Wednesday, 13 February 2008

मराठी हास्य विनोद

दिर्घ अजाराने त्रासलेले काका डॉ. सावंतांकडे जातात.

मराठी हास्य विनोद


डॉ.सावंत - तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोण?

काका - डॉ. गावडे.

डॉ. सावंत - अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.

तुम्हाला कोणता दिला?

काका - तुमच्याकडे जाण्याचा..........

Tuesday, 12 February 2008

इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव



क्रिकेट इंग्लंडने आज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. सामना पूर्ण एकतर्फी वाटत होता. एकटया अलस्टर कुकचा अपवाद वगळला तर पुर्ण संघाने निराशा केली. इंग्लंडने १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्युझिलंडने सर्व गडी राखुन १८ षटकात विजय मिळवला.

तिर्थक्षेत्र गणपतीपुळे,महाराष्ट्र

गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिरासमोरील प्रवेशव्दाराजवळचा हत्तीचा पुर्णाकृती पुतळा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयाचे रांगोळी प्रदर्शन


फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयाचे रांगोळी प्रदर्शन
युटोपिया-ब्रेनव्हेवज् २००७ च्या निमित्ताने फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्याची ही क्षणचित्रे.


Monday, 11 February 2008

इस्ट तिमोर कधी शांत होणार ?

इस्ट तिमोर कधी शांत होणार ?

आत्ता बी.बी.सी. वर बातमी बघितली. शांततेसाठीच नोबेल पारीतोषीक विजेते इस्ट तिमोरचे राष्ट्रपती जोस रामोस होर्ता यांच्या वर आज खुनी हल्ला झाला. बंडखोरांनी त्यांच्या पोटात गोळ्या झाडल्या. आता त्यांची प्रकृती स्थीर आहे.
याच जोस रामोस होर्ता यांना १९९६ सालचे नोबेल पारीतोषिक प्रदान करण्यात आले होते. ते शांततेचे पुरस्कर्ते आहेत. ईस्ट तिमोरच्या स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले होते.
२००२ साली या छोटया देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली होती.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters