रांगोळी प्रदर्शन
फिनोलेक्स इंजिनिरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युटोपिया 2010 मध्ये रांगोळी प्रदर्शनात रेखाटलेल्या अप्रतिम रांगोळ्या. अनेक विद्यार्थ्यांनी या रांगोळी प्रदर्शनात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील काही निवडक रांगोळ्याची छायाचित्रे मी येथे पोस्ट करत आहे. इंजिनीअर असुनही या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण जपले आहेत त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद.Sunday, 7 March 2010
Saturday, 28 November 2009
फयान नंतर
फयान नंतर
अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही.
काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.
Thursday, 3 September 2009
भावपुर्ण श्रध्दांजली
भावपुर्ण श्रध्दांजली
राजकारणात चांगली माणसे टिकत नाहीत अस म्हणतात ते खरच आहे. प्रशासन गावापर्यंत या लोकप्रिय मोहीमेवर निघालेले वाय. एस्. आर्.रेड्डी यांचे काल अपघाती निधन झाले. आंध्रप्रदेशचे ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते. आज सकाळी ही दुखद घटना मला कळली आणि फार वाइट वाटल.व्यवसायाने डॉक्टर असलेले वाय्.एस्.आर्. समाजसेवकही होते. आयुष्यात कधीही न हरलेले वाय्.एस्.आर्. मृत्युसमोर मात्र हरले. त्यांना माझी भावपुर्ण श्रध्दांजली.
Labels:
माझा भारत,
राजकारण,
श्रध्दांजली
Saturday, 22 August 2009
Monday, 17 August 2009
माहितीपर संकेतस्थळे भाग - 14
माहितीपर संकेतस्थळे भाग - 14
नवी वेबसाइट

वामन परूळेकर - येथे क्लिक करा.
धन्यवाद.
वामन राधाकृष्ण परुळेकर,
अधिव्याख्याता,
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅंड टेक्नॉलॉजी ,(मुंबई विद्यापीठ),
रत्नागीरी.
नवी वेबसाइट
मित्रांनो, गेले काही महिने मी माझ्या पर्सनल वेबसाइटवर काम करत होतो. ही वेबसाइट एक ऑगस्टला पुर्ण झाली. माझ्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा हा माझा प्रयत्न आहे. तुम्हीही या वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
वामन परूळेकर - येथे क्लिक करा.
धन्यवाद.
वामन राधाकृष्ण परुळेकर,
अधिव्याख्याता,
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅंड टेक्नॉलॉजी ,(मुंबई विद्यापीठ),
रत्नागीरी.
Labels:
माहितीपर संकेतस्थळे
Subscribe to:
Posts (Atom)
