Tuesday, 18 March 2008

सदाफुली

सदाफुली


नवीन टाटा सुमो


नवीन टाटा सुमो

टाटांची नवी सुमो आपण पाहिली असेलच. मी पण काल पाहिली आणि पाहताक्षणी मला गाडीची रचना आवडली. ही नवीन कार महिंद्रा स्कार्पिओला टक्कर देण्यासाठीच बनवली असावी. या गाडीची रचना स्कार्पिओ सारखीच वाटते. गाडीची अंतर्गत रचना आकर्षक आहे. पॉवर विंडो, पॉवर स्टीअरींग, एम्.पी.थ्री प्लेयर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या कारमध्ये शक्तीशाली स्पिकर सिस्टीम आहे.

ही कार सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार एल्.एक्स.,जी.एक्स आणि ई-एक्स अशा तीन प्रकारात उपलब्ध आहे. त्यातही ६+१ आणि ७+१ अशा आसनक्षमतेत ही कार उपलब्ध आहे. कारला २ वर्ष वॉरंटी आहे. २ वर्ष किंवा ७५,००० कि.मी. जे लवकर पुर्ण होइल ते. कारची किंमत अंदाजे ६.५० ते ७.५० लाख राहील(दिल्ली शोरुम)

गाडीची काही वैशिष्टये

मोठे स्पष्ट दिसणारे दिवे
फ्रंट एअर डॅम
व्हीलबेस २५५० एम्.एम्.
३ रो सिटींग
डीकोर इंजीन ( DICOR- direct injection common rail )
पॉवर विंडो
पॉवर स्टीअरींग
एम्.पी.थ्री प्लेयर

Sunday, 16 March 2008

पहारा


कोकणात आता आंब्याचा मोसम सुरु झाला आहे. आंबा,काजू,फणस,जांभुळ ही फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या दरम्यान आंब्यांच्या बागेमध्ये कडेकोट सुरक्षा असते. आंब्यांची चोरी होण्याचे प्रकार रोखण्यासाठी मालक डोळ्यात तेल घालून पहारा देतात. रात्रीच्या वेळी पहाऱ्याची खरी गरज असते. या पहाऱ्यासाठी अजूनही काही ठिकाणी कंदील वापरले जातात. आज मी रत्नागिरी येथील एका स्थानिक बागेस भेट दिली, त्यावेळी हा कंदिल मला तेथे दिसला. तेथे टिपलेले हे क्षण मी येथे पाठवत आहे.....






- वामन परुळेकर

Saturday, 15 March 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ४

माहितीपर संकेतस्थळे भाग - ४

मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील चौथे पुष्प आहे..

फीडबर्नर
http://www.feedburner.com/fb/a/home


फीडबर्नर संकेतस्थळ बऱ्याच सुविधा पुरवते. आपल्या ब्लॉगचे फीड आपण येथे देउन आपली वाचकसंख्या वाढवू शकतो. हे संकेतस्थळ आपल्याला ई-मेल वरुन आपल्या ब्लॉगचे अपडेट ईतरांपर्यंत पोहचवण्याची सुविधा पुरवते. म्हणजेच या सुविधेचा फायदा घेउन तुम्ही खाली दाखवलेला चौकोन तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करु शकता.



या चौकोनात तुमचे वाचक त्यांचा ई-मेल टाईप करतील. हे केल्यावर तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉगवरील लेख ई-मेल स्वरुपात मिळू लागतील. फीडबर्नर अन्य काही सुविधा पुरवते त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू. ह्या लेखात मी फक्त ई-मेल सुविधेसंदर्भात लिहीणार आहे.

फीडबर्नर संकेतस्थळ उघडल्यावर प्रथम तुमच्या ब्लॉगचा URL किंवा feed address द्यावा लागतो.
वरच्या छायाचित्रात दिसत असलेल्या बॉक्समध्ये तुमचा ब्लॉग यु.आर्.एल्. टाईप करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. लक्षात ठेवा तुमचा URL हा http:// ने सुरु झालेला हवा. त्यानंतर तुम्हाला Atom किंवा RSS यापैकी एका URL ची निवड करावी लागेल. समजा तुम्ही RSS फीड चा पर्याय निवडला तर त्यानंतर नेक्स्ट बटण क्लिक करा.
यानंतर पुढील पानावर तुम्हाला तुमचा फीडबर्नर फीड address दिसेल.
तो असा असेल http://feeds.feedburner.com/famtmca हा address तुम्ही बदलू शकता. त्यानंतर तुम्हाला फीडबर्नर अकाउंट तयार करावे लागेल. त्यासाठी युजरनेम,पासवर्ड आणि ई-मेल द्यावा लागेल. हे केल्या नंतर Activate feed बटणवर क्लिक करा. आता हे सगळ यशस्वी झाले की खालील संदेश दिसेल.

Congrats! Your FeedBurner feed is now live. Want to dress it up a little?

त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट बटण दाबा. पुन्हा एकदा नेक्स्ट बटण दाबा. त्यानंतर खालील मेनू दिसेल त्यातील Publicize क्लिक करा.
आता डाव्या बाजूला एक उभा मेनू दिसेल त्यात E-mail Subscriptions असे दिसेल त्यावर क्लिक करा. ई-मेल सबस्क्रिप्शनच्या पेजवर योग्य सेवादात्याची नोंद करा.
तीन पर्याय असतील
* Feedburner
* FeedBiltz
* Rmail
यातून एका सेवादात्याची नोंद करा आणि Activate बटण दाबा. त्यानंतर उभ्या मेनूमधिल Subscription management ही लिंक निवडा आणि तेथे खालील पट्टी दीसेल त्यात Blogger वा अन्य सर्व्हीसची निवड करा.
अन्यथा दिलेला कोड page element (html script) ला Copy Paste करा. हे सर्व केल्यावर ई-मेल सुविधा तुमच्या ब्लॉगवर कार्यरत होइल. धन्यवाद.


- वामन परुळेकर

अकबर द ग्रेट


आशुतोष गोवारीकर यांचा जोधा-अकबर अप्रतिम तर आहेच पण त्याचे संगीतही श्रवणीय आहे. ए.आर्.रेहमान यांचे संगीत आणि आषुतोष यांचे चित्रपट यांचे एक अतुट नाते बनले आहे. आशुतोष + रेहमान = हीट हे आता समिकरणच बनले आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते. तो काळ आणि त्याकाळातले वैभव यांचे जिवंत चित्रण झाले आहे. गेल्या आठवडयापर्यंत या चित्रपटाने ४८,४०,००,००० एवढे उत्पन्न मिळविले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत या चित्रपटाने लगान,गुरु,वीर-झारा यासारख्या चित्रपटांना मागे सारले आहे. सध्या ह्या चित्रपटाला हीट श्रेणीत ठेवता येइल मात्र जर ट्रेंड असाच राहीला तर हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल.

परदेशात जास्त यश

गेल्या आठवडयापर्यंत जोधा-अकबर या चित्रपटाने परदेशात ३० करोड कमावले होते. परदेशात ३० करोड पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारा हा सातवा चित्रपट ठरला आहे. एकटया अमेरीका देशात या चित्रपटाने ९ करोड कमावले होते. परदेशात हा चित्रपट सर्वकालीन सुपरहीट ठरला आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावरील बंदी उठवल्यामुळे उत्पन्न अजून वाढण्याची शक्यता आहे. येथे झालेल्या छोटया-मोठया आंदोलनांमुळे चित्रपटाला बरीच प्रसिध्दी मिळाली आहे.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters