Sunday, 17 February 2008
Saturday, 16 February 2008
माझे आवडते चित्रपट गीत
कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे सारे
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे गीतकार --- आरती प्रभू
चित्रपट--- सामना
Friday, 15 February 2008
मराठी नगरी ?
मराठी नगरी ?
"अरे महेश वो रीझल्ट लगा क्या? मुझे केटी नही ना?"
"अरे नही रे शायद कल लगेगा"
दोन अस्सल मराठी मुलांमधला हा संवाद.
हे चित्र आजकाल कुठेही पहायला मिळेल. काही तथाकथीत शिकलेली मराठी माणस मराठी बोलायला लाजतात. काहीजणांचा असाही समज आहे की मराठी बोलल तर आपल्याला जुनाट समजल जाईल. येथे मराठी माणस मराठी बोलण्याबाबत उदासिन आहेत आणि आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतोय. काय कारण काय असेल या उदासीनतेबाबत ? आपण जरुर याचा विचार केला पाहिजे. मराठी माणुस आपल्या आप्तस्वकियांचे पाय ओढण्यात तरबेज आहे. इथेही तोच नियम लागु होतो. कुणी मराठीत बोलु किंवा लिहु लागल की त्याच्या व्याकरणाचा तपास इतरांकडुन सुरु होतो. मान्य आहे की व्याकरणदृष्टया भाषाशुध्दी आवश्यक आहे पण नवखा व्यक्ती मात्र उदास होतो. सर्व मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.
पण काही लोक मात्र केवळ दिखाव्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतात ते अयोग्य आहे. मी संगणकाचे स्नातकोत्तर शिक्षण घेत आहे मला गरजेपुरती इंग्रजी वापरावीच लागते पण माझ्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्गातुन बाहेर पडलो की मी आग्रहाने मराठीतच बोलतो.
आपल्या भाषेसाठी आपण जागरुक राहिले पाहिजे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी शिर्डीला गेलेलो तेव्हा महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश मध्ये गेल्या सारखे वाटले. सगळीकडे न समजणाऱ्या भाषेतून पाटया होत्या. आता नियम असतानाही ह्या पाटया लागल्याच कश्या ? तेथिल स्थानिक मराठी अधिकारी गप्प कसे राहिले? याचा अर्थ असा होतो की आपण जागरुक नाही आहोत. इतर राज्यात कुठेही मराठी पाटी दिसते का? मराठी भाषा संवर्धन करायची असेल तर आपणच प्रथम मराठी बोलल आणि लिहिल पाहिजे.
धन्यवाद

- वामन परुळेकर
Labels:
मराठी
Thursday, 14 February 2008
आज देव मानसीश्वर जत्रा , वेंगुर्ला
दक्षिण कोकणातील प्रसिध्द देवस्थान श्री देव मानसीश्वरची जत्रा आज संपन्न होत आहे. हजारो सिंधुदुर्गवासिय आणि मुंबईकर चाकरमानी या जत्रेला आवर्जून येतात. या देवस्थानाचे वैशिष्टय म्हणजे देव मानसीश्वर मंदीराच्या परीसरात कोणताही मोठा आवाज निषिध्द आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मंदीराच्या परीसरात कोणतेही वाद्य वाजवणारा व्यक्ती आपली वाट चुकतो.
मंदीराची रचना इतर मंदीराहून वेगळी आहे. खाडीमध्ये उभे असलेले मंदीर आणि फडकणारी निशाण सुंदर वाटतात.
Labels:
दिनविशेष
Subscribe to:
Posts (Atom)