम, ईराण, चीन, इटली या देशांनीही ब्रेलचा फोटो असलेली नाणी चलनात आणून ब्रेलचा मरणोपरांत सन्मान केला. २००९ साली लुईस ब्रेल यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारनेही दोन रुपयाचे नाणे चलनात आणले. तोच हा फोटो. त्याचा वापर काही विकृत लोक प्रचारासाठी करत आहेत. कृपया जागे व्हा आणि अश्या समाजासाठी स्वत: आयुष्य वाहिलेल्या लोकांबद्दल खोटी माहिती पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.

Wednesday, 8 February 2012

दुटप्पीपणा नको ..

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का?? उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे होते.

Wednesday, 1 February 2012

अती घाई संकटात नेई .......

स्टार माझा झिंदाबाद


Sunday, 15 January 2012

पानिपत - एक शौर्यगाथा


पानिपतची लढाई ही एक शौर्यगाथाच आहे. मराठे हरले पण शत्रूच्या मनात दहशत बसवून हरले.  दत्ताजी शिंदेंचा  "बचेंगे तो और भी लढेंगे" हा आशावाद आणि निडर शौर्यगाथा म्हणजे पानिपत. महाराष्ट्रात मकर संक्रात साजरी होत असताना तिथे पानिपतात लाखो मराठे धारातीर्थी पडले. हजारो मराठी कुटुंब उध्वस्त झाली. या युद्धाचा मराठी मनावर गंभीर आघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारा प्रचंड प्रतिकार करणारा मराठ्यांचा प्रमुख सरदार इब्राहिम खान गारदी पकडला गेला. त्याचे हाल हाल करून त्याला ठार मारण्यात आले. मराठी साम्राज्याची रक्षा करता करता बलिदान दिलेल्या त्या लाखो ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन.. या स्मृती दिनाच्या निमित्याने स्टार माझाने खास कार्यक्रम प्रक्षेपित केला होता त्याचे युट्यूबवरील व्हिडिओ लिंक मी येथे देत आहे. जरूर पहा.        




Saturday, 14 January 2012

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


मकर संक्रांतीच्या, लोहीरीच्या आणि पोंगलच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters