Sunday, 9 March 2008

वाचनिय ब्लॉग

रविवार लोकसत्ता मधील मऱ्हाटी नेट-भेट या सदरात मराठीसमुदाय या ब्लॉगची वाचनिय ब्लॉग म्हणून दखल घेतल्या बद्दल धन्यवाद. सविस्तर बातमी बघण्यासाठी येथे क्लिक करा.  

Thursday, 6 March 2008

युटोपिया २००८

युटोपिया २००८
काल रत्नागिरीमधिल फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिकोत्सवाचा प्रारंभ झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कालच्या पहिल्या दिवशी स्वरसंध्या, कलाकृती , प्रश्नमंजुषा हे अन्य कार्यक्रम पार पडले. त्याची ही क्षणचित्रे...






फिनोलेक्सच्या कलादालनात भरलेले रांगोळी प्रदर्शन





हाय टी साठी लागलेली लांबलचक रांग


Monday, 3 March 2008

पाउले चालती सिंधुदुर्गची वाट......

पाउले चालती सिंधुदुर्गची वाट......
भराडी देवी आणि कुणकेश्वर यांत्रांमुळे सध्या सर्व भाविक मोठया प्रामाणावर सिंधुदुर्गात दाखल होत आहेत.

Sunday, 2 March 2008

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून हीच अपेक्षा होती.


ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हेडनने एका स्थानिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंगची "जंगली,चीड आणणारा, किळसवाणा" संभावना केली होती. यात विषेश असे काही नाही. जंगली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून सभ्यपणाची अपेक्षा ठेवण म्हणजे अतिशयोक्ती होइल. तेथील प्रसारमाध्यमांनीही हेडनला जोरदार पाठींबा दिला आहे. एका वृत्तपत्राने तर, हेडन जे बोलला ते आम ऑस्ट्रेलियन जनतेच्या मनातले होते असे वाटते.

भारतीय क्रिकेट बोर्ड मात्र हरभजनलाच आगाउपणा करण्याचा सल्ला देतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियमच वेगळे असावेत असे मला वाटते.

उदा.

>ऑस्ट्रेलियन जे काही करतात किंवा वागतात ते सर्व क्रिकेट हीतासाठीच असत.
>ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जर तुमच्याकडे पाहून काही बोलले तर मान खाली घालून पुढे जा. उलट उत्तर दिल्यास शिक्षेस पात्र व्हाल.
> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बाहेर मिडियाबरोबर काहीही बोलण्यास स्वतंत्र आहेत.
> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी घातलेल्या शिव्या हा स्पष्टवक्तेपणा समजावा .
> ऑस्ट्रेलियन जनतेला प्रतिस्पर्धी खेळाडुंवर अंडी मारण्याचा पुर्ण अधिकार आहे.
> ऑस्ट्रेलियन हे देव नाहीत त्यामुळे शेरेबाजी करण्यास ते मुक्त आहेत.
> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हे वेळ पडल्यास जिंकण्यासाठी पंचांची मदत घेउ शकतात.

क्रमशः

Saturday, 1 March 2008

जावे गावांच्या नावा

(गुरुवार, दिनांक ८ मार्च २००१ सालच्या दैनिक तरुण भारत (बेळगाव) माझे हे विनोदी सदर प्रसिध्द झाले होते. माझा जुना लेख संग्रह लवकरच मी येथे प्रसिध्द करणार आहे. जरुर वाचा. धन्यवाद. )

जावे गावांच्या नावा


पवित्र आश्रमांचा गाव
- मठ

गोऱ्यांचे गाव
- गोरेगाव

देवाचे अस्तित्व असलेले गाव
- देवगड

ढगांचे घर
-मेघालय

देवाचे चरण ज्या गावाला लागले असे गाव
-हरिचरणगिरी

जा आणि ये एकाच वेळी कसे सांगाल
- गोआ (गो-आ)

- वामन परुळेकर

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters