Friday, 11 June 2010

शनिवारवाडा, पुणे

शनिवारवाडा, पुणे

युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४

युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४

दि.२ डिसेंबर १९८४, भोपाळ आणि भारताच्या इतिहासातील काळा दिवस. २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनिअन कार्बाइडच्या प्रमुख प्लांन्ट मधुन एम् आय् सी गॅस आणि टोक्सीन्सची गळती झाली. भोपाळमध्ये मृत्युने थैमान घातल. सरकारी आकडेवारीनुसार लगेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 3000 ते 4000 च्या दरम्यान होती. घटनेनंतर पहिल्या आठवडयात जवळजवळ 8000 लोकांनी आपला जीव गमवला होता. पुढच्या काही महिन्यात 10000 ते 20000 लोकांनी आपला जीव गमावला. 1,00,000 ते 2,00,000 लोकांना कायम स्वरुपी इजा झाल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे संकट एवढ भयानक होत की कल्पना करण ही शक्य होत नाही. 2000 जनावर मृत्युमुखी पडली. झाडांवरची पानही पिवळी होउन गळून पडली. हॉस्पीटलमधील स्टाफला या घटनेला कस सामोर जायच याच कोणतही प्रशिक्षण दिलेल नव्हत.

Thursday, 15 April 2010

द ग्रेट कर्नाटक

ग्रेट कर्नाटक


कर्नाटक म्हटल की उंच उंच तमिळ शैलीची मंदिरे, सुंदर आणि स्वच्छ बगिचे, मस्त काळेकुळकुळीत रस्ते आणि ब्रिटीशकालीन देखण्या इमारती डोळ्या समोर उभ्या राहतात. कर्नाटक विधानसभा आणि हायकोर्टची इमारत अप्रतिम आहे.

Thursday, 8 April 2010

लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर



लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे विचार परखडपणे मांडणारे टिळक माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या घरी एक छोटे म्युझिअम आहे. त्यात त्यांनी वापरलेल्या वस्तु आणि तत्कालीन पत्रे संग्रहीत करण्यात आली आहेत. त्यांच्या घरानजिकच टिळक आळीतील ऐतिहासिक गणेश मंदिर आहे. जर मागे कॉंग्रेसचे पुरातन कार्यालय आहे. जिथे अनेक महान नेते वास्तव्य करुन गेले आहेत.

Sunday, 7 March 2010

रांगोळी प्रदर्शन

रांगोळी प्रदर्शन
फिनोलेक्स इंजिनिरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युटोपिया 2010 मध्ये रांगोळी प्रदर्शनात रेखाटलेल्या अप्रतिम रांगोळ्या. अनेक विद्यार्थ्यांनी या रांगोळी प्रदर्शनात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील काही निवडक रांगोळ्याची छायाचित्रे मी येथे पोस्ट करत आहे. इंजिनीअर असुनही या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण जपले आहेत त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद.







ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters