सागरेश्वर सुर्यास्त
Saturday, 10 May 2008
Friday, 9 May 2008
जपानी मोबाइल कथा (एका जपानी कथेचा स्वैर अनुवाद)
जपानी मोबाइल कथा
( एन्.एच्.के. या जपानी वाहिनीवरुन प्रसारीत झालेल्या जपानी कथेचा स्वैर अनुवाद)
चॅंग एकटाच टोकियो स्टुडिओत रहायचा. अजून नोकरी नाही आणि खाण्यापिण्याचे वांदे अशात टोकियोत आणखी जागा कुठून मिळणार. सकाळी नोकरीचा शोध आणि रात्री उशिरा हात हलवत परत घरी येणे हा त्याचा नित्यक्रम ठरला होता. त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी रहायची , तिचे नाव होते टीना. दोघांची चांगली मैत्री होती. एकामेकांना एस्.एम्.एस्. , फोनवर बोलणे चालायचे.( एन्.एच्.के. या जपानी वाहिनीवरुन प्रसारीत झालेल्या जपानी कथेचा स्वैर अनुवाद)
एका रात्री चॅंग उशिरा घरी परतला त्याच्या मोबाइलवर संदेश होता.
"चॅंग मी तुझ्यावर प्रेम करते, तुझी टीना"
चॅंगला संदेश वाचून धक्का बसला. त्याच्या मनातही तसे काही नव्हते. त्याने रीप्लाय दिला.
"आपली फक्त मैत्री आहे प्रेम नव्हे."
पुन्हा संदेश आला.
"चॅंग पुन्हा विचार कर, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत."
चॅंगने उत्तर दिले
"टीना मी तुझ्यावर प्रेम करत नाही. शुभ रात्री"
चॅंगने मोबाइल टेबलवर ठेवला आणि तो फ्रेश व्हायला बाथरुममध्ये गेला. थोडयावेळाने चॅंगला एका अनोळखी नंबरवरुन संदेश आला.
"मी तुझ्यावर प्रेम करते"
चॅंगने उत्तर दिले.
"तू कोण आहेस? मला ओळखतेस का?"
"हो. मी तुला ओळखते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझ्यावर प्रेम करतोस ना?"
चॅंग गोंधळला. आत्ता कुठे एका संकटातून तो बाहेर आला होता. आता ही नविन कोण? चॅंगला प्रश्न पडला.
तरी पण थोडा वेळ टाइमपास म्हणून चॅंगने तिला प्रतिसाद दिला.
"ओ तर अनामिका तू तुझे नाव सांग ना"
"नावात काय आहे. मी तुझ्या वर फार प्रेम करते."
"किती?"
"तुझ्यासाठी मी माझे प्राण पण देइन."
आता जरा जास्तच होतय. असा विचार करुन चॅंगने झोपायचा निर्णय घेतला. तो झोपला आणि अचानक पाठोपाठ दहा संदेश त्याच्या मोबाइलवर आले. चॅंग खडबडून जागा झाला. सर्व संदेश त्याच नंबरवरुन आले होते. आता मात्र चॅंग वैतागला. त्याने त्या नंबरवर फोन केला आणि फोन केल्यावर जो संदेश ऐकवला गेला त्याने तर त्याची झोपच उडवली.
पलिकडून संदेश आला की "हा क्रमांक अस्तित्वात नाही.कृपया पुन्हा डायल करा."
तेवढयात चॅंगला एक नवा संदेश आला. तो एक व्हिडिओ संदेश होता. तो पाहून चॅंग उडालाच. या संदेशात त्याचेच घर होते. तो रात्री घरी आल्यापासून झोपेपर्यंतचे चित्रीकरण त्यात होते. त्याचे हात थरथरु लागले. संदेश पाठवणारी आपल्याच घरात आहे याची जाणिव त्याला झाली. भितीने तो बाहेर पळू लागला आणि मागे वळतो तर काय रक्ताने माखलेली,विचित्र चेहरा करुन टीना उभी होती. तो तिथेच बेशुध्द पडला.
दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा टी.व्ही.वर टीनाच्या आत्महत्येची बातमी दाखवली जात होती.
Labels:
कथा
Thursday, 8 May 2008
पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान
५५ वर्षांचे पुतीन रशियाने नवे पंतप्रधान होतील. पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीला पूर्ण बहुमत आहे. दोन वेळा रशियाचे राष्ट्रपतीपद भुषविलेले पुतीन तिसऱ्या वेळी रशियन कायद्यामुळे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपद स्विकारले. रशियन पंतप्रधानांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पाच वर्षात पुतीन यांनी रशियाला चांगले नेतृत्त्व दिले. रशियाची जी.डी.पी. वाढही दर्शनिय आहे. पुतीन यांच्या सरकारने भारताबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंधही कायम राखले. भविष्यातही पुतीन यांचा रशियावरील दबदबा कायम राहील यात शंकाच नाही.
Labels:
आशिया,
परदेश वार्ता,
बातम्या,
माझा भारत
Wednesday, 7 May 2008
अक्षयतृतीया
सर्व मराठी बांधवांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
अक्षयतृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तां पैकी एक मानला जातो. ही अक्षयतृतीया आपल्या जीवनात सुख आणि समृध्दी घेउन येणारी ठरो हीच प्रार्थना.
धन्यवाद.
अक्षयतृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तां पैकी एक मानला जातो. ही अक्षयतृतीया आपल्या जीवनात सुख आणि समृध्दी घेउन येणारी ठरो हीच प्रार्थना.
धन्यवाद.
Subscribe to:
Posts (Atom)
