Monday, 17 August 2009

शाहरुख खान

शाहरुख खान यांचा जो अपमान एका अमेरीकन विमानतळावर झाला त्यावरुन बरेच वादळ निर्माण झाले होते. गेले दोन दिवस एकच विषय बऱ्याच वाहिन्यांनी चघळला असेल. अनेक ब्लॉगर्सनी तर शाहरुखलाच दोषी धरलय. म्हणे या विषयाचा खुपच बाउ केला गेला. अमेरीकन नागरीकाला इतर देशात अशी वागणूक मिळाली असती तर? अमेरीका गप्प बसल असत का? एका विशेष आडनावामुळे त्याला ही वागणूक दिली गेली आहे का ? हा एक वादाचा विषय आहे. तस असेल तर ते दुर्भाग्यपुर्ण आहे.

मागे न्युयॉर्क चित्रपटात असाच एक विषय हाताळला होता. सगळ्याच आशियाइ लोकांना एकाच चष्म्यातून बघण्याचा अमेरीकन दृष्टीकोन चुकीचा आहे यात शंकाच नाही. हा समज बदलण्यासाठी भारतीय सरकारनेही प्रयत्न करावेत. केवळ एकसारखे दिसण हा काही गुन्हा होउ शकत नाही. सुरक्षेसाठी तपासणी समजता येइल पण त्यासाठी दोन-दोन तास ताब्यात घेण्याची गरज नाही.

Thursday, 13 August 2009

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा. दोन दिवसानंतर आपण नव्या युगात प्रवेश करु. या निमित्ताने गेल्या वर्षी सुरु केलेली "स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे" ही लेखमाला पुर्नप्रकाशीत करत आहे. धन्यवाद.

स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-1)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्म - २३ जुलै,१८५६ -- मृत्यू - १ ऑगस्ट, १९२०
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

टिळकांनी बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा,होमरूल चळवळ,लखनौ करार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. केसरी , मराठा सारखी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढयात महत्त्वपूर्ण ठरली.
टिळकांना साहित्यातही रुची होती त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा.
>आर्यांचे मूळ वसतीस्थान
>ओरायन
>गीतारहस्य



स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-2)
महात्मा मोहनदास करमचंद गांधी

जन्म - ऑक्टोबर २, १८६९ -- मृत्यू - जानेवारी ३०, १९४८

महात्मांचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात झाला होता. गांधींनी इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करुन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रीकेत त्यांनी वर्णव्देषा विरुध्द दिर्घकालीन लढा दिला.

भारतात परतल्यावर ते स्वातंत्र्य लढयात सक्रीय झाले. मिठ सत्याग्रह,दांडी यात्रा,विदेशी हटाव,स्वदेशी जागरण,भारत झोडो ही ऎतीहासिक आंदोलने बापुंनी उभारली. भारतात असलेल्या अस्पृश्यता निवारणा साठी त्यांनी प्रयत्न केले.

महात्मा गांधी हे ज्या महात्मा या उपाधीने ओळखले जात ती उपाधी त्यांना रविंद्रनाथ टागोरांनी दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. जानेवारी ३०, १९४८ ला नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधींची गोळ्या घालुन हत्या केली. आणि संपूर्ण भारत दुःखाच्या महासागरात लोटला गेला.....

श्रीकृष्ण जयंती

श्रीकृष्ण जयंती

सर्व वाचकांना श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. यावर्षी सणावर स्वाइन फ्लुच सावट आहे. पण घाबरुन जाण्यासारखे काही नाही. सर्व ती काळजी घेउन सण साध्या पद्धतीने जरुर साजरा करा.

सर्वांना शुभेच्छा.

Monday, 25 May 2009

सांज ये गोकुळी सावळी सावळी

सांज ये गोकुळी सावळी सावळी



Monday, 18 May 2009

सिंग इज किंग

सिंग इज किंग


सिंग इज किंग बऱ्याच दिवसांनी भारतीय जनतेने एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करण्याची मतांद्वारे अनुमती दिली आहे. भारतीय जनता घोडाबाजाराला वैतागली होती. छोटे प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे सरकारची अडवणुक करायचे हे जनतेने पाहिले होते. जनतेला पुन्हा असे सरकार नको होते जे या पक्षांवर अवलंबून राहिल. जनतेने स्थैर्याला महत्त्व दिले यात वाद नाही. या विजयाचे श्रेय केवळ जनतेलाच नाही तर कॉंग्रेस पक्षालाही आहे. कॉंग्रेसचे नेते स्थिर सरकारचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षात सरकारने जी कामे केली ती सोनिया गांधी,मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी लोकांपर्यत पोहचवली. भाजपच्या नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. प्रचारात वापरण्यात आलेली भाषाही लोकांना आवडली नाही.

मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.

पक्षीय बलाबल

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

206

भारतीय जनता पार्टी

116

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

21

तृणमुल कॉंग्रेस

19

द्रवीड मुन्नेत्र कळघम

18

पक्षीय बलाबल - महाराष्ट्र

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

25

भारतीय जनता पार्टी+

20

पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

26

भारतीय जनता पार्टी +

10

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

20

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters