Wednesday, 1 February 2012
Sunday, 15 January 2012
पानिपत - एक शौर्यगाथा
पानिपतची लढाई ही एक शौर्यगाथाच आहे. मराठे हरले पण शत्रूच्या मनात दहशत बसवून हरले. दत्ताजी शिंदेंचा "बचेंगे तो और भी लढेंगे" हा आशावाद आणि निडर शौर्यगाथा म्हणजे पानिपत. महाराष्ट्रात मकर संक्रात साजरी होत असताना तिथे पानिपतात लाखो मराठे धारातीर्थी पडले. हजारो मराठी कुटुंब उध्वस्त झाली. या युद्धाचा मराठी मनावर गंभीर आघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारा प्रचंड प्रतिकार करणारा मराठ्यांचा प्रमुख सरदार इब्राहिम खान गारदी पकडला गेला. त्याचे हाल हाल करून त्याला ठार मारण्यात आले. मराठी साम्राज्याची रक्षा करता करता बलिदान दिलेल्या त्या लाखो ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन.. या स्मृती दिनाच्या निमित्याने स्टार माझाने खास कार्यक्रम प्रक्षेपित केला होता त्याचे युट्यूबवरील व्हिडिओ लिंक मी येथे देत आहे. जरूर पहा.
Labels:
पानिपत,
मराठी,
महाराष्ट्र
Saturday, 14 January 2012
Thursday, 29 December 2011
भालजी पेंढारकर
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त कोल्हापूरचे सुपुत्र महान मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. व्ही शांताराम त्यांचे मावसभाऊ होते. भालजींची आई राधाबाई आणि व्ही. शांताराम यांची आई कमलाबाई या सख्या बहिणी. मास्टर विनायक हे भालजींचे भाऊ.
भालजींनी अनेक महान मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि दिग्दर्शनही केले. त्यांचे छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा, साधी माणस, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, बहिर्जी नाईक, बाजीराव मस्तानी, महाराणी येसूबाई, वाल्मिकी, मीठ भाकर, सुनबाई हे चित्रपट खूप गाजले. ते मराठी चित्रपटांचे सुवर्णयुगच होते. मूक चित्रपटांपासून भालजींनी आपले करीयर सुरू केले. प्रसिद्ध प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केले. कोल्हापूर चित्रपटसृष्टीतील इतर स्टुडियोतही त्यांनी काम केले. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. त्यांनी काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली त्यात छत्रपती शिवाजी, महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांचा समावेश आहे.
१९८१ चा गनिमी कावा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १९९१ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Labels:
चित्रपट,
दिग्दर्शक,
निर्माता,
भालजी पेंढारकर
Monday, 1 August 2011
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा.
आज १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णांनी लोककलेला सामाजिक आशय दिला. १९४० पासून साठेंनी रचनेला सुरुवात केली. दलित, कामगार आणि कष्टकरी यांच्या रोजच्या जीवनातील प्रश्न साठेंनी आपल्या लेखनातून मांडले. त्यांनी तत्कालीन विविध समस्या स्वत: रचनेतून मांडल्या. अण्णाभाऊ साम्यवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांची "गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची " ही लावणी पत्नीचा दुरावा आणि बेळगाव कारवार मराठी भाषिकांचा दुरावा यथार्थ वर्णन करते.
गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची ।
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, डांग, उंगरगावावर मालकी दुजांची
धोडं खंडणीची, कमाल दंडेलीची ।
चीड बेकीची । गरज एकीची ।
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, डांग, उंगरगावावर मालकी दुजांची
धोडं खंडणीची, कमाल दंडेलीची ।
चीड बेकीची । गरज एकीची ।
Labels:
अण्णाभाऊ साठे,
चळवळ,
शाहीर
Subscribe to:
Posts (Atom)





