Monday, 25 May 2009
Monday, 18 May 2009
सिंग इज किंग
सिंग इज किंग
सिंग इज किंग बऱ्याच दिवसांनी भारतीय जनतेने एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करण्याची मतांद्वारे अनुमती दिली आहे. भारतीय जनता घोडाबाजाराला वैतागली होती. छोटे प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे सरकारची अडवणुक करायचे हे जनतेने पाहिले होते. जनतेला पुन्हा असे सरकार नको होते जे या पक्षांवर अवलंबून राहिल. जनतेने स्थैर्याला महत्त्व दिले यात वाद नाही. या विजयाचे श्रेय केवळ जनतेलाच नाही तर कॉंग्रेस पक्षालाही आहे. कॉंग्रेसचे नेते स्थिर सरकारचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षात सरकारने जी कामे केली ती सोनिया गांधी,मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी लोकांपर्यत पोहचवली. भाजपच्या नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. प्रचारात वापरण्यात आलेली भाषाही लोकांना आवडली नाही.मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.
| पक्षीय बलाबल | |
| भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस | 206 |
| भारतीय जनता पार्टी | 116 |
| समाजवादी पार्टी | 23 |
| बहुजन समाज पार्टी | 21 |
| तृणमुल कॉंग्रेस | 19 |
| द्रवीड मुन्नेत्र कळघम | 18 |
| पक्षीय बलाबल - महाराष्ट्र | |
| भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + | 25 |
| भारतीय जनता पार्टी+ | 20 |
| पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश | |
| भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + | 26 |
| भारतीय जनता पार्टी + | 10 |
| समाजवादी पार्टी | 23 |
| बहुजन समाज पार्टी | 20 |
Labels:
महाराष्ट्र,
माझा भारत,
राजकारण,
राष्ट्रवाद
Saturday, 11 April 2009
अखेरची लढाई सुरु
अखेरची लढाई सुरु
श्रीलंकन फौजेने आता उत्तर भागात प्रवेश केला आहे. हा उत्तरेकडील भाग नो फायर झोन म्हणून ओळखला जातो. या भागात ताज्या चकमकीत 30 ते 40 तमिळ टायगर मारले गेले आहेत. श्रीलंकन सेनेने आपली आक्रमक मोहीम कायम ठेवत उत्तर भागात धडक मारली आहे. नो फायर झोनच्या पलीकडे किमान 6000 तमिळ जनता अडकल्याची बातमी आहे. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर श्रीलंकन सेनेने या जनतेची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विशेष पॉंईंट तयार केले आहेत. या ठीकाणांची माहीती जनतेला मिळावी यासाठी लाउडस्पिकरवरुन जनतेला सुचना दिल्या गेल्या. अशाप्रकारचे मानवतावादी अभियान जगात प्रथमच केल्याचा श्रीलंकन सेनेचा दावा आहे. तमिळ टायगर आणि श्रीलंकन सेनेच्या लढाईत निष्पाप जनेतेचा बळी जाउ नये हीच प्रार्थना आपण करु शकतो.
Labels:
आशिया,
परदेश वार्ता,
सुरक्षा
Tuesday, 7 April 2009
भारनियमन कधी बंद होणार??
भारनियमन कधी बंद होणार??
लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक पक्ष वारेमाप आश्वासने देत आहे. 2 रुपयात गहु काय आणि राम मंदिर काय आश्वासनांची कमी नाही . पण सर्वात मह्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच विजेच्या मुद्द्यावर नेते स्पष्ट बोलत नाहीत. गेल्या 5 वर्षात वीजेचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्या उमेदवाराने कोणते प्रयत्न केले ? विजेचा प्रश्न सुटावा यासाठी कोणते प्रयत्न तो करणार आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दुपारी 3 तास वीज जाते तेव्हा कळते की वीजेचा प्रश्न किती गंभीर आहे. जनरेटरचा वापर करणाऱ्या आणि वातानुकुलीत खोलीत बसणाऱ्यांना ह्या प्रश्नाची गंभीरता कळणार नाही. सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या प्रश्नावर तरतुदी सुचवाव्यात आणि हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.
Labels:
महाराष्ट्र,
माझा भारत,
राजकारण,
विकास
Saturday, 4 April 2009
Subscribe to:
Posts (Atom)
