तुम्ही जर ब्लॉगरचा उपयोग करून ब्लॉगीँग करत असाल तर तुम्ही नेव्हिगेशनबारपाहीलाच असेल. या बारचा तसा काहीच उपयोग होत नाही. हा बार कायम स्वरूपी काढुन टाकायची एक ट्रिक आहे. जे लोक डोमेन नेम वापरतात त्यांना या ट्रिक ची गरज नाही. जे ब्लॉगर टेम्पलेट वापरतात त्यांना ही ट्रिक उपयोगी पडेल.
१) ब्लॉगरला Log in व्हा.
२) डैशबोर्डवर क्लीक करा. त्यानंतर ज्या ब्लॉगचा नेव्हिगेशनबार हाइड करायचा असेल त्या ब्लॉगच्या डीझाइनवर क्लीक करा.
दि.२ डिसेंबर १९८४, भोपाळ आणि भारताच्या इतिहासातील काळा दिवस. २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनिअन कार्बाइडच्या प्रमुख प्लांन्ट मधुन एम् आय् सी गॅस आणि टोक्सीन्सची गळती झाली. भोपाळमध्ये मृत्युने थैमान घातल. सरकारी आकडेवारीनुसार लगेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 3000 ते 4000 च्या दरम्यान होती. घटनेनंतर पहिल्या आठवडयात जवळजवळ 8000 लोकांनी आपला जीव गमवला होता. पुढच्या काही महिन्यात 10000 ते 20000 लोकांनी आपला जीव गमावला. 1,00,000 ते 2,00,000 लोकांना कायम स्वरुपी इजा झाल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे संकट एवढ भयानक होत की कल्पना करण ही शक्य होत नाही. 2000 जनावर मृत्युमुखी पडली. झाडांवरची पानही पिवळी होउन गळून पडली. हॉस्पीटलमधील स्टाफला या घटनेला कस सामोर जायच याच कोणतही प्रशिक्षण दिलेल नव्हत.
कर्नाटक म्हटल की उंच उंच तमिळ शैलीची मंदिरे, सुंदर आणि स्वच्छ बगिचे, मस्त काळेकुळकुळीत रस्ते आणि ब्रिटीशकालीन देखण्या इमारती डोळ्या समोर उभ्या राहतात. कर्नाटक विधानसभा आणि हायकोर्टची इमारत अप्रतिम आहे.