Tuesday, 19 February 2008

काही मजेदार छायाचित्रे.


काही मजेदार छायाचित्रे.

नेटवर फेरी मारताना मला काही मजेदार छायाचित्रे सापडली आहेत, तुमच्या मनोरंजनासाठी मी ती छायाचित्रे येथे पाठवत आहे.

१) जेट स्कुटर



२) अत्याधुनिक गाडी



आज शिवजयंती


आज शिवजयंती . आपणा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया धृ

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय का गेला ॥१॥

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥

- स्वा.वी. विनायक दामोदर सावरकर

अखेर भारत विजयी


धोनी आणि युवराजच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात विजयश्री खेचून आणली. एक वेळ भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता पण महेंद्रच्या संयमी खेळीमुळे आपण विजयी झालो. अखेर भारतीय संघाने पराभवाची साखळी तोडली. पहिल्या सत्रात काही वेळ भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व होते. नंतर मात्र संघकारा आणि महेला जयवर्धनेने चांगली भागीदारी निभावली. शेवटच्या षटकांमध्ये चांगली फटकेवाजी झाली.

भारताची सुरुवात खराब झाली सचिन शुन्यावर बाद झाला. संघाची पडझड धोनी आणि युवराजने रोखली. धोनीने एक बाजू लावून धरली आणि शेवटी त्यानेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.

फिडेल कॅस्ट्रोची निवृत्ती



क्युबा कॉम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यांनी आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तत्पुर्वी जुलै २००६ मध्ये त्यांनी राज्यकारभार तात्पुरता भावाकडे सोपवला होता. परंतु आज बी.बी.सी. च्या बातमी नुसार ते कायमचे पाय उतार झाले.

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना हा निर्णय घेणे भाग पडले. एक सामर्थ्यशाली नेता अशी त्यांची ओळख आहे. १९५९ च्या क्युबन कॉम्युनिस्ट क्रांती पासून त्यांचा क्युबावर एकछत्री अंमल राहीला हे विशेष. गेले १८ महिने ते राज्यकाराभारापासून दुर होते.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters